agricultural news in marathi Health benefits Yogurt | Agrowon

आरोग्यवर्धक योगर्ट

शैलेंद्र कटके, प्रा. हेमंत देशपांडे
गुरुवार, 15 जुलै 2021

योगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, आयोडीन आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात.
 

योगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, आयोडीन आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात.

योगर्ट बनविण्यासाठी गाय, म्हैस, शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. योगर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या उपयुक्त जिवाणूला  ‘योगर्ट कल्चर’ म्हणतात. जेव्हा हे उपयुक्त जिवाणू दुधात टाकले जाते, त्यानंतर दुधातील लॅक्टोज आंबते आणि ‘लॅक्टिक अॅसिड’ तयार होते. लॅक्टिक अॅसिडमुळे दूध घट्ट होते आणि त्याला योगर्टची विशिष्ट चव येते. हे तयार झालेले योगर्ट त्यानंतर थंड केले जाते आणि त्यात आवडीनुसार स्वाद मिसळले जातात. आपण ‘फ्लेवर्ड योगर्ट’ म्हणतो. लॅक्टिक अॅसिड बनविणाऱ्या ‘योगर्ट कल्चर’मुळे आंबटगोड चव येते.

ज्या लोकांना डेअरी प्रोडक्ट्सपासून ॲलर्जी असते ते देखील योगर्ट खाऊ शकतात. कारण यामध्ये लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी ॲलर्जी होत नाही. योगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक, पोटॅशिअम, आयोडीन आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. याशिवाय त्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. म्हणून योगर्ट खाणे शरीरासाठी चांगले असते.

योगर्ट उत्पादन 

 • लॅक्‍टोबेसिलाय जिवाणूंच्या मदतीने तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. त्यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. 
 • दूध तापवून कोमट करून त्यात “स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलीस व लॅक्‍टोबॅसिलस डेलब्रुकी” या जिवाणूंचे १:१ प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते. 
 • लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनून घट्टपणा येतो.लॅक्‍टोबॅसिलसमुळे “अँसेटालडीहाइड” सारखी संयुगे बनतात. विशिष्ट स्वाद मिळतो. 
 • योगर्टमध्ये फळांचे रस मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. उदा. स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते. त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात.
 • दही आणि योगर्ट हे दोन्ही पदार्थ जरी सारखे वाटत असले तरी ते एकसारखे नाहीत. हे दुग्धजन्य पदार्थांचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची चवही जवळजवळ सारखीच असते. दही आणि योगर्ट हे जरी एकसारखे वाटत असले तरी ते बनविण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्यातील पोषक तत्त्वांपर्यंत सर्वच भिन्न आहे. म्हणून हे दोन्ही पदार्थही वेगवेगळे आहेत. दह्यामध्ये योगर्टपेक्षा जास्त आंबटपणा असतो. योगर्टच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.

योगर्टचे आरोग्यदायी फायदे 

 • योगर्टमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअमचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे योगर्ट खाणे  हाडे व दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 
 • योगर्ट खाण्यामुळे  हाडे ठिसूळ होऊन ‘ऑस्टिओपोरोसिस’ होण्याचा धोकाही कमी होतो.
 • योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स हे घटक असतात. त्यामुळे योगर्ट खाण्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. 
 • योगर्ट खाण्यामुळे  पोटफुगी, अतिसार, बद्धकोष्ठता यासारख्या पचनासंबंधी समस्या दूर होतात. योगर्ट खाण्यामुळे तोंडाला रुची येण्यास मदत होते.
 • योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स या घटकाबरोबर विविध जीवनसत्त्व आणि खनिजेसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. योगर्ट खाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
 • योगर्टमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे  प्रमाण अधिक असते. योगर्ट खाण्यामुळे रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास व रक्तदाब आटोक्यात राहत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ब्लडप्रेशर नियंत्रित राहणे आणि गुड कोलेस्टेरॉल वाढणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. 
 • योगर्टमध्ये प्रथिनांचे प्रमाण  भरपूर असते. यामुळे भूक नियंत्रित होते. पर्यायाने वजन आटोक्यात राहाते.

-  शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कृषी प्रक्रिया
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....