जीवनसत्त्वयुक्त शेवगा

शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने, फुले आणि शेंगांची भाजी करतात. यामधील जीवनसत्त्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करतात.
Drumstick powder
Drumstick powder

शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने, फुले आणि शेंगांची भाजी करतात. आयुर्वेदात याचे  फायदे सांगितलेले आहेत. यामध्ये प्रथिने, पोषक अन्नघटक, लोह, बीटा कॅरोटीन, अमिनो अ‍ॅसीड, कॅल्शिअम, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, क आणि बी यांसारखी जीवनसत्त्वे आहेत. ही जीवनसत्त्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करतात.  आरोग्यदायी गुणधर्म 

  • शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये पालक भाजीपेक्षा ३ पटींनी लोहाचे प्रमाण आहे.  
  • शेवग्याची पाने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविणेसाठी मदत करतात. तसेच अल्सर, ट्यूमर  नियंत्रण, सांधे दुखी, सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. 
  • शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगाही अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. रक्तातील दूषित घटक वाढल्याने होणारा आम्लाचा त्रास, त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. 
  •  शेवग्याच्या शेंगांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. परिणामी मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. पीत्ताशयाचे कार्यही सुरळीत होते. 
  •  घशातील खवखव, कफ, सर्दी, श्‍वास घेताना त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगाचे सूप घ्यावे. यामधील पोषणतत्त्वे श्‍वसन मार्गातून धोकादायक घटक कमी करण्यास मदत करतात. टीबी, ब्रोंकायटीस, अस्थमा यांसारख्या आजारावर शेंगा उपयुक्त आहेत. डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास, कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यास मदत.
  • शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा वापर

  • डाळीचे वडे, दुधातून मिश्रण, भाजी,पराठे 
  • मध, सॅलड, पापड निर्मितीमध्ये वापर. 
  • टीप - शक्यतो उकळत्या भाजीमध्ये शेवगा पावडरचा वापर करू नये. भाजी उकळून गॅस बंद केल्यानंतर मिसळावी. म्हणजे पावडरमधील जीवनसत्त्व अ चे प्रमाण स्थिर राहते. 
  • शेवगा पावडरमधील घटक (१०० ग्रॅम )

  •     जीवनसत्त्व - अ चे प्रमाण गाजरापेक्षा ४ पटीने जास्त 
  •     जीवनसत्त्व - इ चे प्रमाण पालका पेक्षा ३ पटीने जास्त 
  •     कॅल्शिअमचे प्रमाण दुधापेक्षा ४ पटीने जास्त 
  •     जीवनसत्त्व - अ चे प्रमाण संत्रीपेक्षा ४ पटीने जास्त 
  •     लोहाचे प्रमाण बदाम पेक्षा ३ पटीने जास्त
  • शेंगा, पाने आणि बियांपासून मूल्यवर्धित पदार्थ 

  • शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. ही पाने भाजी स्वरुपातील खाण्यासाठी उपयोग येतात. त्यानंतर पाने वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, ब्रेड, पास्ता व इतर खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. 
  • पानांचा रस 

  • शेवग्याची १० किलो ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. ती मंद आचेवर ५ मिनिटे गरम करावीत. त्यानंतर थंड करून घ्यावी. शेवग्याच्या १० किलो पानांमध्ये १ लिटर पाणी मिसळून हॅमरमिलच्या साह्याने बारीक करून (दळून) घ्यावीत. 
  • तयार झालेल्या शेवग्याच्या शेंगांचा रस गाळून घ्यावा. त्यामध्ये २५० ग्रॅम साखर किंवा गूळ व २० ग्रॅम जिरे पावडर मिसळून एकजीव करावे. तयार झालेल्या रसाला हवाबंद बाटलीत रेफ्रिेजरेटरमध्ये ठेवावा. 
  • पानांचा चहा 

  • सुरुवातीला शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन सावलीत वाळवावी. वाळलेली पाने चहा पूड प्रमाणे बारीक करून घ्यावी. 
  • एका पातेल्यात गरम पाणी करून त्यामध्ये शेवग्याच्या पानांची पावडर मिसळावी. साखर मिसळावी. तयार झालेल्या शेवग्याच्या पानांचा चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामधून ४ ते ५ थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा. तयार झालेला चहा अतिशय गुणकारी असून चवीला चांगला लागतो. 
  • - ०२४२२-२५२४१४ (विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर,जि.नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com