शाश्‍वत उत्पन्नासाठी एकात्मिक शेती पद्धती

गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि त्यांचे पती मॅथ्यू वल्लीकाप्पेन यांनी शाश्‍वत उत्पादनासाठी सालेम भागात १.८ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. यासाठी त्यांनी ओल्ड गोवा येथील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले.
Livestock-Fish-Horticulture based Integrated Farming System for improving livelihood of Coastal Farmers
Livestock-Fish-Horticulture based Integrated Farming System for improving livelihood of Coastal Farmers

गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि त्यांचे पती मॅथ्यू वल्लीकाप्पेन यांनी शाश्‍वत उत्पादनासाठी सालेम भागात १.८ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. यासाठी त्यांनी ओल्ड गोवा येथील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले. या प्रकल्पास त्यांनी ‘ब्लू हार्वेस्ट फार्म’ असे नाव दिले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउनचा परिणाम सर्वच स्तरांवर झालेला आहे. विशेषतः शेतीसह विविध कृषिपूरक व्यवसाय आणि अन्य व्यवसायांवरही प्रतिकूल परिणाम झाला. सागरी किनारपट्टी भागातील लोकांकडे सागरी उत्पादनाशिवाय इतर कोणतेही शाश्‍वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही. तेथील सर्व आर्थिक व्यवहार हे पर्यटन आणि सागरी उत्पादनांवर अवलंबून आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. या गोष्टीचा विचार करता एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब किनारपट्टी भागात उपयुक्त ठरू शकतो, असे दिसून आले आहे. कोळंबीमध्ये वाढता रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनाचा जास्तीचा खर्च, उपलब्ध साधनांची वाढती गरज आणि किमतीमध्ये सातत्याने होणारी घसरण या सर्व बाबींचा कोळंबी उत्पादकांना सामना करावा लागत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी गोव्यातील बिचोलिम येथील प्रगतशील शेतकरी अनिता आणि त्यांचे पती मॅथ्यू वल्लीकाप्पेन यांनी शाश्‍वत उत्पादनासाठी सालेम भागात १.८ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे. यासाठी त्यांनी ओल्ड गोवा येथील केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले. या प्रकल्पास त्यांनी ‘ब्लू हार्वेस्ट फार्म’ असे नाव दिले आहे. या प्रकल्पात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, वराहपालन, पोल्ट्री, फळझाडे, भाजीपाला, गांडूळ खत आणि बायोगॅस या घटकांचा समावेश करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी साधारणपणे २९ लाख रुपये गुंतवणूक खर्च आला. खर्च वजा करून या संपूर्ण प्रकल्पातून अपेक्षित उत्पादन मिळेल अशी आशा आहे. केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेद्वारे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, शाश्‍वत आणि संसाधनांनी परिपूर्ण अशा एकात्मिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्यपालन, वराहपालन, पोल्ट्री, फळझाडे, भाजीपाला, गांडूळ खत आणि बायोगॅस निर्मिती हे एकात्मिक शेती पद्धतीमधील मुख्य घटक आहेत. संशोधकांनी माशांच्या विविध प्रजातींच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन केले. यासोबतच मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फळबाग आणि परसबागेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संशोधकांच्या मते, या पद्धतीद्वारे शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. एकात्मिक शेती पद्धती  गोड्या पाण्यातील मत्स्यपालन 

  • मत्स्यपालनासाठी १५०० चौरस मीटरच्या चार गोड्या पाण्याच्या तलावामध्ये विविध प्रजातींचे मासे सोडण्यात आले.
  • एशियन सीबास (लेट्स कॅल्कारिफर) ४ हजार ५००, मोझांम्बिक तिलापिया (ओरियोक्रोमिस मोसाम्बिकस) १५ हजार आणि पट्टेरी कॅटफिश (भासा) ४ हजार मासे सोडण्यात आले.
  • योग्य खाद्यपुरवठा आणि १० महिन्यांच्या संगोपनानंतर सीबास दीड ते अडीच किलो, भासा १ ते १.२ किलो आणि तिलापिया ३०० ते ४०० ग्रॅम एवढ्या सरासरी वजनाचा एक मासा मिळाला.
  • सीबास, तिलापिया आणि भासा या माशांपासून अनुक्रमे ६ हजार, ८ हजार आणि ६ किलो एकूण माशांचे उत्पादन मिळाले.
  • वराहपालन 

  • हॅम्पशायर, लार्ज ब्लॅक, अगोंदा गोवन, लार्ज व्हाइट यॉर्कशायर, लँडरेस आणि ड्युरॉक या जातींचे संगोपन.
  • वराहपालनातून साधारणपणे प्रति महिना २,५०० किलो मांस उपलब्धता.
  • कुक्कुटपालन 

  • कुक्कुटपालनामध्ये साधारणपणे १५० कोंबड्यांचे संगोपन.
  •  श्रीनिधी, वनराजा आणि ग्रामप्रिया या जातींचे संगोपन.
  • एक कोंबडी साधारणपणे २ किलो वजनाची भरली. साधारणपणे एका कोंबडीपासून १२० अंडी मिळाली.
  • फळबाग आणि परसबाग लागवड 

  • फळबागेमध्ये अननस, केळी, पपई आणि पॅशन फ्रूट्‍स यांची लागवड करण्यात आली. त्यापासून साधारणपणे १५० क्विंटल उत्पादन.
  • घरगुती वापरासाठी परसबागेतून तांदळी, पडवळ, काकडी, लाल माठ, सुरण आणि इतर कंदमुळांचे उत्पादन.
  • इतर नियोजन 

  • अन्न, फळे, भाजीपाला आणि मांस आदींपासून शिल्लक राहिलेले घटक वराह आणि भासा माशांना खाद्य म्हणून दिले जातात. उर्वरित टाकाऊ कचरा कंपोस्टनिर्मितीसाठी वापरला जातो.
  • डुक्करांची विष्ठा आणि इतर टाकाऊ पदार्थ बायोगॅस युनिटसाठी वापरले जातात. त्यापासून तयार झालेल्या ऊर्जेचा वापर जेवण बनवण्यासाठी करण्यात येतो.
  • प्रकल्पामधून साधारणपणे वर्षाला ४० टन कंपोस्टनिर्मिती होते. त्यापैकी २० टन कंपोस्टची विक्री करून उर्वरित कंपोस्ट प्रकल्पातील शेतामध्ये वापरले जाते.
  • एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे 

  • विविध पिकांची लागवड आणि इतर कृषिपूरक व्यवसायांचा अवलंब केल्यामुळे एकात्मिक शेती पद्धती अधिक फायदेशीर.
  • एक पीक पद्धतीच्या तुलनेत दुप्पट उत्पादनास मिळण्यास मदत होते.
  • एक पीक पद्धतीमुळे पिकांचे होणारे संभाव्य नुकसान कमी होण्यास मदत.
  • एकात्मिक शेती पद्धतीमुळे शाश्‍वत उत्पादन मिळून आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत.
  • या शेती पद्धतीमुळे संसाधने आणि सेंद्रिय कचऱ्याच्या पुनर्वापरामध्ये वाढ
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com