agricultural news in marathi Initiative of ‘Godavari River Parliament’ for water pollution relief | Page 2 ||| Agrowon

जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद’चा उपक्रम

कृष्णा जोमेगावकर
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन विषयात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून दुष्काळी गावामध्ये लोकसहभागातून जल, मृद्संधारणाची कामे करण्यात येतात. याचा शेती आणि ग्रामविकासासाठी फायदा झाला आहे. 
 

नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन विषयात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून दुष्काळी गावामध्ये लोकसहभागातून जल, मृद्संधारणाची कामे करण्यात येतात. याचा शेती आणि ग्रामविकासासाठी फायदा झाला आहे. 

मागील पाच वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही संस्था जल, मृदा संवर्धनामध्ये कार्यरत आहे. दीपक मोरताळे, बाबूराव केंद्रे, नीलेश केदार गुरुजी, प्रा. परमेश्‍वर पौळ, मारोती घोरबांड, उदय संगरेड्डीकर, डॉ. राजकुमार मुक्कनवार, सतीश भाले आणि मित्रमंडळी यांच्या सहकार्याने विविध उपक्रम ग्रामीण भागामध्ये राबविले जातात. संस्था सध्या अकरा गावांमध्ये कार्यरत आहे. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि माहूर येथेही जलसंधारणाचे विविध उपक्रम राबविले जातात.

गोदावरी नदी शुद्धीकरण मोहीम 
नांदेड शिवारात गोदावरी नदीत प्रदूषणामुळे १३ जून, २०२० रोजी जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले. सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. सुनंदा मोरताळे आणि जल अभ्यासक दीपक मोरताळे यांनी याबाबत अभ्यास केला. नदीतील प्रदूषणामुळेच जलचर मृत्युमुखी पडल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. पुढील काळात हा धोका निर्माण होऊ नये यासाठी गोदावरी नदी संसद परिवाराने जल प्रदूषण मुक्तीचा उपक्रम हाती घेतला. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

संस्थेच्या माध्यमातून पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये असे लक्षात आले, की फेब्रुवारी महिन्यात नदी प्रदूषण पातळी वाढण्यास सुरुवात होते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण पाच पीपीएम दिसून आले. मागील काही वर्षांमध्ये जूनपर्यंत पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण दोन पीपीएमपर्यंत खाली आले होते.

दरवर्षी नांदेड शहरातून नऊ हजार टन रासायनिक घटक आणि हजारो टन जैविक कचरा नदीमध्ये सोडला जातो. त्याचे विघटन व स्थिरीकरण होण्यासाठी पाण्यातील ऑक्सिजनचा वापर होतो, त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाणी प्रदूषित होत आहे. गोदावरी नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी सर्व पर्यायांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये बायोएन्झाइम वापरून जैविक शुद्धीकरण हा पर्याय पुढे आला. प्रदूषित जलसाठ्यांची माहिती संकलित करण्यात आली.

१५ ऑगस्ट २०२० रोजी ‘गोदावरी नदी संसद सोशल ग्रुप’ तयार करण्यात आला. या ग्रुपमध्ये एक हजारांपेक्षा जास्त कुटुंब जोडलेली आहेत. लॉकडाउन असल्यामुळे बायोएंझाइम तयार करण्याचे प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात आले. त्यासाठी चंदा काबरा यांनी पुढाकार घेतला. हे तंत्रज्ञान तपासून देण्यासाठी आयआयटी, मुंबई आणि निरी संस्थेला विनंती करण्यात आली आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणाची प्रेरणा घेऊन दिल्ली, कर्नाटक, गुजरात, ओरिसा राज्यात काम सुरू झाले आहे. 

जलसंवर्धन प्रशिक्षण प्रकल्प 
संस्थेने विविध ठिकाणी जलसंधारणाची कामे केली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात सूर्योदया फाउंडेशन, मुंबई आणि नांदेड सोशल ग्रुप यांच्या मदतीने जल व पर्यावरण संवर्धनाबाबत प्रशिक्षण प्रकल्प उभारण्यात आला आहे. याची साठवणक्षमता दहा कोटी लिटरची आहे. प्रक्षेत्रावर २५ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध जलसंधारण प्रकल्प, शेततळे, डीप सीसीटी, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाचा अभ्यास करता येणार आहे. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्यास मदत होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, पद्‌मश्री डॉ. अनुराधा पौडवाल, प्रकल्प समन्वयक दीपक मोरताळे आणि श्रीकांत चौहान यांच्या संकल्पनेतून लोक चळवळ उभी राहत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही जल, मृद्संधारण प्रकल्पाची दखल घेण्यात आली आहे.

लोकसहभागातून जल-मृद्‌संधारण...
दुष्काळी गावांना पाणीपुरवठा 

 • २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून पाणीटंचाई असलेल्या तेरा गावांना तीन महिने टँकरने पाणीपुरवठा.
 • वन्य प्राणी, पक्षी व पाळीव प्राण्यांसाठी माळरानावर जलकुंड सुविधा. 

भिल्लू नाईक तांड्याची जल श्रीमंती

 • गाव शिवारात २५ शेततळे, १०० डीप सीसीटी. 
 • १५ कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा, ५० कोटी लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत.

कलंबरला शिवनेरी बंधारे 

 • नदीवर वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी दोन शिवनेरी बंधारे.
 • सूर्योदया फाउंडेशन, सारस्वत बँकेतर्फे दहा लाखांचा निधी, गावकऱ्यांची आठ लाख रुपये लोकवर्गणी. यातून दोन बंधारे पूर्ण. शिवारात ५० लाख लिटर पाणीसाठा.  

नदी रुंदीकरण 

 • कलंकर येथे तीन किलो मीटर नाला खोलीकरण, रुंदीकरण, डीप सीसीटी कामे.
 • गावकऱ्यांतर्फे लोकवर्गणी गोळा. जलसंधारणाच्या कामाबद्दल २०१९ चा पाणी फाउंडेशनतर्फे द्वितीय पुरस्कार.
 • सूर्योदया फाउंडेशनतर्फे २०१९मध्ये रत्नेश्‍वरी, वडेपुरीमध्ये नदी खोलीकरण व रुंदीकरण तसेच तलावातील गाळ काढण्यासाठी यंत्रणा. गावकऱ्यांची डिझेलसाठी लोकवर्गणी.
 • तीन किमी नदी खोलीकरण, रुंदीकरण. तलावातील गाळ काढण्यात आला. 
 • खोलीकरण करताना नऊ फुटांवर मोठा झरा लागल्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय.

दापशेडमध्ये दोन तलाव 

 • सूर्योदया फाउंडेशनतर्फे तलाव खोदण्यासाठी यंत्रणा. ग्रामविकास समितीतर्फे डिझेलसाठी लोक वर्गणी.
 • गावशिवारात दोन कोटी लिटर क्षमतेच्या दोन तलावांची खोदाई. यामुळे कूपनलिका, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ.
 • नंदू तांडा, रुपला तांडा, हरिशचंद्र तांडा वस्त्यांना जलसंधारणाचा फायदा.

दत्तमांजरी तलाव दुरुस्ती 

 • लोकसहभागातून दत्त शिखर माहूर, दत्त मांजरी येथील काळापाणी तलावातील गाळ काढण्यात आला. पाच कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा.
 • सूर्योदया फाउंडेशनतर्फे खोदकामासाठी यंत्रणा. दत्त शिखर संस्था, तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यातर्फे डिझेल व्यवस्था.

मातृतीर्थवर पाणी साठवण 

 • श्री क्षेत्र माहूर येथील मातृतीर्थ तलावातील गाळ काढण्यात आला. १० कोटी लिटर पाणीसाठा.
 • माहूर येथील नीलेश केदार गुरुजी यांनी कालिकापुराणातील माहितीवरून ३८ कुंड शोधून काढली. यातील आठ कुंडांतील गाळ महाश्रमदानातून काढण्याचा सुरुवात झाली. या कुंडामध्ये दहा फुटांवर पाण्याचे झरे लागले आहेत. सूर्योदया फाउंडेशनतर्फे यंत्रणा उपलब्ध.

- दीपक मोरताळे   ९४२२१७४६४७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...