चिमण्या वाचवूया...

चिमणी हा संवेदनशील असा नाजुक पक्षी असल्याने पर्यावरणातील बदल या पक्ष्यांमुळे लगेच लक्षात येतात. चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे लक्षात येताच सर्व जगाचे लक्ष त्याकडे वेधल्या गेले आणि त्यावर चिंतन सुरू झाले.
sparrows
sparrows

चिमणी हा संवेदनशील असा नाजुक पक्षी असल्याने पर्यावरणातील बदल या पक्ष्यांमुळे लगेच लक्षात येतात. चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे लक्षात येताच सर्व जगाचे लक्ष त्याकडे वेधल्या गेले आणि त्यावर चिंतन सुरू झाले. चिमणी हा पक्षी सर्व परिचित असा मानवी वसाहतीजवळ आढळणारा  छोटा पक्षी आहे. चिमणी आणि कंठाला पिवळा रंग असणारी रानचिमणी हे प्रकार आपल्या नेहमी पाहण्यात असतात. कधीकाळी चिमणीच्या किलबिलाटाने जागे होणारे आपण हळूहळू या चिमण्या आपल्यातून कधी निघून गेल्या हे आपणांस कळलेच नाही. २००३ नंतर अचानक लक्षात आले, की सदैव मानवाची संगत करणारा हा छोटा पक्षी पहिल्यासारखा बहुसंख्येने दिसत नाहीये तेव्हा त्याची कारणमीमांसा सुरू झाली आणि चिमणीच्या संवर्धनासाठी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यासारखी चळवळ सुरू करावी लागली. चिमणी हा संवेदनशील असा नाजुक पक्षी असल्याने पर्यावरणातील बदल या पक्ष्यांमुळे लगेच लक्षात येतात. चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे लक्षात येताच सर्व जगाचे लक्ष त्याकडे वेधल्या गेले आणि त्यावर चिंतन सुरू झाले. चिमण्यांची संख्या कमी होण्याची कारणे  घरट्यासाठी जागांची अनुपलब्धता चिमणी सहसा मानवी घराजवळ, वळचणीच्या जागेवर घरटे बांधते. मात्र आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमध्ये पक्ष्यांच्या रहिवासासाठी जागाच उपलब्ध नाही. बेफिकीर वृक्षतोडीमुळे चिमण्यांचा घरटे बांधण्यास नैसर्गिक रहिवास व अनुकूल जागांची उपलब्ध कमी झाली. झाडांवर घरटे बांधताना बुलबुल, कबुतरे, वटवट्या अशा पक्ष्यांशी स्पर्धा करावी लागते.  विविध प्रकारचे प्रदूषण वाढते प्रदूषण व मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीमुळे चिमण्यांना राहण्यासाठी अनुकूलता राहिली नाही. शेतामध्ये होणारा रासायनिक खतांचा तसेच कीटकनाशकाचा वापर चिमण्यांच्या संख्येस प्रतिकूल ठरते. वाढत्या शहरीकरणामुळे व वाढलेल्या मोबाईल टॉवर्स विशेषतः ४जी आणि ५जी तंत्रज्ञानामुळे जागोजागी उच्च वारंवारिता टॉवर्स आणि त्यातून उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचा छोट्या पक्ष्यांवर विशेषतः चिमणीवर विपरीत परिणाम होतो.   अन्य पक्ष्यांशी स्पर्धा वाढत्या शहरीकरणात टिकून राहताना चिमण्यांना इतर पक्ष्यांशीही अन्नासाठी स्पर्धा करावी लागते. कबुतर, घारी, कावळे अशा काही पक्ष्यांनी शहरीकरणासोबत जुळवून घेतलेले आहे. शहरांमध्ये कबुतरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा तुलनेने मोठ्या पक्ष्यांशी स्पर्धा करणे चिमण्यांना शक्य होत नाही.  जागतिक चिमणी दिवस   साजरा करण्यामागे... भारतामध्ये प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक मोहम्मद दिलावर यांनी चिमणी संवर्धनाची गरज सर्वांना लक्षात आणून दिली. नेचर फॉरएव्हर सोसायटी आणि अन्य निसर्ग संवर्धन संस्थांनी चिमणी संवर्धनाचे प्रयत्न सुरू केले. त्यातून जागतिक स्तरावर चिमणीकडे लक्ष वेधण्यास या संस्था यशस्वी ठरल्या. २०१० पासून २० मार्च रोजी जागतिक स्तरावर ४५ पेक्षा अधिक देशांमध्ये “जागतिक चिमणी दिवस” साजरा करण्यात येतो.  चिमणीसोबत मानवी वसाहतीच्या आजूबाजूला असणाऱ्या अन्य जैवविविधतेचे संरक्षण करणे हे देखील औचित्याचे ठरवले आहे. दुर्मीळ होत चाललेल्या किंवा स्थलांतरित प्राणी, पक्षी यांच्या प्रमाणे आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या सर्व सजीव मात्रांची काळजी घेण्याची गरज लक्षात आणून देण्यात येत आहे. निसर्ग संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्था आणि घटकांनी एकत्र आणून कार्याचा वेग वाढवण्याकडेही लक्ष दिले जात आहे. शाळा, महाविद्यालयीन स्तरापासून निसर्गातील विविध घटकांच्या संवर्धनाचे संस्कारासाठी विशेष अभियानाची गरज आहे. अशाच प्रयत्नांतून १५ ऑगस्ट २०१२ रोजी दिल्ली या राज्याने राज्यपक्षी म्हणून चिमणीची निवड केली. जानेवारी २०१३ मध्ये बिहार राज्यानेही चिमणी हाच राज्य पक्षी म्हणून घोषित केला.  हे करूया आपण ही आपल्या स्तरावर चिमणी वाचविण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे.    चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे लावणे. 

  • उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी गच्चीवर मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. मातीच्या भांड्यातील पाणी थंड राहत असल्याने पक्ष्यांना आवडते. 
  • शेत परिसरामध्ये झाडे, झुडपे यांचे संवर्धन करणे. 
  • पिकामध्ये कृत्रिम पक्षी थांबे किंवा मक्यासारखी आंतरपिके लावल्यास पक्ष्यांना बसण्यासाठी जागा तयार होते. त्याचा फायदा किडीच्या नियंत्रणासाठीही होतो. 
  • - डॉ. विजयश्री हेमके,  ९४२१७३२६८० (प्राणिशास्त्र विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, चिखली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com