चला, चिमण्या वाचवूया..

जिच्या किलबिलाटाने एकेकाळी दिवसाची सुरुवात व्हायची, ती चिमणी आजकाल दूर्लभ होऊ लागली आहे. ग्रामीण भागामध्ये चिमण्याचे थवे दिसत असत, तेही कमी झाले आहेत. जीवो जिवस्य जीवनम् तत्त्वाने एकमेकावर आधारीत पीक व अन्य सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पिकातील कीडींचे प्रमाण वाढत असताना त्यांच्या जैविक नियंत्रणामध्ये चिमणी अत्यंत मोलाची भूमिका पार पाडू शकते. चिमण्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.
sparrow
sparrow

जिच्या किलबिलाटाने एकेकाळी दिवसाची सुरुवात व्हायची, ती चिमणी आजकाल दूर्लभ होऊ लागली आहे. ग्रामीण भागामध्ये चिमण्याचे थवे दिसत असत, तेही कमी झाले आहेत. जीवो जिवस्य जीवनम् तत्त्वाने एकमेकावर आधारीत पीक  व अन्य सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पिकातील कीडींचे प्रमाण वाढत असताना त्यांच्या जैविक नियंत्रणामध्ये चिमणी अत्यंत मोलाची भूमिका पार पाडू शकते. चिमण्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.  चिमणी ताईच्या मुला,  खरं सांग मला आभाळातले रस्ते,  कसे सापडतात तुला! चिऊताईचे हे गाणे म्हणतच आपले बालपण गेले आहे. बालपणीचा आपला पहिला ओळख झालेला पक्षी म्हणजे ‘चिमणी’. एकेकाळी चिमण्यांच्या किलबिलाटाने आपण जागे व्हायचो. मानवी वसाहतीच्या अगदी जवळ आढळणारी चिमणी आज दिसेनाशी झाली आहे. या चिमण्या आपल्यापासून कशा दुरावल्या गेल्या ते कळलेच नाही. निसर्गप्रेमी आणि पक्षिप्रेमींच्या ही बाब ध्यानात आल्यानंतर चिमणी संरक्षणाची चळवळ सुरू झाली. चिमणी अचानक गायब होण्यामागील कारणे शोधली गेली. आणि निष्कर्ष मिळाला तो मानवी हस्तक्षेपाचा. चिमणी आपल्यातून दुरावण्यासाठी वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि वृक्षतोड इत्यादी गोष्टी कारणीभूत आहेत. साधारण २००३ नंतर पक्षिप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी जागतिक स्तरावर चिमणी संरक्षणासाठी चळवळ सुरू केली. भारतामध्ये प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक ‘मौहम्मद दिलावर’ यांनी चिमणी संवर्धनाची गरज सर्वांच्या लक्षात आणून दिली. ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ सारख्या अनेक निसर्ग संवर्धन संस्थांनी चिमणी संरक्षणासाठी प्रयत्न केले. २०१० पासून जागतिक स्तरावर २० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. आता हा दिवस ४५ पेक्षाही अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

चिमण्यांची संख्या कमी होण्याची कारणे

  • चिमणी हा मानवी घराजवळ, वळचणीच्या जागी घरटे बांधते. पूर्वी साध्या पद्धतींच्या घरांमध्ये चिमण्यांची घरटी बांधलेली दिसायची. पुढे आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतींमुळे घरटे बांधण्यास अनुकूल जागांची उपलब्धता कमी झाली. 
  • बेसुमार वृक्षतोडीमुळे चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या जागा नष्ट झाल्या. 
  • शेतामध्ये होणारा रासायनिक खतांचा तसेच कीटकनाशकाचा वापर चिमण्यांच्या संख्येस प्रतिकूल ठरते.
  • वाढत्या शहरीकरणामुळे व वाढलेल्या मोबाईल टॉवर्स विशेषतः ४जी आणि ५जी तंत्रज्ञानामुळे जागोजागी उच्च वारंवारिता टॉवर्स आणि त्यातून उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचा छोट्या पक्ष्यांवर विशेषतः चिमणीवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा केला जातो.
  • वाढत्या शहरीकरणात टिकून राहताना चिमण्यांना इतर पक्ष्यांसोबत अन्नासाठी स्पर्धा करावी लागते. अन्न मिळविताना चिमण्यांची कबुतरासारख्या आकाराने मोठ्या पक्ष्यांसोबत स्पर्धा करावी लागते.
  • चिमणी संरक्षणाची गरज  आपल्या बालपणीच्या सर्वांत जुन्या सोबत्याच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. चिमणीसह मानवी वसाहतीच्या आसपास असलेल्या इतर जैवविविधतेचे संरक्षण करणेदेखील चिमणी दिनासाठी औचित्य ठरविण्यात आले आहे. दुर्मीळ होत चाललेल्या किंवा स्थलांतर करणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी आपण अनेक प्रयत्न करतो. मात्र आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या लहानमोठ्या सर्वच सजीवांची काळजी घेणे अगत्याचे आहे. वाढत्या शहरीकरण, वृक्षतोड आणि प्रदुषणामुळे पक्ष्यांना जाणवणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.  हे करूया 

  • प्रत्येकाने आपल्या स्तरावर चिमणी वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घराशेजारी चिमणीसाठी कृत्रिम घरट्याची उभारणी करावी. 
  • उन्हाळ्यात घराच्या गच्चीवर मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. मातीच्या भांड्यातील पाणी थंड राहते, गरम होत नाही म्हणून पक्ष्यांना ते आवडते. 
  • पिकामध्ये कृत्रिम पक्षी थांबे उभारावेत. त्यामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा तयार होते. त्याचा फायदा किडीच्या नियंत्रणासाठीही होतो.
  • चिमणीची राज्यपक्षी म्हणून निवड

  • दिल्ली राज्य सरकाने राज्यपक्षी म्हणून १५ ऑगस्ट २०१२ रोजी चिमणीची निवड केली. जानेवारी २०१३ मध्ये बिहार राज्यानेही चिमणी हाच राज्यपक्षी म्हणून घोषित केला.     
  • लहान मुलांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. शाळा, महाविद्यालयीन स्तरावर संवर्धनाचे झालेले संस्कार कायम स्मरणात राहतात. त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धनाविषयी जागृत करणे आवश्यक आहे. 
  • - डॉ. विजयश्री हेमके,  ९४२१७३२६८० (प्राणिशास्त्र विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, चिखली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com