agricultural news in marathi Healthy cereals | Agrowon

आरोग्यदायी कडधान्ये

अभिलाषा शिंगोटे, डॉ. सुरेंद्र सदावर्ते
गुरुवार, 11 मार्च 2021

मुगामध्ये कर्बोदके ६० टक्के, प्रथिने २१.५ टक्के, ओलावा १२ टक्के, राख ३.२५ टक्के, तंतू  ०.६३ टक्का, तसेच ब व क जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशिअम पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. आहारात मुगाचा समावेश असल्याने अनेक आजारांबाबत प्रतिकारशक्ती वाढते. 

मुगामध्ये कर्बोदके ६० टक्के, प्रथिने २१.५ टक्के, ओलावा १२ टक्के, राख ३.२५ टक्के, तंतू  ०.६३ टक्का, तसेच ब व क जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशिअम पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. आहारात मुगाचा समावेश असल्याने अनेक आजारांबाबत प्रतिकारशक्ती वाढते. 

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक पद्धतीमध्ये मूग, मटकी व उडीद या पिकांचा समावेश करणे आवश्यक आहे. मूग व उडीद यांपासून प्रथिनांचा १८ ते २० टक्के, मेदाचा ६० टक्के पुरवठा होतो. सर्वसाधारणपणे २० टक्के ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने प्रति माणशी, प्रति दिन ८५ ग्रॅम डाळींची गरज असल्याचे सांगितले आहे. मात्र भारतात हे प्रमाण सुमारे ३६.५ ग्रॅम प्रति माणशी, प्रति दिन आहे. मुगाची डाळ थंड, पौष्टिक, हलकी, सारक, पित्तशामक, व पचनास सुलभ असते. 

मुगामध्ये कर्बोदके ६० टक्के, प्रथिने २१.५ टक्के, ओलावा १२ टक्के, राख ३.२५ टक्के, तंतू  ०.६३ टक्का, तसेच ब व क जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशिअम पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. आहारात मुगाचा समावेश असल्याने अनेक आजारांबाबत प्रतिकारशक्ती वाढते. 

मुगाच्या गुणवत्तापूर्ण जाती

  • बीएम ४: ६५ ते ६७ दिवसांमध्ये तयार. याची शिफारस मध्य भारतासाठी करण्यात आली आहे. दाणे मध्यम आकाराचे. कोपरगाव या जातीच्या तुलनेत शेंगाच्या टोकाकडील भागास शेंगा गुच्छामध्ये लागतात. शेंगांवर थोड्या प्रमाणात लव असते. सरासरी उत्पादन ९ ते ११ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
  • बीपीएमआर १४५ :  ६० ते ६५ दिवसांत तयार होते. शेंगा लांब असून दाणे मोठ्या आकाराचे, चमकदार. जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण २० टक्के आहे. हे वाण उंच वाढत असून, त्याची पाने अरुंद असतात. प्रति हेक्टरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन.
  • बीएम २००२-१ :  ६५ ते ७० दिवसांत तयार, दाणे टपोरे हिरवे, जात काढणीस एकाच वेळी येते. शेंगा टोकदार व केसाळ असून, जमिनीकडे झुकलेल्या असतात. प्रति हेक्टरी ७ ते ९ क्विंटल उत्पादन. 
  •  बीएम२००३-०२ : ६५ ते ७० दिवसांत काढणी. दाणे टपोरे हिरवे. काढणीस एकाच वेळी येते. शेंगा लांब असून, दाणे मोठ्या आकाराचे व चमकदार.प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पादन. 

आरोग्यवर्धक फायदे

  • मोड आलेले मूग खाल्ल्याने ब्लड शुगर वाढत नाही. वजन नियंत्रित राहते. यात मोठ्या प्रमाणावर तंतुमय घटक असतात. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे घटक आहेत. मूगडाळ मेटाबॉलिक रेट वाढवण्याचे काम करते. यामुळे शरीराला खूप काळ मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते.
  • मूगडाळीच्या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. या डाळीच्या पाण्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, डेंगीसारख्या धोकादायक आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो.
  • वजन कमी करायचे असेल तर दररोज मूगडाळ पाण्याचे सेवन करावे. या डाळीत कॅलरीची मात्रा कमी आणि तंतुमय घटकांची मात्रा जास्त असते. मूगडाळीचे पाणी मॅटोबॉलिझम देखील वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो.
  • मूगडाळीच्या पाण्यामुळे शरीरात इन्शुलिनची पातळी वाढण्यास मदत होते. मूगडाळीतील घटक रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवते, जे मधुमेह असणाऱ्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • मूगडाळीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील घाण दूर होते. डाळीच्या पाण्यातील घटक यकृत, पित्त, रक्त आणि आतडे देखील स्वच्छ करतात.

- अभिलाषा शिंगोटे, ९१५६३१२६२९
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कडधान्ये
आरोग्यदायी कडधान्येमुगामध्ये कर्बोदके ६० टक्के, प्रथिने २१.५ टक्के,...
कडधान्ये ः प्रथिने, ऊर्जेचा उत्तम स्रोतकडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत....
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
हरभरा पिकाची सुधारित लागवडहरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार...
तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण...सध्याच्या परिस्थितीत तूर पीक कळ्या लागण्याच्या...
हरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवडकोरडवाहू तसेच ओलीताखाली हरभऱ्याच्या विजय,...
रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवडहरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
प्रकाश संश्लेषण, पाणी वापर...चवळी पिकांच्या पर्णसंभारामध्ये प्रकाश संश्लेषण...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
मुग, उडीद पिकाची सुधारित लागवडखरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व...
तंत्र तूर लागवडीचे..जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची...पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार...
गरजेनुसार कडधान्य वाण विकसित करण्याची...कडधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व वाढत्या...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणकाही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...