agricultural news in marathi KYC: Identity of Account holder | Agrowon

केवायसी : ओळख खातेदाराची...

अनिल महादार, 
शनिवार, 15 जानेवारी 2022

बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’ पूर्ण करण्याचा लकडा अधिकाऱ्याकडून लावला जातो. केवायसी म्हणजे ‘नो यूवर कस्टमर’. ग्राहकांना जाणून, त्याची सत्यता पटविण्यामुळे भविष्यातील अनेक गैरप्रकार व नुकसान टाळणे शक्य होते. 
 

बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’ पूर्ण करण्याचा लकडा अधिकाऱ्याकडून लावला जातो. केवायसी म्हणजे ‘नो यूवर कस्टमर’. ग्राहकांना जाणून, त्याची सत्यता पटविण्यामुळे भविष्यातील अनेक गैरप्रकार व नुकसान टाळणे शक्य होते. 

खातेदाराची ओळख पटवणे (KYC) ही एक कायदेशीर प्रक्रिया व आवश्यकता आहे. बँकेमध्ये उघडण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या खात्यासाठी आवश्यक ओळख कागदपत्रांची यादी सोबत दिली आहे. बॅंक या कागदपत्राच्या व्यक्तीची ओळख, रहिवासी पुरावा व अन्य काही बाबी जाणून घेते. त्यामुळे भविष्यातील फसवणुकीचे प्रकार कमी करण्यास मदत होते. कोणीही कोणाच्या नावे खाते उघडणार नाही, याची शाश्‍वतता मिळते. 

प्रसंग १ 
दिनेशच्या मोबाईलवर एक मेसेज आला. ‘‘आठ दिवसांत तुम्ही KYC कागदपत्रे बँकेत सादर करा, अन्यथा आपल्या बचत खात्याचे व्यवहार थांबविण्यात येतील.’’ वास्तविक गेल्या पाच वर्षांपासून दिनेश यांचे बँकेत खाते व्यवस्थित चालू होते. मग अचानक हे काय नवीन, असा प्रश्‍न त्याला पडला. मेसेजचा अर्थ नक्की समजला नसल्याने त्याने त्वरित बॅंकेत धाव घेत ‘ KYC’ म्हणजे काय, हे जाणून घेतले. त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता केली. 

प्रसंग २ 
अंजलीला बँकेत खाते काढावयाचे होते. ती बँकेत गेली. खाते उघडण्याचा फॉर्म घेतला. बँक अधिकाऱ्यांनी या अर्जासोबत KYC कागदपत्रे जोडायला सांगितली. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्‍नचिन्ह लक्षात आल्याने त्या अधिकाऱ्याने अधिक खुलासा केला. ते म्हणाले, ‘‘अर्जाच्या मागे अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी दिली आहे, त्याप्रमाणे कागदपत्रे सादर करा. KYC म्हणजे तुमची ओळख करून देणारी कागदपत्रे, स्वतःचे छायाचित्र असलेले ओळख पत्र आणि तुमचा रहिवासी दाखला होय. अंजलीने खाते उघडण्याचा अर्ज भरला. त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून बँकेस सादर केली. मगच बँकेत अंजलीचे बचत खाते उघडले गेले. 

‘केवायसी’ मार्गदर्शक तत्त्वाचे उद्दिष्ट 

 • ‘आपला ग्राहक जाणून घ्या’ ही ग्राहकांची ओळख सत्यापित करण्याची प्रक्रिया आहे. 
 • पैशांची अफरातफर साठी आर्थिक गुन्हेगार घटक बँकांचा वापर करू शकतात. ते रोखण्यासाठी प्रत्येक ग्राहकांची ओळख महत्त्वाची ठरते.
 • बँकांना त्यांचे ग्राहक आणि त्यांचे आर्थिक व्यवहार समजून घेण्यास मदत होते. ग्राहकानुसार योग्य त्या सेवा पुरवणे शक्य होते. 

‘केवायसी’साठी आवश्यक कागदपत्रे 
बचत खाते (Savings Bank Account) 

 • वैयक्तिक खाते, प्रोप्रायटर, संयुक्त खाते अशा प्रत्येकासाठी बचत खाते काढता येते. स्वत: खासगी वापरासाठी, भागीदारी, सहखातेदार, संचालक, ट्रस्टी, एकत्र कुटुंबकर्ता इ.साठी खाते काढता येते.   
 • ज्याचे नावे खाते काढावयाचे आहे, त्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन सध्याची छायाचित्रे. 
 • खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र मूळप्रत तपासणीसाठी व त्याच्या स्वसाक्षांकित प्रति सादर करणे आवश्यक.
 • पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान कार्ड (व्होटर आयडेंटी कार्ड), ड्रायव्हिंग परवाना, 
 • ‘मनरेगा’ने दिलेले जॉब कार्ड, आधार कार्ड 
 • नोकरदारांसाठी असलेले ओळखपत्र  
 • विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थेने दिलेले ओळखपत्र किंवा बोनाफाइड सर्टिफिकेट. 

मालकी हक्क फर्म  (Proprietorship Firm) साठी चालू खाते  (Current Account) 

 • वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे
 • याशिवाय बँकेच्या नमुन्यामध्ये मालकी हक्क पत्र.
 • खालीलपैकी कोणतीही दोन कागदपत्रे : मालकी हक्क फार्म नोंदपत्र, शॉप ॲक्ट, आयकर रिटर्न, सेवा व वस्तू कर दाखला (जीएसटी नंबर), वीजबिल, पाणीबिल, टेलिफोन बिल इ.  

भागीदारी फर्म (Partnership Firm) ः

 • वर अनु. क्र. १ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे
 • याशिवाय भागीदारीपत्र (बँकेच्या नमुन्यात), नोंदणी पत्र/दाखला इ.

ट्रस्ट  (TRUST)

 • वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागद पत्रे,
 • याशिवाय ट्रस्ट नोंदणी पत्र, ट्रस्ट डीड, 
 • बँकेत खाते उघडण्यासाठीचा सर्व ट्रस्टींनी सह्या केलेला ठराव,
 • सर्व ट्रस्टींची नावे, पत्ते असलेली यादी इ. 

अनोंदणीकृत संस्था (वैयक्तिक एकत्र येऊन स्थापन केलेला गट)

 • वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागद पत्रे- (प्रत्येकाची) 
 • याशिवाय वैयक्तिक एकत्र येऊन स्थापन केलेला गटाचा ठराव, 
 • खाते उघडण्यासाठी, खात्याचे व्यवहार करण्याचे अधिकार त्यातील दोन व्यक्तींना देण्याबाबतचा ठराव इ. 

नवीन कंपनी  

 • वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागद पत्रे,  
 • याशिवाय कंपनी सुरू झाल्याचा दाखला (Certificate of Incorporation) 
 • मेमोरॅन्डम अँड आर्टिकल फॉर असोसिएशन (Memorandum and Article for Association)
 • कंपनी बोर्डांचा ठराव - खाते उघडण्यासाठी, खात्याचे व्यवहार करण्याचे त्यातील व्यक्तींच्या नावे अधिकार देण्याबाबतचा ठराव. 
 • कंपनीचा व्यवसाय सुरू करण्याबाबतचा दाखला, (सार्वजनिक कंपनीसाठी Public Ltd. Cos.);
 • कंपनी संचालकांची यादी,
 • खात्याचे व्यवहार करणाऱ्यांच्या नमुना सह्या असलेले कंपनी अध्यक्ष व सचिव यांच्या सहीचे पत्र.

सोसायटी, असोसिएशन व क्लब 

 • वर  अनु.क्र. १ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे,  
 • याशिवाय, सोसायटी, असोसिएशन व क्लब याचे नोंदणीपत्र,
 • मेमोरॅन्डम अँड आर्टिकल फॉर असोसिएशन (Memorandum and Article for Association )
 • सोसायटी, असोसिएशन व क्लबचा ठराव - खाते उघडण्यासाठी व खात्याचे व्यवहार करण्याचे अधिकार देण्याबाबत 
 •  सोसायटी, असोसिएशन व क्लब यांची नियमावली (Rules, regulations and bye-laws)
 • खात्याचे व्यवहार करणारे व त्यांच्या नमुना सह्या असलेले अध्यक्ष व सचिव यांच्या सहीचे पत्र.

खातेदाराच्या दृष्टिकोनातून ‘केवायसी’चे फायदे
बँकेत खाते उघडताना खातेदारास ‘केवायसी’ कागदपत्रे सादर करणे कायदेशीरदृष्ट्या अत्यावश्यक आहे. त्याशिवाय खाते उघडता येत नाही. मात्र हे कायदेशीर बंधन खातेदारांसाठी तितकेच फायदेशीर आहे. खातेदाराची ओळख बॅंकेकडे कायमस्वरूपी नोंदवली जाते. त्याआधारे पुढील काळात कोणतीही शंका आल्यास ग्राहकाची ओळख पटवता येते. परिणामी, संभाव्य गैरप्रकारांना आळा बसू शकतो. कोणाच्या नावे खाते, खोटी खाते तयार करून त्यातील बेनामी व्यवहार होण्याची शक्यता यामुळे कमी होते. कागदपत्राअभावी अन्य कोणीही आपल्या नावे खाते उघडू शकत नाही. परिणामी, खात्याची सुरक्षितता वाढते. व्यवसायाच्या नावे खाते उघडताना त्या व्यवसायांचे नाव, नोंदणी प्रमाणपत्रे व संचालकांच्या केवायसी कागदपत्रे घेतली जातात. यातून ते खाते त्या व्यवसायासाठीच खाते उघडले व वापरले जाणार असल्याची खात्री बँकेस दिलेली असते. त्यामुळे कोणत्याही गैरव्यवहाराची शक्यता कमी होते. 

- अनिल महादार,  ८८०६००२०२२
(लेखक बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त सहायक महाव्यवस्थापक आहेत.)


इतर कृषी शिक्षण
केवायसी : ओळख खातेदाराची...बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’...
वनशास्त्रातील शिक्षण, व्यावसायिक संधी वने ही जैवविविधतेचे आगर आहेत. हे लक्षात घेता बी....
जैवतंत्रज्ञान विषयात करिअर संधी...जीवशास्त्र आणि त्याबरोबरच तंत्रज्ञान विषयाची आवड...
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...
कृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...