agricultural news in marathi Important matters in goat rearing | Page 3 ||| Agrowon

शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबी

अमृता राजोपाध्ये - कुलकर्णी
शनिवार, 24 एप्रिल 2021

आपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी जास्त वाढ असलेल्या जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांची पैदास होऊ शकते. अशा प्रकारचे बोकड हे कमीत कमी वयात जास्त वजन वाढणारे असतात.
 

आपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी जास्त वाढ असलेल्या जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांची पैदास होऊ शकते. अशा प्रकारचे बोकड हे कमीत कमी वयात जास्त वजन वाढणारे असतात.

शेळीपालन करताना सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्‍चित करणे. बरेच शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदाशीसाठीच विक्री करायची असा उद्दिष्ट ठेवतात. यासाठी जास्त मागणी असणाऱ्या शेळ्यांच्या जातीची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरू करावा लागतो. सुरुवातीला स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालनापेक्षा अशा प्रकारात जास्त गुंतवणूक असते. आपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली, तरी जास्त वाढ असलेल्या जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांची पैदास होऊ शकते. अशा प्रकारचे बोकड हे कमीत कमी वयात जास्त वजन वाढणारे असतात. म्हणून कमीत कमी दिवसांत जास्त वजन देणारे बोकड तयार करणे चांगले ठरते.

शेळीपालनाची सूत्रे 

 • शेळ्यांच्या नवनवीन जातींचा अभ्यास, बाजारपेठेतील मागणीनुसार गोठ्यामध्ये दरवर्षी वेगळ्या जातीचा नर आणून त्याची पैदास करावी.
 • वेतावर आलेल्या शेळीला एक महिना आणि व्यायल्यानंतर एक महिना स्वतंत्र कक्षामध्ये व्यवस्थापन करावे. त्यामुळे शेळीची दूध देण्याची क्षमता वाढते. शेळी आणि करडामधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते. त्यामुळे नवजात पिले सशक्त व निरोगी राहतात.
 • शेळ्यांची आरोग्य तपासणी तसेच शिफारशीनुसार लसीकरण करावे. घटसर्प, लाळ्या खुरकूत व बुळकांडी तसेच गाभण शेळ्यांना धनुर्वाताचे लसीकरण करावे.
 • दर तीन महिन्यांनंतर एक महिना वयाच्या पुढील पिले व शेळ्यांना जंतनाशकाचा वापर करावा.
 • पशुवैद्यकाकडून शेळ्यांच्या व्यवस्थापनाबाबत सातत्याने चर्चा आणि उपाययोजना करावी.
 • काटेकोरपणे शेळी व्यवस्थापन, निगा व स्वच्छता याबाबींवर बारकाईने लक्ष द्यावे. जमा खर्चाची नोंद ठेवावी. तसेच शेळ्यांच्या जन्म, मृत्यू, विक्रीची नोंद ठेवावी.
 • पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात यावा. अस्वच्छ पाण्यामुळे रोगप्रसार होतो. त्यासाठी पाणी साठवण्याच्या टाक्या, भांडी नियमितपणे स्वच्छ करावीत.
 • सर्वसाधारणपणे ४० किलो वजनाच्या शेळीला ५ ते ६ लिटर पाणी दररोज लागते. दूध देणाऱ्या शेळ्या दर लिटर दुधामागे १.५ लिटर पाणी जास्त पितात. दमट हवामानामध्ये त्यांना जास्त पाणी लागते.
 • अर्धा वाटा पद्धतीने शेळ्या शेतकऱ्यांकडे सांभाळण्यास दिल्यास, त्या माध्यमातून विना खर्चिक उत्पन्न सुरू झाले. अशा पद्धतीने २५ शेळ्या शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन फायदेशीर ठरेल.
 • दहा बाय अडीच फुटाच्या दोन टाक्‍यांमध्ये शेळ्यांची लेंडी आणि मलमूत्राद्वारे खतनिर्मिती, गांडूळ खतनिर्मिती करावी. या खताचा शेतीमध्ये वापर करावा.

शेळ्यांचा आहार 

 • शेळ्यांना विविध प्रकारचा झाडपाला आवडतो. झाडांची कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा त्या आवडीने खातात.
 • शेळीला तिच्या वजनाच्या ३-४ टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने एका प्रौढ शेळीला दररोज साधारण ३-४ किलो हिरवा चारा, ७५० ग्रॅम ते १ किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पूर्ततेसाठी २००-२५० ग्रॅम संतुलित पोषण आहार प्रतिदिन द्यावा.
 • करडांना १५ किलो वजनाच्यापुढे १०० ग्रॅम कडबा कुट्टी/ वाळलेला चारा द्यावा व तो पुढील प्रति ५ किलो वजनास ५० ग्रॅम या दराने वाढवावा.

संपर्क : अमृता राजोपाध्ये –कुलकर्णी,७२१८३२७०१०
(कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे)


इतर कृषिपूरक
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...