agricultural news in marathi Late wheat cultivation techniques ... | Agrowon

उशिरा गहू लागवडीचे तंत्र...

डॉ. आदिनाथ ताकटे
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-१९९४),निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४) किंवा एकेएडब्ल्यू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी.

बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-१९९४),निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४) किंवा एकेएडब्ल्यू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी.

यंदा परतीच्या दमदार पावसाने हजेरी लावल्याने जमिनीत वाफसा येण्यास विलंब लागला. मशागतीस पुरेसा वेळ मिळाला नाही. त्याच बरोबर ऊस तोडणीनंतर, खरीप पिकांच्या काढणीस उशीर झाल्याने गहू लागवड उशिरा होत आहे. बागायती उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही शेतकरी १५ डिसेंबरनंतरही पेरणी करतात. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते.

 • पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन वजन वाढते.
 • बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्ल्यू-१९९४),निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू-३४) किंवा एकेएडब्ल्यू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी.
 •  बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे लागते. रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाढ्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ सें.मी.अंतरावर बियाणे पेरावे.
 • पेरणी करतेवेळी निम्मे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश (९०किलो नत्र :६० किलो स्फुरद :४० किलो पालाश प्रति हेक्टरी) म्हणजेच ९७ किलो युरिया, ३७५ किलो सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६७ किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता ९७ किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.
 •  पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
 • पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दाबून झाकले जाते.
 • जमिनीचा उतार लक्षात घेऊन २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.
 • बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी.
 • जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी द्यावे. तापमान कमी राहाण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसांच्या दरम्यान द्यावे.
 • बागायत उशिरा पेरणी केलेल्या पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात. जर एकच पाणी उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल, तर पहिले पाणी २० ते २२, दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

जातींची निवड 
फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४) 

 •  बागायत वेळेवर व उशिरा पेरणीसाठी
 •  बागायती वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी शिफारस.
 •  तांबेरा रोगास प्रतिकारक
 •  प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त. चपातीसाठी उत्तम
 • - बागायती वेळेवर ११५ दिवस, बागायती उशिरा पेरणीखाली ११० दिवस पक्वता.
 •  बागायती वेळेवर पेरणीचे उत्पादन ४५ ते ५० क्विंटल/हेक्टरी
 •  बागायती उशिरा पेरणीचे उत्पादन ४२ ते ४५ क्विंटल/हेक्टरी

निफाड -३४ (एनआयएडब्ल्यू ३४) 

 •  बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारस.
 •  मध्यम टपोरे दाणे, प्रथिने १३ टक्क्यांपेक्षा अधिक.
 •  तांबेरा रोगास प्रतिकारक.चपातीसाठी उत्तम
 •  पक्व होण्याचा कालावधी १०० दिवस
 •  ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन.

संपर्क : डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर कृषी सल्ला
द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे करा प्रभावी...वातावरणात होणारे हे बदल द्राक्ष बागेत भुरी रोगाचा...
उन्हाळी मूग लागवड तंत्रउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...
नंदनवनातील शेती केवळ मॉन्सून, उन्हाळीबादशाह जहांगीरने काश्मीरबाबत बोलताना म्हटले होते...
रेडूविड ढेकूण मित्र कीटकाची करा घरगुती...भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि...
किमान तापमानात घट; थंडीत वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून ते...
उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजनउन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी...
गव्हातील अन्नद्रव्यांची कमतरताजमिनीचा प्रकार, खत आणि पाणी व्यवस्थापन, जाती अशा...
एनपीए : कृषी कर्जाची थकबाकीएखाद्या कर्जखात्याचे हप्ते वेळच्या वेळी न गेल्यास...
शेतकरी नियोजन पीक : काजूशेतकरी ः उत्तम दाजी वालावलकर गाव ः वेतोरे, ता....
वनशेतीमध्ये शिसव लागवडीला संधीशिसवाच्या लाकडाला उच्च श्रेणीचे फर्निचर, प्लायवूड...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना करारशेतीतील...करार शेती ही आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये ‍...
शेतकरी नियोजन : पीक हापूस आंबाशेतकरी : देवेंद्र ज्ञानेश्‍वर झापडेकर गाव...
मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टमूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टचा वापर...
कमाल, किमान तापमानातील तफावतीमुळे...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत तापमानामध्ये...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...