agricultural news in marathi Importance of fibrous matter in animal feed | Agrowon

पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्व

डॉ.प्रफुल्लकुमार पाटील, डॉ.सौ.मत्स्यगंधा पाटील
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

पशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या पोटाची, आतडयाची योग्य हालचाल होऊन पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचे नियंत्रण करण्यास तंतुमय पदार्थ मदत करतात.
 

पशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या पोटाची, आतडयाची योग्य हालचाल होऊन पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचे नियंत्रण करण्यास तंतुमय पदार्थ मदत करतात.

जनावरांचे उत्तम आरोग्य, जलद वजनवाढ आणि मुबलक दूध उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जनावरांचा आहार. दैनंदिन आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्त्व यांचा कमी-जास्त प्रमाणात जनावरांच्या आहारात वापर होत असतो. कर्बोदकांमधील जलद पचणारा व शरीराला साखर व ऊर्जा पुरवणारा एक भाग असतो त्याला फायबर (तंतुमय पदार्थ) असे म्हणतात. या तंतुमय पदार्थामध्ये सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, लिग्नीन इ. घटक असतात. पशू शरीरामध्ये जसे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, आणि जीवनसत्त्वाचे कार्य असते, त्याच पद्धतीने पशुआहारामध्ये तंतूमय पदार्थांना महत्त्व आहे.

तंतुमय पदार्थांचा पुरवठा 

 • हिरवा चारा, वाळलेला चारा, चुन्नी, भुसा, धान्याचा कोंडा, टरफले, शेतातील दुय्यम पदार्थांमधून जनावरांना तंतुमय पदार्थाचा पुरवठा केला जातो.यामध्ये परिणामकारक तंतुमय पदार्थ असा एक तंतुमय पदार्थाचा भाग आहे. हे परिणामकारक तंतुमय पदार्थ विशेषतः लांब धाटाचे गवत योग्य स्थितीत वाळवून (हे बनवून) जनावरांना दिल्यास त्यातून पुरवठा केला जातो.
 • तंतुमय पदार्थामधील सेल्युलोज, हेमिसेल्युलोज यांचे पचन होवू शकते, परंतु लिग्नीनचे पचन होत नाही. यामुळे निबर चारा, स्थितीच्या पुढे गेलेला चारा, जास्त दिवस शेतात राहून वाळणारा चारा यामध्ये लिग्नीनचे प्रमाण जास्त होऊन त्याची पचनक्षमता कमी होते. म्हणून उत्तम तंतुमय पदार्थ मिळविण्यासाठी चाऱ्याची कापणी योग्य स्थितीमध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे.

जनावरांच्या आहारातील तंतुमय पदार्थाचे फायदे 

 • जनावरांच्या पोटाची, आतडयाची योग्य हालचाल होऊन पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.
 • जनावरांचे पोट गच्च होणे, पोटफुगी टाळली जाते.
 • तंतुमय पदार्थ पोटातील पाणी शोषून घेऊन फुगतात. यामुळे जनावरांना पोट भरल्याचे समाधान मिळते.
 • जनावरांची पाणी पिण्याची क्षमता वाढते.
 • दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
 • जनावरांची स्वयंक्रिया उत्तम राहते.
 • जनावरांचे पोट साफ होण्यास मदत होते.
 • जनावरांतील स्थूलपणा कमी करण्यास मदत होते.
 • रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचे नियंत्रण करण्यास तंतुमय पदार्थ मदत करतात.
 •  जनावरांची चर्वण क्षमता उत्तम राहते. लाळ जास्त प्रमाणात तयार होऊन ती चाऱ्यामध्ये मिसळली जाते. यामुळे कोटीपोटातील सामू टिकून राहण्यास मदत होते.
 • पोटाची व आतड्याची शोषणक्षमता उत्तम राहते.
 • कोटीपोटातील, आतडयातील उपयुक्त जीवजंतुच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करतात.
 • कोटीपोटातील तयार होणाऱ्या व्होलाटाईल फॅटी ॲसिडचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.
 • जनावरांतील चारा खाण्याचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

तंतुमय पदार्थांची उपयोगिता वाढविण्यासाठी उपाययोजना 

 • चाऱ्याची कुटी एकदम बारीक न करता १ ते २ इंच आकाराची करावी. एकदम लहान तुकडे केल्यास तंतूमय घटकांची उपयुक्तता कमी होते.
 • जनावरांच्या आहारात लांब धाट असलेला चारा योग्य स्थितीत वाळवून द्यावा.
 • शेतातील दुय्यम पदार्थावर, युरिया, मळी/ गूळ, क्षारमिश्रण, वाफ, सोडियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईडची योग्य प्रमाणात प्रक्रिया करावी.
 • जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये वाळलेला चाऱ्याचा योग्य प्रमाणात ‘टोटल मिक्स राशन' पदधतीने वापर करावा.
 • वाळलेला चारा, पशुखाद्य वापरून संतुलित संपूर्ण खाद्य गोळीपेंड तयार करावी.
 • वाळलेला चारा, पशुखाद्य यांचे ब्लॉक्स तयार करावेत.
 • जनावरांना पिण्यास मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
 • जनावरांच्या आहारात केवळ वाळलेला चाराकिंवा हिरव्या चाऱ्याचा वापर न करता दोन्हीचे मिश्रण द्यावे.
 • चाऱ्याची कापणी योग्य स्थितीत करावी.

संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)


इतर कृषिपूरक
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...
कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः...
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...