agricultural news in marathi Identification, symptoms, remedies of Tuta Absoluta insect on tomato | Agrowon

टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख, लक्षणे, उपाययोजना

गणेश पडगळ
मंगळवार, 15 जून 2021

टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत आहे. या किडीची सविस्तर ओळख, नुकसानीची लक्षणे ओळखून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे.
 

टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत आहे. या किडीची सविस्तर ओळख, नुकसानीची लक्षणे ओळखून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे.

यंदाच्या वर्षी उन्हाळी टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या किडीची नेमकी ओळख करून घेणे व वेळीच उपाय करून ती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. टुटा किडीविषयी जाणून घेऊया. या किडीचे मूळ ठिकाण 'पेरू' देश आहे.

ही कीड दक्षिण अमेरिकेत खूप उपद्रवी असल्याने त्यास ‘साऊथ अमेरिकन मॉथ' या नावाने सुद्धा ओळखले जाते. आपल्या देशात व महाराष्ट्रात २०१४ मध्ये ती सर्वप्रथम आढळली.

नुकसानीचा प्रकार व लक्षणे

 • टुटा अळी मुख्यत्वे टोमॅटो पिकावर आपली उपजीविका करते. या व्यतिरिक्त मिरची, बटाटा, सिमला मिरची व वांगी या ‘सोलॅनॅनिसी’ वर्गातील पिकांचेही देखील ती नुकसान करते.
 • मादी साधारणतः २०० ते २६० अंडी एकावेळी पानाच्या खालील बाजूला किंवा फांदीवर घालते. -अंड्यातून बाहेर पडलेली अळी पांढरट व कालांतराने पिवळी दिसते.
 • ती पानांमध्ये ‘गॅलरी’ तयार करते व नंतर कोवळ्या फांद्या व हिरवी फळे यांना हानी पोहोचवते.
 • जास्त उद्रेक असल्यास पाने जळून जातात.
 • जसजशी अळी मोठी होते तसतशी हिरवट दिसू लागते. डोक्यावर काळसर पट्टा दिसतो.
 • पूर्ण परिपक्व अळी साधारण ९ मिमी म्हणजेच तांदळाच्या दाण्याच्या आकाराएवढी असते.
 • त्यानंतर गॅलरी बाहेर येऊन मातीमध्ये अथवा पानांना गुंडाळून कोषावस्थेत जाते.
 • उष्ण, ढगाळ वातावरण पतंग कोषातून लवकर बाहेर पडण्यास पोषक असते.
 • कोषातून बाहेर पडलेला पतंग अंधारप्रिय असल्याने दिवसा पानांच्या मागच्या बाजूस ते लपून राहतात. रात्रीचे बाहेर पडतात.
 • अळी पानांवरती व फळांवरती गॅलरी तयार करते. त्यानंतर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो. अशी फळे बाजारात विकता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

पोषक हवामान
टुटा किडीसाठी हिवाळा किंवा खूप उष्ण व कोरडे वातावरण प्रतिकूल असते. त्यामुळे या दिवसांत एक जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी ३० ते ७४ दिवस लागतात. कोषावस्थाही दीर्घ होते. त्यामुळे पावसाळ्यात, हिवाळ्यात व अति उष्ण, कोरड्या भागात या किडीचा उपद्रव दिसत नाही. उन्हाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते एप्रिल २८ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता ५५ ते ६० टक्के हे वातावरण उपद्रवासाठी पोषक असते. त्यामध्ये ही कीड जीवनक्रम १८ ते २२ दिवसांत पूर्ण करते व त्यांची संख्या झपाट्याने वाढते. यावर्षी डिसेंबरपासून प्रत्येक १५ दिवसांत पाऊस अथवा ढगाळ वातावरण राहिल्याने प्रादुर्भाव वाढण्यास मदत मिळाली.

किडीची नेमकी ओळख 
नेहमीची नागअळी, फळमाशी आणि टूटा यांच्या ओळखण्यामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून पुढील बाबी गोष्टी तपासाव्यात.

 • नेहमीची नागअळी पानांवर नागासारख्या रेषा ओढते. आकाराने ती टूटा किडीपेक्षा खूप लहान असते.
 • फळमाशी फळाला दंश करते. फळ कापल्यावर आतमध्ये लहान सुतके आढळतात.
 • टुटा फळाच्या सालीवर गॅलरी बनवते. पाने गुंडाळते.

टुटा किडीचे एकात्मिक नियंत्रण

 • प्रभावी नियंत्रणासाठी किडीचा उद्रेक, झपाट्याने वाढ होणारे वातावरण व पिकांची अवस्था यांची माहिती असणे फार गरजेचे आहे.
 • प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा.
 • डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत जास्त प्रादुर्भाव होत असल्यामुळे उपजिवीकेसाठीच्या गवतांचे नियंत्रण करावे.
 • आधीच्या पिकाची काढणी झाल्यानंतर शेत तळपू द्यावे. यामुळे कोषावस्था नष्ट होण्यास मदत होते.
 • रोपवाटिकेद्वारे किडीचा प्रसार होऊ नये म्हणून त्यास ‘इन्सेक्ट प्रूफ नेट' लावावे.
 • रोपांची दाट लागवड टाळावी.
 • पिवळे चिकट सापळे व त्याला टूटा या किडींसाठीचे ल्यूर सुरवातीला शेतात लावावेत. त्यामुळे कीड शेतात आलेली समजते. त्यावेळेसच अटकाव होण्यास मदत होते.
 • पतंग अवस्था अंधारप्रिय असल्याने झाडाच्या खाली व पानांच्या मागील बाजूस दडलेले असतात. त्यामुळे टोमॅटोचे दोन ते तीन तोडे झाल्यानंतर खालील बाजूची एक ते दीड फूट पाने काढून टाकावीत. -रात्रीच्या वेळेस एकरी २ ते ३ प्रकाश सापळे लावावेत.
 • 'आयआयएचआर’ या बंगळूर स्थित संस्थेने विकसित केलेला अर्का-टूटा सापळा आहे. शिफारसीनुसार त्याचा वापर करता येईल.
 • टोमॅटो पीक घेण्याआधी वा काढणी झाल्यानंतर सोलेनेसी वर्गातील पिके (उदा. मिरची, बटाटा, सिमला मिरची, वांगी) त्या शेतात घेऊ नयेत.
 • झाडाला अजैविक ताण देऊ नये. म्हणजेच पाणी कमी किंवा जास्त देऊ नये. वाढीनुसार योग्य अन्नद्रव्ये खतांमार्फत द्यावीत.
 • टूटा किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ट्रायकोडर्मा प्रजाती मित्रकिटकांचा एक लाख अंडी प्रति एकर याप्रमाणेही वापर करतात.

रासायनिक नियंत्रण
बंगळूर येथील ‘आयआयएचआर’ संस्थेने केलेल्या शिफारशी पुढीलप्रमाणे.
प्रति लिटर पाण्यासाठी

 • -इंडोक्साकार्ब (१४. ५ एससी)- एक मिली किंवा
 • क्लोरॲंट्रानीलीप्रोल (१८. ५ टक्के)- ०.३ मिली किंवा
 • फ्लुबेन्डायअमाइड (४८० एससी)- ०.२५ मिली

टीप

 • वरील कीडनाशके लेबल क्लेमयुक्त नसली तरी ‘आयसीएआर’ अंतर्गत संस्थेतील म्हणून प्रमाणित मानली आहेत. शेतकरी संस्थेतील शास्त्रज्ञांचा अधिक सल्ला घेऊ शकतात.
 • ही कीड खूप कमी म्हणजेच १८ ते २२ दिवसांत एक पिढी पूर्ण करते. त्यामुळे किटकनाशकांप्रति प्रतिकारशक्ती येऊ शकते. यामुळे कीटकनाशके आळीपाळीने किंवा योग्य दिवसांच्या अंतरानेच फवारावीत.

संपर्क- गणेश पडगळ-९७३०९५६४४४


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...