agricultural news in marathi Harvesting of summer Finger millet | Page 2 ||| Agrowon

काढणी उन्हाळी नाचणीची...

पराग परीट
सोमवार, 5 एप्रिल 2021

डिसेंबर महिन्यात बियाणे पेरून एकवीस ते पंचवीस दिवसांची रोपे मुख्य शेतात लावल्यावर फुले नाचणीसारख्या उशिरा पक्व होणाऱ्या जातीची काढणी एप्रिल महिन्याच्या अखेरीस होईल.

डिसेंबर महिन्यात बियाणे पेरून एकवीस ते पंचवीस दिवसांची रोपे मुख्य शेतात लावल्यावर फुले नाचणीसारख्या उशिरा पक्व होणाऱ्या जातीची काढणी एप्रिल महिन्याच्या अखेरीस होईल.

  • नाचणीची कणसे पूर्ण सुकेपर्यंत वाट न पाहता योग्य वेळी कापून घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास कणसातून दाणे गळून पडायला सुरवात होते. कणसातील काही दाणे दाताखाली चावून बघावेत. कचकचीत लागत असतील तर पीक काढणीस तयार नाही आणि जर दाणे दाताखाली फुटून कटकट असा आवाज येत असेल तर पीक काढणीस तयार असल्याचे समजून कणसांची खुडणी करावी.  
  • कणसे कापून शेतातील खळ्यावर किंवा ताडपत्रीवर दोन ते तीन दिवस चांगली सुकवावीत. त्यानंतर मळणी करून पुन्हा एखादे ऊन देऊन धान्य आहे त्या स्थितीत हवेशीर ठिकाणी बारदाना किंवा कणग्यामध्ये साठवून ठेवावे.
  • मळणी केल्यावर लगेचच नाचणीला गडद तांबडा रंग येत नाही. चांगला आकर्षक रंग येण्यासाठी मळणी केलेली नाचणी किमान दोन ते तीन महिने दाण्यांवरील पातळ आवरणासह साठवून ठेवावी लागते.
  • दोन तीन महिन्यांनी जेव्हा नाचणीचा वापर किंवा विक्री करायची आहे तेव्हा नाचणी गिरणीत पॉलिश करावी.
  • नाचणीच्या दाण्यांवरील पातळ आवरणामुळे जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्यामुळे जर वापर तत्काळ करायचा नसेल तर सगळी नाचणी एकदम पॉलिश करून ठेऊ नये.
  • जातीनुसार नाचणीमध्ये तांबड्या रंगाची तीव्रता कमी जास्त दिसून येते. फुले नाचणी या जातीच्या धान्याचा रंग मध्यम तांबडा आहे. दाण्याचा आकार टपोरा आणि एकसारखा आहे.
  • उन्हात सुकवलेली नाचणी गरम असतानाच धातूच्या पिंपामध्ये किंवा बॅरेलमध्ये भरून ठेऊ नये. कारण रात्री वातावरण थंड झाल्यावर या धान्यांमधील आर्द्रता बाष्पाच्या रुपात बॅरेलच्या पृष्ठभागावर आतून साठून नंतर पाण्याच्या रूपात पुन्हा धान्यामध्ये ठिपकत राहते. त्यामुळे नाचणीला बुरशी लागण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे उन्हात सुकवलेले धान्य सायंकाळी गोणपाटात भरून नंतर थंड झाल्यानंतरच धातूच्या पिंपामध्ये किंवा बॅरेलमध्ये भरावे.
  • धान्य साठवताना त्यात कडुनिंब, निलगिरी याच्या पानांचा अधूनमधून थर द्यावा. रासायनिक घटकांचा वापर टाळावा.
  • नाचणीपासून बिस्किटे, पापड, मुरमुरे निर्मिती शक्य आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून नाचणीपासून प्रक्रिया उत्पादने तयार करावीत.

- पराग परीट,  ९९२११९०६७१
(तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कृषी विभाग, गगनबावडा,  जि. कोल्हापूर)


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...