agricultural news in marathi Ketchup, soup, puree from tomatoes | Page 2 ||| Agrowon

टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरी

चंद्रकला सोनवणे
शनिवार, 24 एप्रिल 2021

टोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच खराब होते. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. टोमॅटोपासून रस, केचअप, सॉस, प्युरी असे अनेक मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

टोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच खराब होते. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. टोमॅटोपासून रस, केचअप, सॉस, प्युरी असे अनेक मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

टोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच खराब होते. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. टोमॅटोपासून रस, केचअप, सॉस, प्युरी असे अनेक मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. याशिवाय लोणचे, ज्यूस, सूप, पावडर या पदार्थांनाही बाजारात चांगली मागणी आहे. टोमॅटोपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना लोखंडी भांड्याचा वापर करू नये. त्यामुळे पदार्थ काळसर पडून खराब होतात.

टोमॅटो गर 
प्रथम पूर्ण पिकलेले लाल टोमॅटो निवडून घ्यावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. फळांमधील हिरवट आणि खराब भाग काढून टाकावा. चाकूच्या साह्याने टोमॅटोचे लहान तुकडे करावेत. गॅसवर भांड्यामध्ये तुकडे ७० ते ९० अंश सेल्सिअस तापमानावर ३ ते ५ मिनिटे गरम करावेत. त्यामुळे टोमॅटो मऊ होण्यास मदत होऊन त्याचा लगदा तयार होईल. तयार लगदा पल्पर किंवा स्टीलच्या चाळणीत ओतून गाळून घ्यावा. तयार झालेला गर जास्त काळ साठवण्यासाठी त्यात सोडिअम बेन्झोएट १०० मिलिग्रॅम टाकावा. तयार रस किंवा गर निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून थंड आणि कोरड्या जागी साठवावे. या गराचा वापर सॉस प्युरी किंवा. केचअप साठी करता येतो.

केचअप 
साहित्य 

टोमॅटो पल्प १ किलो, लाल तिखट ५ ग्रॅम, साखर ७५ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, लवंग, ५ नंबर व्हिनेगार २५ मिलि, सोडिअम बेन्झोएट ०.२५ ग्रॅम आणि विलायची, दालचिनी, बडीसोप, जिरे, मिरे बारीक कुटून घेतलेले प्रत्येकी १० ग्रॅम,.

कृती 
प्रथम टोमॅटोचा गर पातेल्यात घेऊन त्यात एकूण साखरेच्या १ तृतीयांश साखर टाकावी. सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडात बांधून त्याची पुरचुंडी करावी. ही पुरचुंडी पातेल्यात रसामध्ये बुडवून ठेवावी. पातेले मंद आचेवर ठेवून मूळ रसाच्या तिसऱ्या भागापर्यंत रस आठवून घ्यावा. रस आठवून घेताना पळीने पुरचुंडीला हळूवारपणे अधून मधून सतत दाब द्यावा. म्हणजे मसाल्याचा अर्क रसामध्ये चांगला एकजीव होईल. व्हिनेगार व उरलेली साखर, मीठ, तिखट टाकून रस पुन्हा आठवून घ्यावा. तयार केचअप निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून झाकण लावून हवाबंद करावा. बाटल्या थंड व कोरड्या जागी साठवाव्यात

प्युरी 

  • बी व सालविरहित टोमॅटोचा आटवलेला रस ज्यात कमीत कमी ८.५ टक्के घन घटक असतात, त्या पदार्थाला टोमॅटो प्युरी असे म्हणतात.
  • टोमॅटो प्युरी तयार करण्यासाठी रस उघड्या भांड्यात ९० ब्रिक्‍स टी.एस.एस. येईपर्यंत आटवावा. तयार झालेली प्युरी प्लेन किंवा इन्यामल कॅनमध्ये किंवा बाटल्यात पॅक करून ८२ ते ८४ अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटे गरम करून निर्जंतुक करावी. हवाबंद केलेली प्युरी सामान्य तापमानास ६ महिने चांगली टिकते. प्युरीचा वापर गरजेप्रमाणे केचअप किंवा वेगवेगळ्या भाज्या तयार करण्यासाठी होतो. प्युरीला हॉटेल व्यवसायात चांगली मागणी आहे.

सूप 
साहित्य 

रस १ किलो, पाणी ३५० मिलि, कांदा १५ ग्रॅम, लोणी २० ग्रॅम, मीठ २० ग्रॅम, साखर २० ग्रॅम, लसूण, काळे मिरे, दालचिनी, विलायची, लवंग प्रत्येकी २ ग्रॅम

कृती 
टोमॅटोचा रस जास्त आंबट असल्यास खाण्याचा सोडा मिसळून रसाची आम्लता कमी करावी. एका कापडामध्ये सर्व मसाल्याचे पदार्थ बांधून त्याची पुरचुंडी करून रसामध्ये सोडावी. अधूनमधून मसाल्याच्या पुरचुंडीला दाबून त्याचा अर्क काढावा. १० टक्के रस घेऊन त्यात लोणी व स्टार्च मिसळून पेस्ट तयार करून ही पेस्ट पातेल्यातील उकळत्या रसात मिसळून एकजीव करावी. मिश्रण थोडे घनतेचे झाल्यावर त्यामध्ये साखर व मीठ मिसळून मिश्रण ३ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावे. हे सूप ४० ते ५० दिवस टिकते. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावे.

- सोनवणे चंद्रकला, ८४०८९७०९३७
(के.एस.के अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

 


इतर कृषी प्रक्रिया
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...
लसणापासून लोणचे, जेली, चटणीलसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग...
लिंबू प्रक्रियेतील संधी लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता...
अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञानअळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
खरबुजापासून पावडर, सरबतखरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात...
आरोग्यवर्धक लसूण लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी...