agricultural news in marathi hygiene in Village, promotion of experimental farming | Agrowon

ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालना

माणिक रासवे
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे.

डिसेंबर, २०१७ मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेने निवडून दिल्यामुळे मी लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी) गावचा सरपंच झालो. ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. यापूर्वी नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळजोडणी तसेच हातपंपाद्वारे कुटुंबांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जाते असे. परंतु पाणी गुणवत्ता तपासणीनंतर ग्रामस्थांच्या निरोगी आरोग्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्र बसविले. त्याद्वारे प्रत्येक कुटुंबास पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध पाणी दिले जाते.

लोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे पाणीपुरवठा योजनेच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींचे काम सुरू करण्यात आले आहे. गावशिवारातील ओढ्यावर दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. शेतरस्त्याचा हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी जमा केली. त्याद्वारे जवळपास अर्धा किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. शेती विकासासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

ग्राम विकासाचे उपक्रम

 • गावामध्ये पंधरा स्वयंसाह्यता बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या आहेत. यातून महिन्याकाठी गरजू व्यक्तींना कर्ज दिले जाते.
 • ग्राम शिक्षण समितीच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्यांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन. 
 • गावातील अनेक जण सैन्यदल, सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांचा ग्रामपंचायतीतर्फे गौरव. 
 • ग्रामपंचायतीच्या आजी -माजी पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. 
 • जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण.  
 • लॉकडाउनच्या काळात गावातील ऊसतोड कामगारांना गावी सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न. 
 • तांडा वस्ती सुधार योजनेतून त्या ठिकाणी शाळा वर्गखोल्या, रस्ते, पथदिव्याची सुविधा.     

ग्राम स्वच्छतेवर भर 

 • ग्रामपंचायतीस वित्त आयोगाचा निधी, समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्राप्त विकास निधीतून गावामध्ये सिमेंट रस्ते बांधले, पेव्हर  ब्लॉक बसविले. ग्राम स्वच्छतेवर भर दिला.
 • ग्रामपंचायतीने घंटा गाडी सुरू केली आाहे. 
 • गावातील ९० टक्के कुटुंबात स्वच्छतागृह बांधकाम करून वापर सुरू केला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह प्रस्तावित आहे.
 • गावाजवळील स्मशानभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून, रंगरंगोटी करून, सुशोभीकरण करून, तेथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. 
 • शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी, गावातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून त्यांना ट्री गार्ड बसविण्यात आले आहेत. 

 


इतर ग्रामविकास
ग्रामविकासात बँकेचे महत्त्वबँकेच्या राष्ट्रीयीकरणाबरोबरच केंद्र शासनाने बी....
फुलशेतीत शिरसोलीने तयार केली ओळखशिरसोली (ता.जि. जळगाव) गावाने खानदेशात फुलशेतीत...
सुधारीत शेतीची मिळाली नवी दिशाऔरंगाबाद जिल्ह्यातील गोपाळवाडी गाव राष्ट्रीय...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
शेती, पूरक उद्योगावर दिला भरकुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे...
महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकाससामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी...
पाणीपुरवठा, जलपुनर्भरणाच्या कामांना आता...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
लोक सहभाग हाच विकासाचा पायाकुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा...
ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालनालोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे ...
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मातजालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या...
गावामध्ये असावी संयुक्त कुरण व्यवस्थापन...शेती परिवार कल्याण संस्था गावशिवारातील माळरानावर...
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्नतीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत...