agricultural news in marathi Infectious pleurisy in goats | Agrowon

शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनिया

डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. जयंत सुकारे
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट हवामान असते, त्या भागात सांसर्गिक प्लुरोन्युमोनिया आजाराचे प्रमाण जास्त असते. या आजारामुळे श्‍वसनास त्रास होतो, धाप लागते. लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना करावी.
 

ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट हवामान असते, त्या भागात सांसर्गिक प्लुरोन्युमोनिया आजाराचे प्रमाण जास्त असते. या आजारामुळे श्‍वसनास त्रास होतो, धाप लागते. लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना करावी.

सांसर्गिक प्लुरोन्युमोनिया (फुफ्फुस व त्यावरील आवरणात दाह) हा प्रामुख्याने शेळ्यांमध्ये होणारा आजार आहे. मेंढ्या व रवंथ करणाऱ्या इतर जनावरांनाही त्याचा प्रादुर्भाव होऊ शकते. हा अतिशय संसर्गजन्य व घातक आजार आहे.

 • निकृष्ट गोठा व्यवस्थापन, संतुलित आहार न देणे, कडाक्याची थंडी, हवेत जास्त आर्द्रता असणे, कोंदट हवा, जंताचा प्रादुर्भाव, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे इत्यादी गोष्टी आजारास कारणीभूत आहेत.
 • लांब अंतरावर वाहतूक केलेल्या शेळ्यांमध्ये आजार दिसतो.
 •  ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट हवामान असते. तेथे या आजाराचे प्रमाण जास्त असते.

कारणे 
मायक्लोप्लाझमा कॅप्रीकोलम सबस्पेशिज कॅप्रीन्युमोनिये हा जिवाणू आजाराचे प्रमुख कारण आहे. कधी कधी मायक्लोप्लाझमा जिवाणूंच्या इतर प्रजातीमुळेही न्यूमोनिया व प्लुरोन्युमोनिया उद्‍भवतो.

संसर्ग आणि प्रसार 

 • बाधित शेळ्यांमधून श्‍वसनाद्वारे जिवाणू शरीरातून बाहेर पडतात. हवा दूषित करतात. दूषित हवा आणि एकमेकांशी जवळील संपर्कातून आजार झपाट्याने पसरतो.
 • काही शेळ्यांमध्ये संसर्ग होतो, पण आजाराची लक्षणे नसतात. निरोगी दिसणाऱ्या शेळ्यांवर ताण आला, तर मग मात्र जिवाणू श्‍वसनाद्वारे हवेत सोडले जातात आणि प्रादुर्भाव इतर शेळ्यांना होतो.

लक्षणे 

 • भूक मंदावणे किंवा चारा न खाणे, खोकला, नाकातून स्राव येणे, ताप येणे (१०४ ते १०६ अंश फॅरनहाइट) श्‍वसनास त्रास होणे आणि धाप लागणे इत्यादी प्रमुख लक्षणे आढळतात.
 • वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास जनावर दगावते.

निदान 

 • लक्षणांवरून तसेच पशुवैद्यकांकडून आजारी जनावरांपासून गोळा केलेले नमुन्यांचे प्रयोगशाळेत तपासणी करून निदान करता येते.
 • मृत शेळ्यांमध्ये शवविच्छेदन करून बाधित अवयव तसेच इतर नमुन्यांच्या माध्यमातून निश्‍चित असे निदान करता येते.

प्रतिबंध आणि उपाय 

 • जैवसुरक्षेच्या उपायांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच गोठ्यांची स्वच्छता करणे संतुलित आहार देणे, गोठ्यांचे तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवणे, हवा खेळती ठेवणे, स्वच्छ सूर्यप्रकाश तसेच प्रवासाचा आणि इतर प्रकाराच्या ताणाचे व योग्य व्यवस्थापन केले असता प्रतिबंध करता येतो.
 • आजारी शेळ्यांना कळपातील इतर शेळ्यांपासून त्वरित वेगळे करून दूर अंतरावर ठेवावे. त्यांचे व्यवस्थापनही वेगवेगळ्या माणसांनी करावे.
 • योग्य वेळी अचूक निदान झाल्या उपचाराचा फायदा होतो. टायसोलीन, ऑक्सिटेट्रासायक्लिन, फ्लुरोक्विनोलोनस (इनरोफ्लोक्सासीन,‍ सिप्रोफ्लोक्सीन) इत्यादी प्रतिजैविके व इतर औषधे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार द्यावीत.

संपर्क : डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)


इतर कृषिपूरक
जनावरांमधील रक्त संक्रमण फायदेशीरकावीळ झालेल्या जनावराला वाचविण्यासाठी दुसऱ्या...
व्यावसायिक पद्धतीने ब्रॉयलर कोंबड्यांचे...ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन करताना त्यांचे...
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...