भाजीपाला पिकांचे सुधारित व्यवस्थापन

कोकण विभागात पावसानंतरच्या ओलाव्यावर कमी कालावधीत येणारी भाजीपाला पिके लागवडीस चांगला वाव आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भाजीपाला पिकाच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.
 vegetable crops
vegetable crops

कोकण विभागात पावसानंतरच्या ओलाव्यावर कमी कालावधीत येणारी भाजीपाला पिके लागवडीस चांगला वाव आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भाजीपाला पिकाच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. वांगी सुधारित जाती कोकण प्रभा  - लांब आकर्षक चमकदार जांभळ्या रंगाची फळे. - फळे घोसाने लागतात. -अणुजीवजन्य मर रोग प्रतिकारकक्षम. - चांगला टिकाऊपणा. - उत्पादन ः हेक्टरी ३०० ते ३१० क्विंटल रोप निर्मिती 

  • १ मी. रूंद, ३ मी. लांब व १५ सें. मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. वाफ्याच्या रूंदीस समांतर १० सें. मी. अंतरावर १ सें. मी. खोलीवर बियाण्यांची पातळ पेरणी करावी. बी पेरणी झाल्यापासून ४ ते ५ आठवड्यांनी रोपे १२ ते १५ सें.मी. उंचीची होऊन लागवडीस तयार होतात.
  • रोपे निर्मितीसाठी शेडनेटमध्ये प्रो ट्रे चा वापर करावा. यासाठी माती, गांडूळखत व कोकोपीट यांचे १: १: १ प्रमाण वापरून मिश्रण तयार करावे.
  • एका कपामध्ये एक याप्रमाणे बियाणे पेरावे. प्रो ट्रे ला शक्यतो सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा. तयार रोपांची रूट बॉलसह लागवड करावी.
  • लागवड सरी वरंबा पद्धतीने ६० बाय ६० सें.मी. अंतरावर लागवड करावी. खत व्यवस्थापन हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत, १५० किलो नत्र ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. सिंचन व्यवस्थापन

  •  हिवाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाण्याची बचत सुमारे ६० टक्के आणि वांगी उत्पादकतेमध्ये सुमारे ४० टक्के वाढ आढळून आली.
  • पिकाचा कालावधी: ६६ ते ११० दिवस
  • काढणी 

  •  पूर्ण वाढलेली परंतु कोवळी, फळांच्या सालीचा रंग सतेज व चमकणारा असतानाच फळे काढावीत.
  •  फळे ४ ते ५ दिवसांच्या अंतराने काढावीत.
  • टोमॅटो सुधारित जाती कोकण विजय 

  • अणुजीवजन्य मर रोगास प्रतिकारकक्षम आहे.
  • फळे आकर्षक गोल रंगाची,चांगला टिकाऊपणा.
  • उत्पादन ः हेक्टरी ३८ ते ४० टन.
  • सोनाली

  • लांबट गोल फळे, साल जाड असते. फळे जास्त दिवस टिकतात.
  • जिवाणू पासून होणाऱ्या मर रोगास प्रतिकारक.
  • प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यास उपयुक्त.
  • उत्पादन ः हेक्टरी २५ ते ४० क्विंटल.
  • रोपे निर्मिती 

  • १ मी. रूंद, ३ मी. लांब व १५ सें. मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत.
  •  वाफ्याच्या रूंदीस समांतर १० सें. मी. अंतरावर १ सें. मी. खोलीवर बियाण्यांची पातळ पेरणी करावी. चार आठवड्यांनी रोपे लागवडीस तयार होतात.
  • रोपे निर्मितीसाठी शेडनेट आणि प्रो ट्रे चा वापर करावा. यासाठी माती, गांडूळखत व कोकोपीट यांचे १: १: १ प्रमाण वापरून मिश्रण तयार करावे. एका कपामध्ये एक याप्रमाणे बियाणे पेरावे. प्रो ट्रे साठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा. तयार रोपांची रूट बॉलसह लागवड करावी.
  • लागवड सरी वरंबा पद्धतीने ६० बाय६०सें.मी. अंतरावर लागवड करावी. खत व्यवस्थापन हेक्टरी २० ते ३० टन शेणखत, १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. सिंचन व्यवस्थापन 

  • हिवाळ्यात ६ ते ७ दिवसांच्या अंतराने व उन्हाळी हंगामात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने या पिकास पाणी द्यावे.
  • ठिबक सिंचन पध्दतीचा वापर केल्यास पाण्याची ५० टक्के बचत होते. उत्पादनामध्ये ३० ते ४० टक्के वाढ होते.
  • पिकाचा कालावधी: ५९ ते १०६ दिवस
  • काढणी  रोपांच्या लागवडीपासून १.५ ते २ महिन्यात फळांची पहिली काढणी सुरू होते. मिरची सुधारित जाती कोकण कीर्ती

  • बुटकी जात(५० ते ६० सेंमी. उंच)
  • आकर्षक, चमकदार गर्द हिरवी फळे.
  •  मध्यम लांबीच्या मिरच्या. (७ ते ८ सेंमी.).
  •  फळे जास्त दिवस टिकतात.
  •  उत्पादन ः हिरव्या मिरचीची प्रति हेक्टरी १०० ते १२० क्विंटल. लाल मिरचीचे (सुक्या) हेक्टरी १५ ते २० क्विंटल.
  • रोप निर्मिती 

  • ३ मी. लांब, १ मी. रूंद व १५ सें. मी. उंचीचे वाफे तयार करावेत.
  • वाफ्याच्या रूंदीस समांतर अशा दर १० सें.मी. अंतरावर हाताच्या बोटाने २ ते ३ सें.मी. खोलीच्या ओळी काढून पातळ पेरणी करावी. बी पेरल्यानंतर ४५ दिवसात रोपे लागवडीस तयार होतात.
  • रोपे निर्मितीसाठी शेडनेटमध्ये प्रो ट्रे चा वापर करावा. यासाठी माती, गांडूळखत व कोकोपीट यांचे १: १: १ प्रमाण वापरून मिश्रण तयार करावे. एका कपामध्ये एक याप्रमाणे बियाणे पेरावे. प्रो ट्रे साठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा. तयार रोपांची रूट बॉलसह लागवड करावी.
  • लागवड

  • लागवड सरी वरंब्यावर करावी. उंच जातीची लागवड ६० बाय ६०सें.मी. व बुटक्या जातीची लागवड ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर करावी.
  • कोकणातील जांभ्या जमिनीत कोकण कीर्ती या जातीची लागवड ६० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी.
  • खत व्यवस्थापन हेक्टरी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट, ८० किलो नत्र , ३० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या खताच्या मात्रा द्याव्यात. सिंचन व्यवस्थापन

  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • ठिबक पद्धतीने मिरचीस पाणी दिल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनसुद्धा वाढते.
  • कालावधी: १८० ते २०० दिवस
  • काढणी हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीनंतर सर्वसाधारणपणे २ ते २.५ महिन्यांनी करावी. कोथिंबीर कोकण कस्तुरी

  • झुपकेदार वाढ. आकर्षक चमकदार हिरवी गर्द पाने.
  • पानांना अतिशय चांगला सुगंधी वास येतो.
  • रब्बी व उन्हाळी हंगामात लागवडीस योग्य.
  • तेलाचे प्रमाण (०.०२ टक्के ताजी, ०.१२६ टक्के सुकी)
  • अल्डीहाईड मॅन्ड्रीन चे प्रमाण ८७४० पीपीएम (हे प्रमाण इतर जातींपेक्षा ५ पट जास्त आहे. यामुळे चांगला सुवास येतो)
  • उत्पादन ः हेक्टरी २५ ते ४० क्विटंल.
  • लागवड

  • खरीप हंगामात जुलै - ऑगस्ट आणि रब्बी हंगामात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये लागवड करतात.
  • ३ बाय२ मीटरचे वाफे तयार करून बी फेकून करतात किंवा २० ते २५ सें.मी. अंतरावर रेषा काढून बी पेरावे. १० ते २० दिवसांनी बी उगवते.
  • खत व्यवस्थापन हेक्टरी १० टन शेणखत २० किलो नत्र , ४० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे. सिंचन व्यवस्थापन

  • हिवाळ्यामध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात ४ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पिकाचा कालावधी: ३५ ते ४२ दिवस
  • काढणी   बी पेरल्यानंतर ३५ ते ४० दिवसांनी कोथिंबीर पीक काढणीस तयार होते.

    संपर्क ः डॉ. प्रकाश सानप ९४०४१००१५६ (भाजीपाला विशेषज्ञ, मध्यवर्ती संशोधन केंद्र,वाकवली,जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com