agricultural news in marathi Health benefits of turmeric mixed milk | Agrowon

आरोग्यदायी हळद मिश्रित दूध

नेहा गोडसे, अमृता राजोपाध्ये-कुलकर्णी
मंगळवार, 2 मार्च 2021

हळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते. जखमेवर उपचार तसेच हळद मिसळलेले दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार लगेच बरे होतात.
 

हळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते. जखमेवर उपचार तसेच हळद मिसळलेले दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार लगेच बरे होतात.

आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमिनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपित करणारी आहे. त्वचेचा रंग उजळतो. रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते. रोजच्या आहारात नियमितपणे वापर केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हळदीत नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कुरक्युमीन रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

फायदे 

  • सर्दीच्या समस्येवर हळद मिश्रित दूध हा चांगला उपाय आहे.
  • आले आणि एक चमचा हळदीच्या मिश्रणात मध मिसळून प्यायल्याने सर्दी -खोकला बरा होण्यास मदत मिळते.
  • हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याने घशातील खवखव कमी होते. या दुधामुळे श्‍वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
  • हळद मिश्रित दुधामुळे यकृत मजबूत होते. यकृताशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे दूध उत्तम उपाय आहे.
  • हळद मिश्रित दुधामध्ये ‘अँटिऑक्सिडंट’ गुणधर्म अधिक असल्याने डोकेदुखी व अंगदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.
  • यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. हळद मिश्रित दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.
  • यामध्ये अँटिव्हायरल गुणधर्म असल्याने शरीरातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिबंध होतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारल्याने यकृतावर होणारा जंतूंचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर हळदीचे गरम दूध प्यायल्याने दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करून शांत झोप मिळण्यास मदत करतात.
  • आयुर्वेदानुसार हळदीचे दूध प्यायल्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

हळद मिश्रित आरोग्यदायी दूध
दूध पूर्णान्न आहे. त्यामुळे दुधात हळद मिसळल्यास आरोग्यास नक्कीच फायदा होतो. यास ‘गोल्डन मिल्क’ असे म्हणतात. याचे अनेक फायदे आहेत. गोल्डन मिल्कमध्ये हळद, आल्याची पूड, वेलची पूड मिसळतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध व इतर मसाल्यांचे पदार्थ मिसळून केलेला काढा अतिशय उपयुक्त आहे.

साहित्य 
एक लिटर दूध, १० ग्रॅम हळद, १०० ग्रॅम सेंद्रिय गूळ पावडर, ५० ग्रॅम जेष्ठमध पावडर

कृती 

  • प्रथम एक लिटर दूध चांगले उकळून घ्यावे. जेणेकरून त्यामध्ये गूळ पावडर मिसळल्यावर फाटणार नाही. दूध चांगले उकळल्यानंतर त्यामध्ये १०० ग्रॅम गूळ पावडर मिसळावी. हे मिश्रण चांगले हलवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये १० ग्रॅम हळद, ५० ग्रॅम जेष्ठमध पावडर मिसळावी.
  • हे सर्व मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवावे. जेणेकरून हळद, गूळ पावडर, जेष्ठमध पावडर या सर्वांचा अर्क दुधात चांगला मिसळला जाईल.

संपर्क : नेहा गोडसे, ९४२२११४१८६
अमृता राजोपाध्ये- कुलकर्णी, ७२१८३२७०१०
(कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे)


इतर महिला
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...
काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनीझुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज,...
आरोग्यदायी किवी फळकिवी  हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
पूरक उद्योगातून महिला गट झाला सक्षमग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण,...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचेपतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात...
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना...कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशाजळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी...
तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळखसांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...