टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांची ओळख

सातत्याने बदलणारे तापमान व अनुकूल वातावरणामुळे टोमॅटोमध्ये विषाणूचा प्रसार करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. विषाणूजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन रोगाची तीव्रता झपाट्याने वाढते.
Symptoms of Ground Nut Bud Necrosis Virus and Tomato Leaf Curl Virus.
Symptoms of Ground Nut Bud Necrosis Virus and Tomato Leaf Curl Virus.

सातत्याने बदलणारे तापमान व अनुकूल वातावरणामुळे टोमॅटोमध्ये विषाणूचा प्रसार करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. विषाणूजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन रोगाची तीव्रता झपाट्याने वाढते.

याशिवाय विषाणूजन्य रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरणारी महत्त्वाची कारणे - रोग नियंत्रणासाठी रोपवाटिकेत काळजी न घेणे,  शिफारशीनुसार हंगामासाठी योग्य जातींची निवड व लागवड न करणे, इ.

टोमॅटो पिकावर सुमारे १५-२० प्रकारचे वेगवेगळे विषाणूजन्य रोग कमी जास्त प्रमाणात स्वतंत्र किंवा एकत्रितपणे आढळतात. प्रसारक किडी

  • मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे इ. रसशोषक किडी.
  • काही विषाणू रोगांचा प्रसार स्पर्श, रोगग्रस्त बियाणे तसेच पिकांच्या अवशेषांमार्फतही होतो. म्हणून विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासून अवशेषांच्या व्यवस्थापनापर्यंत योग्य त्या उपाययोजनाचा अवलंब केला पाहिजे.
  • कुकुंबर मोझॅक व्हायरस CMV (काकडी मोझॅक विषाणू) टोमॅटो पिकावर अन्य विषाणूजन्य रोगाच्या तुलनेत सर्वाधिक प्रादुर्भाव. प्रसार :  मावा विषाणू :  कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाची लक्षणे 

  • पानांवर हिरवट व पिवळे असंख्य ठिपके. लक्षणे थोड्या फार फरकाने टोमॅटो मोझॅक (टोबॅको) व्हायरससारखीच असू शकतात.
  • अधिक प्रादुर्भावात फांद्यांचा आकार बुटाच्या लेसप्रमाणे किंवा दोरीसारखा होतो.
  • यजमान वनस्पती :  टोमॅटो शिवाय काकडी, शेंगावर्गीय पिके, बटाटा, पपई, केळी, मिरची, जंगली वनस्पती, तसेच तणे इ. १२०० पेक्षा जास्त यजमान (होस्ट) वनस्पतींची नोंद. त्यामुळे या रोगाचा पूर्ण बंदोबस्त करणे तसे अवघड जाते.
  • टोमॅटो मोझॅक व्हायरस (ToMV) प्राथमिक प्रसार :  यांत्रिकरीत्या. (यंत्रे, अवजारे, काम करणाऱ्या मजुरांचे हात इ.) लक्षणे 

  • निरोगी टोमॅटो झाडांना संसर्ग झाल्यास प्रथम पानांवर हिरवट पिवळसर रंगांचे ठिपके दिसतात.
  • झाडांची पाने वेडी वाकडी (विकृत), खडबडीत आणि साधारण पानांपेक्षा लहान.
  • पानांचा मूळ आकार बदलून ‘फर्न लीफ’ नेच्याप्रमाणे दिसतात.
  • प्रादुर्भावग्रस्त झाडे खुंटलेली, फिक्कट हिरवी आणि बारीक राहतात.
  • यजमान वनस्पती :  टोमॅटोशिवाय तंबाखू, ढोबळी मिरची, बटाटा, सफरचंद, नासपती, चेरी इ. असंख्य तणे (पिगवीड आणि कोकरू इ.)
  • टोबॅको व्हेन डिस्टॉरशन व्हायरस (तंबाखू शिरा विकृती विषाणू) प्रसार :  प्रामुख्याने मावा किडीमार्फत. लक्षणे 

  • विषाणूसंक्रमित टोमॅटो पानावर पिवळ्या रंगाचे पट्टे दिसतात.
  • प्रादुर्भावग्रस्त पानांचे देठ लांबट होऊन शिरा जाड होतात. पानांचा आकार बदलतो.
  • विकृत झाडावरील फळांवर पिवळसर, गोलाकार किंवा असमान आकाराचे चट्टे आढळतात.
  • यजमान वनस्पती :  टोमॅटोशिवाय धोतरा, तंबाखू इ.
  • ग्राउन्डनट बड नेक्रॉसिस व्हायरस (भुईमूग कळीवरील नेक्रोसिस विषाणू) प्रसार :  मुख्यत्वे फुलकिडे (थ्रिप्स). लक्षणे 

  • प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या फांदीचे शेंडे कोमेजतात. त्यावर काळपट तपकिरी रंगाचे बारीक ठिपके दिसतात.
  • अधिक प्रादुर्भावात झाडाच्या फांद्या व पाने कोमेजून झाड मरते.
  • यजमान वनस्पती :  टोमॅटोशिवाय भुईमूग आणि अन्य शेंगावर्गीय पिके इ.
  • टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस प्रसार :  पांढरी माशी. लक्षणे 

  • पानावर अनियमित निरनिराळ्या रंगांचे, आकाराचे ठिपके (क्लोरोटिक) लक्षणे दिसतात. पानांच्या शिरा हिरव्या राहून, दोन शिरांमधील भाग पिवळसर होतो. पिवळसरपणा हळूहळू तीव्र होतो.
  • विषाणूची लक्षणे झाडाच्या शेंड्यांकडील पानावर दिसतात.
  • जुनी पाने नेक्रोसिससह तांबूस तपकिरी रंगाची आणि लाल रंगाची होऊ लागतात. झाडाच्या वाढीचा जोम कमी होतो. फळांच्या आकारात वेगळेपणा येतो.
  • ही लक्षणे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणाऱ्या पिवळेपणाप्रमाणेच असल्याने रोग ओळखण्यात अडचणी येतात.
  • यजमान वनस्पती :  टोमॅटोशिवाय ढोबळी मिरची, वांगी इ.
  • टोमॅटो लिफ कर्ल व्हायरस (पर्णगुच्छ विषाणू) प्रसार :  पांढरी माशी. रोगाची लक्षणे 

  • पाने वेडी वाकडी होतात. (स्थानिक भाषेत -चुरडा मुरडा). आकाराने लहान राहून झाडाची वाढ खुंटते.
  • नवीन येणारी पानेही अशीच लक्षणे दाखवतात. पानांच्या शिरा आणि कडा पिवळ्या होऊन वरील बाजूने आत वळतात. पानांचा आकार चहाच्या कपासारखा दिसतो.
  • प्रादुर्भाव झालेली पाने जाड आणि खडबडीत होऊन जांभळी रंगाची होतात.
  • फळे धारण होण्यापूर्वीच फुले गळून पडू शकतात.
  • यजमान वनस्पती - बटाटा, तंबाखू, सर्व प्रकारची शेंगावर्गीय पिके, ढोबळी मिरची इ.
  • महत्त्वाचे.... टोमॅटो पिकावर एकावेळी कोणत्या एकाच विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव असल्यास ओळखणे सोपे होते. मात्र एकाच वेळी मावा, तुडतुडे, पांढरी माशी अशा एकापेक्षा अधिक रसशोषक किडींचा प्रादुर्भाव एकत्रित झाल्यास विषाणूजन्य रोगांची लक्षणेही एकत्रितपणे दाखवली जातात. परिणामी, पाने व फळे यांच्या बाह्य लक्षणावरून विषाणूंची ओळख पटवणे अवघड जाते. विषाणूस स्वतःचे चल अचल अवयव नसतात. ते स्वतः एका झाडावरून दुसऱ्या झाडावर संक्रमित होत नाहीत. त्यांचा प्रसार इकडून तिकडे जाणाऱ्या किडी व अवजारांमार्फत होतो. मुख्य पीक उपलब्ध नसल्यास हे विषाणू अन्य यजमान वनस्पती/ पिकांवर आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रसारक किडी व यजमान वनस्पतींची यांचे एकत्रित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. -  डॉ. तानाजी नरुटे, ९४२२३९२३७० (वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com