मिरची पिकावर नव्या फुलकिडीचा प्रादुर्भाव

मिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडे. या किडीच्या आतापर्यंत ‘थ्रीप्स टॅबॅसी’ आणि ‘र्स्कीरटोथ्रीप्स डॉरसॅलिस’ या दोन प्रजाती मिरचीमध्ये आढळत असत. मात्र अलीकडे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडाव राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व गुजरातराज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत.
Thrips on capsicum
Thrips on capsicum

मिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडे. या किडीच्या आतापर्यंत ‘थ्रीप्स टॅबॅसी’ आणि ‘र्स्कीरटोथ्रीप्स डॉरसॅलिस’ या दोन प्रजाती मिरचीमध्ये आढळत असत. मात्र अलीकडे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा व राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व गुजरात राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत. भारतामध्ये बहुतांश सर्व राज्यात मिरची पिकाची लागवड केली जाते. त्यातही आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात ही राज्ये मिरची पिकामध्ये अग्रगण्य आहेत. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली सुमारे ३०,५९० हेक्टर क्षेत्र आहे. नागपूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर व पुणे या जिल्ह्यांत मिरची पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मिरची पिकाच्या विविध अवस्थेमध्ये अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यात फुलकिडे, मावा, पांढरी माशी व कोळी या रस शोषक किडी; कळ्या, फुले पोखरणारी कीड (बड बोरर) तसेच तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्यूरा), हरभऱ्यावरील घाटेअळी (हेलीओथिस) तसेच केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर) या प्रमुख किडी आहेत. मिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडे. या किडीच्या आतापर्यंत ‘थ्रीप्स टॅबॅसी’ (Thrips tabaci) आणि ‘र्स्कीरटोथ्रीप्स डॉरसॅलिस’ (Scirtothrips dorsalis) या दोन प्रजाती मिरचीमध्ये आढळत असत. मात्र अलीकडे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागामध्ये व राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व गुजरात अशा राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत. त्याचे शास्त्रीय नाव ‘थ्रीप्स पार्विस्पिनस’ (Thrips parvispinus) असे आहे. ओळख फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे. ही प्रजाती भारतामध्ये सन २०१५ प्रथम पपई या पिकावर व त्यानंतर दक्षिण भारतातील फूल पिकांवर आढळली होती. यजमान पिके मिरची, ढोबळी मिरची, पपई, वांगी, बटाटे व फूलपिके इ. जीवनक्रम 

  • जीवनक्रमात अंडी, पिले आणि प्रौढ अशा अवस्था असतात.
  • या किडीचे प्रजनन नर मादीच्या मिलनामुळे किंवा मिलनाशिवायही होऊ शकते.
  • एक मादी पानांच्या आत सर्वसाधारणपणे १५० अंडी घालते. अंडी सुमारे ४-५ दिवसांत उबतात.
  • त्यातून फुलकिड्याची पिल्ले बाहेर पडतात. ती फिकट रंगाची, पंखविरहित असतात. पुढील ४-५ दिवसांत दोनदा कात टाकून मोठी होतात.
  • पूर्ण वाढ झालेली पिल्ले जमिनीमध्ये कोषावस्थेत जातात. कोषावस्था २-३ दिवस राहते.
  • प्रौढ सर्वसाधारणपणे ६ ते ९ दिवस जगतो.
  • एकंदरीत या किडीचा आयुष्यक्रम पूर्ण होण्यास १५-१८ दिवस लागतात.
  • प्रादुर्भावाची लक्षणे व नुकसान 

  • फुलकीड आकाराने लहान असून, पानाखाली आणि वर राहते. ती डोळ्यांना सहज दिसू शकते. ती कळ्या, फुलांमध्ये दिसून येत असल्यामुळे तिला ‘फ्लॉवर थ्रीप्स’ किंवा रंगाने काळी असल्यामुळे ‘ब्लॅक थ्रीप्स’ या नावानेही संबोधले जाते.
  • प्रौढांपेक्षा पिले जास्त नुकसान करतात.
  • या किडीच्या प्रार्दुभावामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात. पानामध्ये खोलगट भाग तयार होतो.
  • या किडीमुळे पानांचा देठ लांबणे, पाने वाळणे, फुले गळणे इ. लक्षणे पिकामध्ये दिसून येतात.
  • मिरची फळावर ओरखडल्यामुळे डाग पडतात. फळांची प्रत खालावते.
  • फूलकिड्यामुळे मिरची पिकाचे सुमारे ३० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे आढळून आलेले आहे.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन

  • मिरची पिकाच्या लागवडीपूर्वी चारही बाजूने मका पिकाची लागवड करावी.
  • पिकांची फेरपालट करावी. एकाच जमिनीत त्याच पिकाची किंवा त्या वर्गातील पिकाची वारंवार लागवड करू नये. त्या जमिनीत किडींच्या अवस्था कायम राहून त्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • चांगल्या व कीडविरहित मिरची रोपांची लागवड करावी.
  • पीक लागवडीनंतर एकरी २५-३५ निळे चिकट सापळे वापरावेत.
  • किडीचा प्रार्दुभाव आढळून येताच, प्रथम निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडुनिंबयुक्त कीटकनाशक ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी, बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम किंवा लेकॅनीसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम अधिक स्टिकर एक मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रण ( फवारणी प्रमाण :  प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी)

  • ॲसिटामिप्रिड (२०% एस.पी.) १०० ग्रॅम किंवा
  • सायॲन्ट्रानिलिप्रोल (१०.२६ ओ.डी.) ६०० मि.लि. किंवा
  • इमामेक्टीन बेन्झोएट (५% एस.जी.) २०० ग्रॅम किंवा
  • फेनप्रोपॅथ्रीन (३०% ई.सी.) ३४० मि.लि. किंवा
  • फिप्रोनील (५% एस.सी.) ८०० मि.लि. किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५% ई.सी.) ३०० मि.लि. किंवा
  • स्पिनोसॅड (४५% एस.सी.) १६० मि.लि. किंवा
  • थायोक्लोप्रीड (२१.७०% एस.सी.) ३०० मि.लि. किंवा
  • टोलफेनपायरॅड (१५% ई.सी.) १००० मि.लि. किंवा
  • डायफेन्थ्युरॉन (४७%) अधिक बायफेनथ्रीन (९.४०% डब्ल्यू/डब्ल्यू एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) ६२५ मि.लि. किंवा
  • फ्लुबेंडायअमाईड (१९.९२%) अधिक थायाक्लोप्रिड (१९.९२% डब्लू/डब्लू एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) २५० मि.लि. किंवा
  • फिप्रोनील (७%) अधिक हेक्झाथायझॉक्स (२% डब्ल्यू/डब्ल्यब एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) १००० मि.लि. किंवा
  • हेक्झाथायझॉक्स (३.५%) अधिक डायफेन्थ्युरॉन (४२% डब्ल्यू.डी.जी.) (संयुक्त कीटकनाशक) ६५० ग्रॅम.
  • टीप : वरील सर्व कीटकनाशकांसाठी ॲड हॉक लेबल क्लेम देण्यात आले आहेत. - सोमनाथ पवार, ९९२२५७२९३० (कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com