agricultural news in marathi It is possible to reduce the aflatoxin in groundnut at home | Agrowon

घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील अफ्लाटॉक्सिन कमी करणे शक्य

मनीषा धनशेट्टी, कोमल पवार, कौशिक बॅनर्जी
शनिवार, 15 जानेवारी 2022

अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला कडवटपणा येतो. या घटकामुळे गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण घरगुती स्तरावर शेंगदाण्यावर प्रक्रियेद्वारे कमी करणे शक्‍य आहे.

अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला कडवटपणा येतो. या घटकामुळे गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण घरगुती स्तरावर शेंगदाण्यावर प्रक्रियेद्वारे कमी करणे शक्‍य आहे.

भुईमुगाची लागवड प्रामुख्याने शेंगदाणा उत्पादनासाठी केली जाते. शेंगदाण्यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. विविध पदार्थांमध्ये शेंगदाणा तेलाचा वापर होतो. असे भाजलेले, तळलेले किंवा उकडलेले शेंगदाणे सर्व जण आवडीने खातात. कधी कधी शेंगदाणे खाताना एखादा दाणा चवीला कडू लागतो. पण तो कशामुळे कडू लागला हे अनेकांना माहिती नसते. शेंगदाण्याला कडवटपणा का येण्याची कारणे खालील लेखात पाहू. 

अफ्लाटॉक्सिन म्हणजे काय? 

  • शेंगदाण्याला कडवटपणा येण्यामागे अफ्लाटॉक्सिन नावाचा विषारी घटक कारणीभूत असतो. अफ्लाटॉक्सिनचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बी१, बी२, जी१ आणि जी२ हे प्रकार जास्त आढळतात. यापैकी अफ्लाटॉक्सिन बी १ हे अधिक घातक मानले जाते. 
  • अफ्लाटॉक्सिन हा विषारी घटक ॲस्परजिलस फ्लेवस आणि ॲस्परजिलस पॅरासीट्स नावाच्या बुरशीमुळे तयार होतो. ही बुरशी सर्वत्र आढळते. विशेषतः उबदार आणि आर्द्र प्रदेशांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
  • अफ्लाटॉक्सिनमुळे विविध गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो.
  • काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात हाताळणीदरम्यान या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.  

...असे करा अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण कमी

  • द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी (जि. पुणे) येथे शेंगदाण्यातील अफ्लाटॉक्सिन हा विषारी घटक कमी करण्याविषयी संशोधन करण्यात आले. येथील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कौशिक बॅनर्जी आणि मनीषा धनशेट्टी यांनी याविषयी संशोधन केले आहे. तसेच याविषयीचा संशोधन प्रबंध एका आंतरराष्ट्रीय नियतकालीकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. 
  •  घरगुती स्तरावर शेंगदाण्यावर प्रक्रिया करून अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याचे संशोधनातून दिसून आले. यासाठी शेंगदाणे तळणे, शिजवणे आणि भाजण्याची प्रक्रिया करता येतात. 
  • ही प्रक्रिया करताना शेंगदाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि सायट्रिक आम्ल घालून १८० ते १९० सेल्सिअस तापमानावर अर्धा तास भाजून घ्यावे. यामुळे अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत कमी होते. 

अफ्लाटॉक्सिनमुळे भारतातून खाद्यपदार्थांच्या होणाऱ्या निर्यातीवर मोठा परिणाम होत आहे. युरोपीय देशांमध्ये अफ्लाटॉक्सिनची कमाल पातळी ही २ पीपीबी (पार्ट पर बिलियन) तर भारतीय नियमावली नुसार ही मर्यादा १० पीपीबी इतकी आहे. शेंगदाणे, धान्य, वाळलेले अंजीर आणि दुधामध्ये अफ्लॉटॉक्सिनची पातळी ०.५ ते १५ मायक्रो ग्रॅम प्रतिकिलोच्या (µg/kg) श्रेणीमध्ये आहे. अन्न पदार्थातील अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण कमी करण्यासाठी कोडेक्सने विविध सराव संहितादेखील विकसित केल्या आहेत. यामध्ये विविध प्रतिबंधात्मक उपायांचा तपशील आहे. तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) द्वारा अफ्लाटॉक्सिन बी १ साठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एफएसएसएआय मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना शेंगदाण्यातील अफ्लाटॉक्सिनची चाचणी करणे अनिवार्य आहे. 

- ०२० - २६९५६०९१
मनीषा धनशेट्टी, (वरिष्ठ संशोधन सहायक)
कोमल पवार, (प्रकल्प सहाय्यक)
कौशिक बॅनर्जी, (पीएचडी)  (प्रधान शास्त्रज्ञ)
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, जि. पुणे)


इतर कृषी सल्ला
शेतकरी नियोजन : पीक हापूस आंबाशेतकरी : देवेंद्र ज्ञानेश्‍वर झापडेकर गाव...
मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टमूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टचा वापर...
कमाल, किमान तापमानातील तफावतीमुळे...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत तापमानामध्ये...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...
केवायसी : ओळख खातेदाराची...बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’...
घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील...अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला...
कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगाशेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बजमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे....
बटाटा पिकातील मूल्यवर्धन...शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते...
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...