agricultural news in marathi Integrated management of pest on capsicum | Page 2 ||| Agrowon

मिरचीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. पी. आर. झंवर, योगेश मात्रे
गुरुवार, 4 मार्च 2021

मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची कमी उत्पादकतेमागे किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. या पिकावर येणाऱ्या किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अगदी रोपवटिकेपासून ते रोपलागवडीच्या नंतर शेवटच्या तोडणीपर्यंत निरनिराळ्या टप्प्यात एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा अवलंब करावा.
 

मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची कमी उत्पादकतेमागे किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. या पिकावर येणाऱ्या किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अगदी रोपवटिकेपासून ते रोपलागवडीच्या नंतर शेवटच्या तोडणीपर्यंत निरनिराळ्या टप्प्यात एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा अवलंब करावा.

फळ पोखरणारी अळी 
ही अळी तपकिरी हिरवट रंगाची असून, शरीराच्या दोन्ही बाजूंनी गडद पट्टा असतो. शरीरावर तुरळक केस असतात. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळी ही पाने व फुले व रोपाच्या शेंड्यावर उपजीविका करते. नंतर ती फळांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडून आतील भाग खाते.

नियंत्रण 

 • फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५० हजार प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावेत.
 • ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
 • फळ पोखरणाऱ्या अळीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एचएनपीव्ही (२५० एलई) प्रति ५०० लिटर पाण्यातून सायंकाळी फवारणी करावी.
 • फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (३९.३५ एससी) ०.२ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. गरजेनुसार पुढील फवारणी कीटकनाशक बदलून ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.

फुलकिडे 
हे अतिशय छोटे, निमुळते व नाजूक असतात. रंगाने फिक्कट पिवळे किंवा करड्या रंगाचे असून, त्याची लांबी १ मि.मी.पेक्षा कमी असते. ही किड पंखविरहित अळ्या व पंख असले तरी अळीसारखी अशा दोन्ही अवस्थेत आढळते. त्यांच्या पंखाना मध्ये शिर असते. ती लांब केसांनी व्यापलेली असते. पानाच्या वरचा पापुद्रा खरडता येईल, अशी त्यांच्या तोंडाची रचना असते. पाने खरवडून त्यातून येणारा रस ही कीड शोषून घेते. पाने वरच्या बाजूला मुरडली गेल्यामुळे पानांचा आकार द्रोणासारखा दिसतो. या किडीचा उपद्रव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून सर्व अवस्थांमध्ये आढळतो. पाने चुरगळ्यासारखी दिसतात. अशा झाडाची वाढ खुंटते. अशा झाडाला मिरच्या फार कमी लागतात.

 मावा 
ही किड पाने, कळ्या, फुले तसेच झाडाच्या कोवळ्या भागावर दिसून येते. झाडाच्या पेशीतील रस अखंडपणे शोषण करते. परिणामी, पाने सुरकुतल्यासारखी दिसतात. ही कीड शरीराबाहेर मधासारखा चिकट पदार्थ सोडते. चिकट पदार्थावर काळसर बुरशीची वाढ होते. पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. झाडाची वाढ खुंटते. उत्पादनात घट येते. 

पांढरी माशी 
या किडीची पिले, प्रौढ माशी पानातील रस शोषते. झाडाची पाने लहान आकाराची होऊन चुरडतात. उत्पादनात घट येते. 

कोळी
याला अष्टपदी असे म्हणतात. हे आकाराने सूक्ष्म वर्तुळाकार (१ मि.मी.) असून, रंगाने लाल किंवा पिवळसर असतात. ही कीड पानाच्या खालील बाजूस राहून रस शोषते. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालील बाजूस मुरडल्या जातात. झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कोकडलेली दिसतात. सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते. फुले मोठ्या प्रमाणावर गळून पडतात. फळांचा आकार लहान व विद्रूप होतो. उत्पादनात भारी घट होते. 

 एकात्मिक व्यवस्थापन

 • कीड सहनशील वाणाची लागवड करावी.
 • पिकाची फेरपालट करावी. शेतामध्ये मिरची पिकावर मिरचीचे पीक घेणे टाळावे.
 • मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
 • मिरची पिकासोबत ४:१ या प्रमाणात चवळी, कोथिंबीर किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे. झेंडू या सापळा पिकाची ४५ दिवसांची १०० झाडे प्रति एकरी लावावीत.
 • निंबोळी पेंड दोनदा (रोप लावतेवेळी व एक महिन्यानंतर) १०० किलो प्रति एकरी विभागून द्यावी.
 • पांढऱ्या माशीसाठी पिवळे चिकट सापळे १० प्रति हेक्टर लावावेत.
 • क्रायसोपाच्या अळ्या २ प्रति झाड रस शोषण करणाऱ्या किडी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मिरचीवरील फुलकिडे मावा, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी फिप्रोनील (५ टक्के) १.६ मि.लि किंवा स्पीनोसॅड (४५ एसएल) ०.३२ मि.लि.
 • कोळीच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी स्पायरोमेफेसीफेन (२२.९ एससी) ०.८ मि.लि.

संपर्क : डॉ. पी. आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक),  ७५८८१५१२४४,
योगेश मात्रे (पी.एचडी. विद्यार्थी),  ७३८७५२१९५७
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...