द्रवरूप जिवाणू खते महत्त्वाची...

जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीडनाशक आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीपूर्वी दोन तास अगोदर बियाणास जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून ते सावलीत सुकवावे. त्यानंतर बियाणे पेरणीसाठी वापरावे.
seed treatment
seed treatment

जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीडनाशक आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीपूर्वी दोन तास अगोदर बियाणास जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून ते सावलीत सुकवावे. त्यानंतर बियाणे पेरणीसाठी वापरावे. घनरूप जिवाणू खते म्हणजेच जिवाणू प्रयोगशाळेत वाढल्यानंतर टाल्कम पावडर किंवा लिग्नाइट पावडर यांच्यामध्ये ते मिसळले जातात. त्यामध्ये असणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण योग्य राखले जाते. पिशव्यांमध्ये बंद करून पावडर स्वरूपातील जिवाणू खते शेतकऱ्यांना पुरवली जातात. द्रवरूप स्वरूपामध्ये जिवाणू खते प्रयोगशाळेत तयार केली जातात आणि द्रवरूप स्वरूपातच बाटल्यांमध्ये बंद करून ती शेतकऱ्यांना पुरवली जातात. द्रवरूप जिवाणू खते वापरणे फायदेशीर आहे. द्रवरूप जिवाणू खते : विविध माध्यमांचा वापर करून द्रवरूप स्वरूपामध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरीलम, ॲसेटोबॅक्टर, रायझोबियम, पी.एस.बी., के.एम.बी. ही जिवाणू खते तयार केली जातात. प्रत्येक जिवाणू वाढीसाठी आवश्यक त्या घटकांवरच वाढवले जातात. यांना चांगले वाढण्यासाठी मिश्रण सतत हलते (घुसळत) ठेवावे लागते. पूर्ण वाढ झाल्यानंतर सूक्ष्म दर्शिकेखाली प्रमाण तपासून बाटलीबंद केले जाते. द्रवरूप जिवाणू खतांचे फायदे 

  • वापरण्यास सहज सोपी असतात.
  • ठिबक सिंचनातून सहजरीत्या पिकांच्या मुळांपर्यत देता येतात.
  • पिकांची उगवण चांगली होते.
  • पिकांची जोमदार वाढ होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • जिवाणू खते तयार केल्यानंतर एक वर्षापर्यंत वापरता येतात.
  • जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो.
  • पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते.
  • जिवाणूंचे प्रमाण खूपच चांगले असल्याने पिकांवर चांगले परिणाम दिसतो.
  • हाताळण्यासाठी सहज आणि सुलभ.
  • प्रति एकर प्रमाण कमी लागते (अडीच लिटर).
  • द्रवरूप जिवाणू खते वापरण्याची पद्धत  जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीडनाशक आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीपूर्वी दोन तास अगोदर प्रति दहा किलो बियाण्याला २५० मिलि जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून ते सावलीत सुकवावे. बियाण्याचे टरफल निघणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर पेरणी करावी. पावडर स्वरूपातील जिवाणू खते  विविध माध्यमांचा वापर करून पावडर स्वरूपातील ॲझोटोबॅक्टर,ॲझोस्पिरीलम, ॲसेटोबक्टर, रायझोबियम, पी.एस.बी., के.एम.बी. ही जिवाणू संवर्धके तयार केली जातात. ॲझोटोबक्टर, ॲझोस्पिरीलम, ॲसेटोबॅक्टर, रायझोबियम हे जिवाणू वातावरणामध्ये असणारा नत्र (७८ टक्के) स्थिर करून पिकांना उपलब्ध करून देतात. मुळांद्वारे शोषून तो पिकांना पुरवतात. कारण वनस्पती/पिके नत्र जशाचा तसा घेऊ शकत नाहीत. रायझोबियम हे जिवाणू पिकांच्या मुळावर गाठी तयार करतात व सहजीवी पद्धतीने पिकांना नत्र उपलब्ध करून देतात. ॲझोस्पिरीलम हे जिवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने पिकांना नत्र उपलब्ध करून देतात. संपर्क - श्रीमती एस. आर. सालके, ९०४९६४६७६३, डॉ. श्रद्धा वाबळे, ७८८८०३९२२४ (कृषी महाविद्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com