agricultural news in marathi Healthy Virgin Coconut Oil | Agrowon

आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइल

डॉ.व्ही.व्ही.शिंदे, डॉ.एस.एल.घवाळे
गुरुवार, 22 एप्रिल 2021

व्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. हे शरीरातील चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.
 

व्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. हे शरीरातील चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.

दहा ते अकरा महिन्याच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर जे ऑइल मिळते त्याला व्हर्जीन कोकोनट ऑइल म्हणतात. हे नारळाच्या खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा भिन्न असते. यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे तेल नैसर्गिक सर्वश्रेष्ठ ल्यूरिक आम्लाचा स्तोत्र आहे. हे अत्यंत बहुगुणी आणि बहुपयोगी तेल आहे.

व्हर्जीन कोकोनट ऑईलचे फायदे 
चयापचय क्रिया 

हे शरीरातील चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.

लाल पेशींवर नियंत्रण 
हे ल्यूरिक आम्लाचा स्तोत्र असल्यामुळे ते रक्तातील एकूण लाल पेशी कमी करून आवश्यक मज्जापेशीजाल निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे संरक्षण होते.

शारीरिक वजन हानी भरून काढण्यास मदत 
हे जरी चरबीयुक्त असले तरी प्रत्यक्षात ते शरीरातील वजन हानी भरून काढण्यास मदत करते. निरोगी मध्यम साखळी असणारे चरबीयुक्त आम्ल हे इतर चरबीयुक्त आम्लासारखे रक्त प्रवाहाचा प्रसार करत नाही. ते थेट यकृतात प्रसार करतात आणि त्याचे उर्जेत रूपांतर करतात. त्यामुळे याचे सेवन केल्यास शरिरात चरबी साठविली जात नाही. त्याऐवजी त्याचा वापर ऊर्जा निर्मितीस केला जातो.

मधुमेह नियंत्रण 
हे आपल्या रक्तप्रवाहात शर्करा उत्पादित करत नसून त्याऐवजी रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील इन्शुलिन स्त्रवण्याच्या क्रियेस सुधारणा होते.

हृदयासंबंधी रोगावर नियंत्रण 
पूर्णपणे विरघळलेले व्हर्जीन कोकोनट ऑइल सेवन केल्यास त्यांचे एकूण कॅलरी घेण्याच्या क्षमतेत ३० ते ६० टक्के वाढ होते. तसेच त्यांच्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा दर जवळ जवळ अस्तित्वात नसल्याचे आढळून आले होते.

जठरासंबंधी आजारांवर उपयोगी 
जठरासंबंधी आजार असणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला व्हर्जीन कोकोनट ऑइल लावल्याने संयोगिक जीवनसत्त्व ‘ई’ चा त्वचेद्वारे पुरवठा होतो. ही एक जठरासंबंधी आजारावर पर्यायी उपाय योजना आहे.

रोग प्रतिकारशक्तीमध्ये वाढ 
हे तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.

त्वचेस उपयुक्त
हे तेल त्वचेवर लावल्यास ते जिवाणू प्रतिबंध थर बनवून बाधित भागास संरक्षण कवच म्हणून काम करते. तसेच जखम भरून काढण्यास गती देते.

मेंदू व बुध्दी वर्धक
हे तेल मेंदूचे आकलन कार्य सुधारण्यास, सुरवातीच्या टप्प्यातील चेतातंतू सुधारणेस चालना देते.

रोगमुक्ततेस गती 
हे तेल लोकांचे आजारपण बरे करण्यास गती देते. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. एथेरोस्क्लेरोसिस, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. पचनक्रिया सहजतेने होण्यास मदत करते. चयापचय उत्तेजित करते व लठ्ठपणा प्रतिबंधित करते. जीवनसत्वे, खनिजे व अमिनो आम्लाचे शरीरात मोठ्याप्रमाणात शोषण वाढवते.

खाद्य पदार्थ सौंदर्य प्रसादनात वापर 
चीज व आइस्क्रीममध्ये याचा वापर केला जातो. अखाद्य पदार्थ
वर्गवारीमध्ये, त्वचा व केसांना लावण्यासाठी वापर, अॅरोमाथेरपी व मसाज ऑइल म्हणून वापर होतो. तसेच सौंदर्यवर्धक आणि त्वचेस उपयुक्त म्हणून वापर केला जातो.

नारळ पाणी पिण्याचे फायदे 

  • नारळ पाण्यामध्ये इलेट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, जीवनसत्व क आणि फोलेट यासारखे पौष्टिक घटक असतात.
  •  नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही विपरीत परिणाम होत नाही.
  •  नारळ पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी आहे. २५० मिलि नारळाच्या पाण्यात कर्बाचे प्रमाण-९ ग्रॅम, तंतू-३ ग्रॅम, प्रथिने-२ ग्रॅम, जीवनसत्त्व क- १० टक्के, मॅग्नेशिअम-१७ टक्के, सोडियम- ११ टक्के, कॅल्शिअम- ६ टक्के असते. तसेच ते मानवाच्या शरिरात चांगल्या प्रकारे परिणामकारक ठरते.
  • शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवली असल्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी सेवन करणे चांगले असते.
  •  नारळ पाणी प्यायल्यामुळे पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतडयांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच आपल्या शरीरास ऊर्जा देण्याचे कार्य करते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून सुटका होते.
  •  नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्व सी, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम यासारखे पोषक गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • फेसपॅक म्हणून देखील याचा वापर केला जातो.
  • उन्हाळ्यात टॅनिंग काढून टाकण्यासाठी नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुतल्यामुळे टॅनिंग कमी होते, चेहरा थंड राहतो.
  • नारळ पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.

संपर्क - ०२३५२-२५५०७७
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी)


इतर कृषी प्रक्रिया
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...
लसणापासून लोणचे, जेली, चटणीलसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग...