agricultural news in marathi Inhibition of mycotoxins in poultry feed | Page 3 ||| Agrowon

कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर प्रतिबंध

डॉ. धीरज पाटील, डॉ. आश्‍विनी बनसोड
सोमवार, 12 जुलै 2021

मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग बुरशीद्वारा तयार झालेल्या नैसर्गिक विषामुळे होतो. कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या धान्य आणि खाद्यामध्ये विष-उत्पादित करणाऱ्या बुरशी वाढतात तेव्हा याचा परिणाम होतो.
 

मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग बुरशीद्वारा तयार झालेल्या नैसर्गिक विषामुळे होतो. कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या धान्य आणि खाद्यामध्ये विष-उत्पादित करणाऱ्या बुरशी वाढतात तेव्हा याचा परिणाम होतो.पोल्ट्रीतील मायकोटॉक्सिनच्या समस्येवर देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

पावसाळ्याच्या काळामध्ये हवेमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. दमट हवामान कवक व बुरशीजन्य पदार्थांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असते. जास्त क्षमतेच्या कोंबडी फार्ममध्ये खाद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली जाते. परंतु खाद्य साठवून ठेवताना त्यामध्ये बुरशीजन्य पदार्थांची वाढ होणार नाही, याची काळजी घ्यावी.
मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग बुरशीद्वारा तयार झालेल्या नैसर्गिक विषामुळे होतो. कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या धान्य आणि खाद्यामध्ये विष-उत्पादित करणाऱ्या बुरशी वाढतात तेव्हा याचा परिणाम होतो. मायकोटॉक्सिनच्या प्रभाव वाढीमध्ये इतर नैसर्गिक विष, संसर्गजन्य पदार्थ आणि पोषणातील कमतरता हे घटक हातभार लावतात. यातील बरेच घटक रासायनिकदृष्ट्या स्थिर असतात आणि दिर्घकाळापर्यंत आपला विषारीपणा कायम राखतात. पोल्ट्रीतील मायकोटॉक्सिनच्या समस्येवर देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

अफलाटोक्सिकोसिस 
अफ्लॅटोक्सिन विषारी आणि कर्करोजेनिक चयापचयकारक पदार्थ आहेत. हे एस्परगिलस फ्लेव्हस, ए. पॅरासिटीकस आणि इतर बुरशीचे प्रकार आहेत. अफ्लॅटोक्सिन्स मुख्यत: कोंबड्यांच्या यकृतावर परिणाम करते. तसेच प्रतिकार क्षमता, पचन संस्था आणि रक्ताभिसरण संस्थेवर देखील परिणाम करू करू शकते.

होणारा परिणाम 

 • वजनवाढीस प्रतिरोध, कमी आहार घेणे
 • खाद्य रूपांतरण कार्यक्षमतेत घट
 • शरीरातील रंगद्रव्य रचनेत बिघाड
 • अंडी उत्पादनात घट, नर व मादी प्रजननामध्ये अडचणी
 • अंडी उबवणी क्षमतेत घट.

सर्वसाधारणपणे, अफ्लाटोक्सिनची संवेदनशीलता कोंबडीच्या जातीनुसार बदलते, परंतु बदके, टर्की आणि तीतर अफ्लाटॉक्सिन्ससाठी जास्त संवेदनाक्षम असतात. कोंबडीची पिल्ले, लहान पक्षी आणि गिनी पक्षी तुलनेने प्रतिरोधक असतात.

अफलाटोक्सिनची लक्षणे

 • शरीरात उच्च विकृती तयार होते. मृत्यू दर सामान्यपने जास्त असतो.
 • पेशी समूहाचे काही भाग नष्ट झाल्यामुळे यकृतमधील जखमा लालसर होतात. मेद जमा झाल्यामुळे यकृतामध्ये पिवळसरपणा वाढीस लागतो.
 • यकृत आणि इतर ऊतींमधील रक्तस्राव होतो.
 • अफलाटोक्सिन हे कर्करोगजन्य घटक आहेत, परंतु यापासून ट्यूमरची निर्मिती दुर्मीळ आहे, ट्यूमर होण्यासाठी लागणार कालावधी कोंबड्यांच्या जीवन कालावधीपेक्षा मोठा असल्यामुळे सहसा ट्यूमरनिर्मिती दिसून येत नाही.

फ्युजेरिओटोक्सिकोसिस 
फ्युजेरियम बुरशीच्या प्रजातीपासून तयार झालेले अनेक मायकोटॉक्सिन कोंबड्यांना हानिकारक आहेत.

लक्षणे 

 • कोंबड्या खाद्य खात नाहीत.
 • तोंडातील श्‍लेष्मल त्वचा आणि या बुरशीच्या संपर्कात असलेल्या त्वचेची दाहकता वाढते.
 • पचनासंबंधी रोग होतात.
 • रोगप्रतिकारक शक्ती कमी होत. रक्तस्राव होतो.
 • अंडी उत्पादनात घट.
 • इतर फ्युजारियम मायकोटॉक्सिन्समुळे शरीरातील लांब हाडांची सदोष वाढ होते.
 • मांस किंवा अंडी उत्पादनात रूपांतरण करण्याच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय बिघाड होतो.

ओक्राटोक्सिकोसिस 
यामुळे प्रामुख्याने मूत्रपिंडाचा रोग होतो परंतु यकृत, रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांच्या मज्जावरही परिणाम होतो.

परिणाम 

 • वजन कमी होते, खाद्य रूपांतर कमी होते.
 • हालचाल मंदावणे, शरीराच्या सामान्य तापमानात घट होते.
 • अतिसार व झपाट्याने वजन कमी होते.
 • मांस उत्पादन, अंडी उत्पादन आणि अंड्यांच्या उबवणक्षमततेत घट होते.

एरगोटिझम 

 • एरगॉट एक प्रकारची बुरशी आहे. एर्गोटग्रस्त खाद्य खाल्ल्याने विषबाधा होते, विशेषत: डोकेदुखी, उलट्या, अतिसार आणि पायांची बोटांना इजा होते.
 •  तृणधान्यांवर वाढणाऱ्या क्लेव्हिसेप्स प्रजातीच्या अल्कॉइड्सद्वारे विषारी एरगॉट तयार केले जातात. गहू आणि इतर धान्यावरही परिणाम दिसून येतो.
 •  या बुरशीमुळे मज्जासंस्थेला इजा होते. रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते. शरीरातील टोकाच्या भागात रक्तपुरवठा विस्कळीत होतो. बोटातील पेशी मारतात.वयस्क पक्ष्यांमध्ये तुरा, चेहरा आणि पापण्यांवरील त्वचा शुष्क व काळी पडते.
 • पाय तसेच बोटांच्या वरच्या बाजूस व्हेसिकल्स आणि अल्सर विकसित होतात. खाद्य वापर आणि अंडी उत्पादनात घट दिसून येते.

सिट्रीनिन मायकोटॉक्सिकोसिस 

 • सिट्रिनीन पेनिसिलियम आणि अस्परगिलसद्वारे तयार केले जाते. मका, तांदूळ आणि इतर धान्यांमध्ये हे आढळते.
 • सिट्रनिनमुळे लघवीचे प्रमाण वाढणे, पातळ विष्ठा होते, वजन वाढ कमी होते.
 • मूत्रपिंडात सौम्य जखम दिसते.

उस्पोरीन मायकोटॉक्सिकोसिस 

 • शेंगदाणे, तांदूळ आणि मका यासह खाद्य आणि धान्यामध्ये उस्पोरीन आढळून येते.
 • मूत्रपिंडाचे विस्कळीत झालेले कार्य आणि रक्तातील प्लास्मामधील वाढलेले युरिक आम्लाचे प्रमाण सांधेसंबंधी रोगाला आमंत्रण देते.
 • कोंबड्या उस्पोरिनला जास्त संवेदनशील असतात. उस्पोरिनची शरीरातील मात्रा वाढण्याच्या दरम्यान पाण्याचा वापर वाढतो.
 • कोंबड्यांमध्ये द्रवसंचय व संधिरोग होऊन मृत्यू होतो.

सायक्लोपीझोनिक आम्ल 

 •  हे अस्परजिलस फ्लेव्हसपासून तयार होणारे संयुग आहे. यामुळे खाद्य आणि धान्यामध्ये अफ्लॅटॉक्सिन तयार होते.
 • कोंबड्यांमध्ये सायक्लोपीझोनिक आम्ल खाद्याचे मांस व अंडी उत्पादनामधील रूपांतर कमी करते.
 •  यामुळे जठराचा आलिकडील भाग ढिला पडतो. श्‍लेष्मल त्वचा दाट आणि त्यावर ठिकठिकाणी अल्सर तयार होतात.

स्टेरिग्माटोसिस्टिन 
यकृतास विषबाधा तसेच यकृताचा कर्करोग होऊ शकतो.

निदान
याचे निदान कोंबड्यांमध्ये आढळणारी आजाराची लक्षणे, खाद्यामध्ये बुरशीजन्य पदार्थांची झालेली वाढ यावरून होऊ शकते.

मायकोटॉक्सिकोसिसचे निदान 

 • ज्या ठिकाणी धान्य आणि खाद्य सामग्री कमी दर्जाची असते आणि खाद्य साठवण व्यवस्था दुय्यम दर्जाची असते, तेव्हा खाद्यामधून रोगांचा प्रसार होतो.
 • मायकोटॉक्सिनची तपासणी योग्य प्रयोगशाळेमध्ये करावी.
 • आजारी किंवा नुकतीच मेलेली कोंबडी, खाद्य नमुना तपासणीसाठी द्यावा.यामुळे संसर्गजन्य किंवा परजीवी रोग यांच्यापासून झालेला मृत्यू ओळखता येतो.
 •  मायकोटॉक्सिन आहे की नाही हे तपासण्यासाठी खाद्य नमुने, खाद्य साठवणुकीची जागा, खाद्य उत्पादन व वाहतूक करणारी यंत्रणा आणि खाद्य देण्यासाठी वापरण्यात येणारे भांडे, इतर सामान तसेच फीडरच्या ठिकाणापासून नमुने गोळा करावेत.
 • चाचणीचे नमुने (५०० ग्रॅम) योग्य आकाराच्या कागदाच्या बॅगमध्ये ठेवावेत. त्यावर लेबल करावे.
 • सीलबंद प्लॅस्टिक किंवा काचेच्या कंटेनरचा वापर फक्त अल्प मुदतीचा साठा आणि वाहतुकीसाठी करावा.

 उपाययोजना 

 • खाद्याच्या साठ्यामधून बुरशीजन्य व विषारी खाद्य काढून टाकावे.
 •  खाद्य साठवणुकीसाठी योग्य दर्जाच्या व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा.
 • जीवनसत्त्वे, खनिजे आणि आहारातील प्रथिने वाढविण्यासाठी उपाययोजना करावी.
 • शेडमध्ये खाद्य साठवून ठेवताना लाकडी किंवा स्टील प्लॅटफॉर्मचा वापर करावा. जमिनीशी त्याचा संपर्क नसावा. जेणेकरून जमिनीतील आर्द्रता खाद्य शोषून घेणार नाही.
 • तीस दिवसांपेक्षा अधिक काळ खाद्य साठा करणे टाळावे.
 • उत्पादन, वाहतूक आणि साठवणुकीच्यावेळी काळजी घ्यावी.
 • उच्च आर्द्रता टाळण्यासाठी शेडमध्ये योग्य वायुविजन पद्धतीचा अवलंब करावा.
 • बुरशीची वाढ रोखण्यासाठी खाद्यामध्ये शिफारशीत बुरशीरोधक घटकांचा समावेश करावा.

संपर्क ः डॉ. धीरज पाटील, ९५५२१४४३४९
(डॉ. धीरज पाटील हे गुरू अंगद देव पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे एमव्हीएससी स्कॉलर आहेत. डॉ.आश्‍विनी बनसोड या भारतीय पशू संशोधन संस्था, बरेली, उत्तर प्रदेश येथे एमव्हीएससी स्कॉलर आहेत.)


इतर कृषिपूरक
मत्स्यबीज गुणवत्तेचे महत्त्वअलीकडील काळात मत्स्य व्यवसायात झपाट्याने होणारी...
जनावरांपासून मानवाला होणारे आजारप्राणिजन्य मानवी आजारांचे (झुनोटिक आजार) योग्य...
प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीचे फायदेपशुपालक आणि पशुवैद्यकांनी प्रतिजैविक संवेदनशीलता...
जनावरांमध्ये दिसतो थंडीचा ताणतणावअचानक तापमान खूप कमी झाले तर जनावरे थंडीपासून...
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...
कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः...
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...