agricultural news in marathi Low cost ripening chamber for small land holding farmers | Agrowon

अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग चेंबर

राजकुमार चौगुले
बुधवार, 14 एप्रिल 2021

तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राने छोट्या केळी पिकवणगृहाचा अर्थात ‘रायपनिंग चेंबर’ कक्षाचा प्रसार केला आहे. 

तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राने छोट्या केळी पिकवणगृहाचा अर्थात ‘रायपनिंग चेंबर’ कक्षाचा प्रसार केला आहे. अल्पभूधारकांची गरज लक्षात घेऊन किफायतशीर किंमतीचे, कमी जागेत मावणारे व २४ तासात केळी पिकवणारे हे चेंबर आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांकडे त्याची प्रात्यक्षिके यशस्वी झाली आहेत.

सांगली, कोल्हापूर भागात केळी पिकाखाली क्षेत्र वाढू लागले आहे. अलीकडे शेतकरी केळी पिकवण्याचे तंत्र म्हणजे रायपनिंग चेंबरचा (पिकवण कक्ष) वापर करू लागले आहेत. मात्र अल्पभूधारकांसाठी मोठ्या आकाराची चेंबर्स खर्चिक ठरतात असा अनुभव आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले) येथे डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. केव्हीकेने छोट्या शेतकऱ्यांची समस्या ओळखून छोट्या आकाराचे मात्र प्रभावी रायपनिंग चेंबर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या कक्षाची निर्मिती केली आहे. त्यात केळी पिकविण्याबाबत शिफारशी बाबत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत. केव्हीकेने सांगली व कोल्हापूर भागातील निवडक चार केळी उत्पादकांना हे तंत्र पुरवले आहे. पैकी दोघांना केव्हीकेच्या खर्चाने देण्यात आले. अन्य दोघांनी ते खरेदी केले आहे.

रायपनिंग चेंबरचे तंत्र

 • चेंबर उभारणीसाठी खेळती हवा असलेल्या ठिकाणाची निवड
 • पीव्हीसी पाइप फ्रेमचा सांगाडा. चेंबर उभे केल्यानंतर जमिनीवर प्लॅस्टिक मॅट
 • सांगाड्यावर सिलपॉलीन घटकाचे नेटप्रमाणे आच्छादन. त्याची जाडी ०.३३ मिमी.
 • चेंबरमध्ये हवा खेळती राहील या प्रमाणे क्रेटसची थरांमध्ये मांडणी.
 • दोन थरांमध्ये हवा खेळती राहील अशी रचना असावी.
 • चेंबर उभारण्यासाठी पीव्हीसी पाइप, सिलपॉलींन घटक यासाठी सुमारे सात हजार रुपये खर्च. याशिवाय इथिलिन वायूच्या बारा सिलेंडरचा बॉक्स घ्यावा लागतो. त्याची किंमत दोनहजार रुपयांपर्यंत.

केळी पिकण्याची प्रक्रिया

 • पक्व केळीच्या फण्यांची निवड
 • फण्यातील केळी ‘कोंब कटर’च्या साहाय्याने विलग करणे
 • या केळीला ०.२ टक्के शिफारसीत बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवणे. किंवा एक लिटर पाण्यासाठी
 • ४ ग्रॅम तुरटीचाही वापर करता येतो. त्यानंतर फळे कोरडी करून चेंबरमध्ये ठेवावीत.
 • प्लॅस्टिक क्रेटमध्ये ठेवून चेंबरमध्ये ३ ते ४ स्तराप्रमाणे रचावीत.
 • सुमारे ९० टक्के आर्द्रता निर्माण करण्यासाठी चेंबरच्या आंतरिक चारही बाजूस पाण्यात भिजविलेली सुती चादर वा गोणपाट टांगून घ्यावा आणि चेंबर बंद करावे.
 • विशिष्ट छिद्रातून बाहेरून सिलिंडर मधून १० ते १५ सेकंद इथिलिन वायू ( १०० पीपीएम) आत सोडावा
 • प्रति सिलेंडरच्या माध्यमातून दोन टन तर बारा सिलेंडरच्या साहाय्याने चोवीस टन केळी पिकू शकतात.
 • चेंबर ठेवलेल्या खोलीचे तापमान वातानुकूलित यंत्राच्या साहाय्याने २० अंश सेल्सियसपर्यंत ठेवावे.
 • इथिलीन वायू सोडल्यामुळे बारा तासांनी पुन्हा चेंबरचा पडदा २० मिनिटांसाठी उघडून ठेवावा.
 • जेणे करुन प्रक्रियेत तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर जाईल. वीस मिनिटांनी पुन्हा चेंबर बारा तासापर्यंत बंद ठेवावा.
 • पिकविल्यानंतर वजनात साधारणतः: १० ते १५ टक्के घट होऊ शकते.

रायपनिंग चेंबर- तुलनात्मक बाबी
 

घटक छोटा चेंबर मोठा चेंबर
आकार ७ बाय ७ चौरस फूट १५०० चौ.. फूट.
क्षमता एक टन २० टन
किंमत ९५०० रू. ३० लाख रू.
केळी पिकविण्यासाठी २४ तास (रंग येण्यासाठी सहा तास) ९६ तास ( ४ दिवस)
पिकविल्यानंतर टिकवण क्षमता (१३ ते १५ अंश से. तापमान) ५ ते ६ दिवस कमी तापमानात ८ ते १० दिवस

चौगुले यांना झाला जादा नफा
चेंबरची प्रात्यक्षिके गोटखिंडी (जि. सांगली) येथील दीपक फाळके, निमशिरगाव (जि.कोल्हापूर) येथील विक्रम चौगुले, दत्ता पाटील,येळवडे ( जि. कोल्हापूर) आदी शेतकऱ्यांकडे घेण्यात आली आहेत. विक्रम चौगुले यांच्या शेतात रायपनिंग चेंबर बसविण्यात आले आहे. त्यांची दोन एकर केळी आहे. सन २००८ पासून ते केळी घेतात. जून ते डिसेंबर दरम्यान उत्पादन सुरु असते. केव्हीकेने संपूर्ण मार्गदर्शनासह इथिलीन वायूचे प्रसारण किती करायचे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. काही कालावधीनंतर या तंत्रज्ञान वापराचे शास्त्र लक्षात येऊन केळी पिकविण्यास प्रारंभ केला. संपूर्ण हंगामात चौगुले यांनी सुमारे तीन टन केळी पिकविली. गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्याने मागणी अनियमित होती. यामुळे थोड्या थोड्या अवधीने केळी पिकविली. एकावेळी ८०० किलोपर्यंत केळी पिकवून विक्री केली. चेंबर बसविण्यापूर्वी पूर्ण न पिकलेल्या केळीचे १९ किलोचे क्रेट १५० रुपयापर्यंत ते व्यापाऱ्यांना देत. आता केळी पिकविल्यामुळे त्याची २५० रुपये दराने विक्री केली. केळीचा दर्जा चांगला राहिल्याने दरही चांगला मिळाला.

पिकवून विकल्याने प्रति टन चार हजार तर एकूण हंगामात तीन टनांसाठी तेरा हजार रुपये जास्त मिळाले. अन्य रायपनिंग चेंबरमध्ये केळी नेऊन पिकविण्यासाठी वाहतूक खर्च येतो. चेंबर शेतात किंवा घरी बसविले तर खर्चात मोठी बचत होतेच. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांची केळी पिकवूनही उत्पन्नाचा आणखी मार्ग तयार करू शकतो. हा आत्मविश्‍वास चौगुले यांना आला आहे.

केव्हीकेमार्फत रायपनिंग चेंबर तंत्रज्ञान पोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे.
- दीपाली म्हस्के, ८४८४०६८९६५
(विषय विशेषज्ज्ञ, गृहविज्ञान विभाग केव्हीके, तळसंदे)

संपर्क- विक्रम चौगुले- ९४२१९७६३५९
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...