कोळींनी जपलेली खपली गव्हाची दर्जेदार शेती

पाच्छापूर (जि. सांगली) येथील महेश नरसाप्पा कोळी यांनी वडिलांच्या काळापासून सुरू असलेली देशी खपली गव्हाची शेती आजही यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली आहे. दरवर्षी किमान अडीच एकर त्याचे क्षेत्र असते. पुरणपोळी, उप्पीट आदी विविध प्रकारांसाठी महत्त्व असलेल्या या दर्जेदार गव्हाला ग्राहकांची जागेवरच बाजारपेठ कोळी यांनी मिळवली आहे.
खपली गव्हाची दर्जेदार ओंबी
खपली गव्हाची दर्जेदार ओंबी

पाच्छापूर (जि. सांगली) येथील महेश नरसाप्पा कोळी यांनी वडिलांच्या काळापासून सुरू असलेली देशी खपली गव्हाची शेती आजही यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली आहे. दरवर्षी किमान अडीच एकर त्याचे क्षेत्र असते. पुरणपोळी, उप्पीट आदी विविध प्रकारांसाठी महत्त्व असलेल्या या दर्जेदार गव्हाला ग्राहकांची जागेवरच बाजारपेठ कोळी यांनी मिळवली आहे. सांगली शहरापासून सुमारे शंभर किलोमीटरवर जत हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. विस्ताराने मोठा असलेल्या या तालुक्यात विविध पिके घेतली जातात. एका बाजूला म्हैसाळ योजनेचे पाणी आलं आणि त्या भागातील शिवारे हिरवीगार झाली. तरीही तालुक्यातलं पाण्याचं दुर्भिक्ष अजून संपलेलं नाही. उष्ण तापमान, जिकडं पहावं तिकडं माळरान. पण तरीही त्यावर शेतकऱ्यांनी शाश्‍वत पाण्याची सोय करून पिकवलेली द्राक्ष आणि लालचुटुक डाळिंब अशी आश्‍वासक दृश्‍यही पाहण्यास मिळतात. कोळी यांची शेती जत शहरापासून दहा किलोमीटरवर वसलेलं पाच्छापूर गाव देखील पाण्याच्या टंचाईतून सुटलेले नाही. येथील महेश नरसाप्पा कोळी यांची ३० एकर शेती आहे. जमीन मध्यम व हलक्या प्रतीची आहे. पाणी क्षारयुक्त असल्याने काही प्रमाणात जमिनी क्षारपड झाल्या आहेत. महेश यांचे वडील पारंपरिक शेती करायचे. पाण्याची कमतरता असल्याने थोड्या क्षेत्रावर खरीप, रब्बी पिके घ्यायचे. जोडीला सुरू हंगामात को ८६०३२ ऊस वाणाची लागवड केली जायची. या भागात उसाचे उत्पादन तसे कमीच. परंतु घरखर्चाला उसाचा आधार मिळायचा. सन १९९८ मध्ये वडिलांचे छत्र हरपले. शेतीची जबाबदारी आई श्रीमती शीलाबाई यांच्याकडे आली. आईबरोबर महेशही शेतीत राबू लागले. नगदी पिकाला पाण्याची कमतरता होती. त्यामुळे पावसावर पिके घ्यायचो. नऊ कूपनलिका, तीन विहिरी घेतल्या. पुरेसं पाणी उपलब्ध झालं. आज महेश, पत्नी सावित्री, भाऊ काडाप्पा व त्यांच्या पत्नी सुनीता असे कुटुंबातील सारे सदस्य शेतात राबतात. महेश यांची बाजारपेठेतील कल पाहून पैसा देणाऱ्या पिकांकडे लक्ष दिले. त्यातून २०१२ मध्ये दीड एकरांवर द्राक्षाची लागवड केली. हळूहळू त्यात जम बसू लागला. तसे क्षेत्र साडेचार एकरांवर नेले. तीन वर्षांपासून बेदाणानिर्मितीस सुरुवात केली. वर्षाला १४ ते १५ टन बेदाण्याची विक्री केली जाते. जोडीला तूर १२ एकर, ज्वारी, हरभरा, मका, कांदा ही पिकेही असतात. खपली गव्हाची टिकवली शेती महेश यांनी वडिलोपार्जित होत असलेली देशी खपली गव्हाची शेती आज टिकवून धरली आहे. आई-वडिलांकडून घेतलेले शेतीचे धडे त्यांना उपयोगी पडत आहेत. दरवर्षी किमान अडीच एकर गव्हाचे क्षेत्र असते. अर्थात, पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते कमी- जास्त होते. शेतीत यांत्रिकीकरणचा वापरही होत आहे. महेश सांगतात, की २०१९ पासून आमच्याकडे परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे पाण्याची सोय झाली. विहीर आणि कूपनलिकेच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे खपली गव्हाचे क्षेत्र वाढवले आहे. ...असे आहे व्यवस्थापन नोव्हेंबरमध्ये यंत्राच्या मदतीने पेरणी होते. पूर्वी टोकण पद्धतीचा वापर व्हायचा. प्रत्येकी ५० टक्के सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा वापर होतो. दोन ओळींत १२ इंच व दोन रोपांत तीन ते इंच इंच अंतर असते. दोन ओळींत अंतर जास्त ठेवल्याने वाफसा व गारवा राहतो. फुटवे मिळण्यास मदत होते. एकूण कालावधीत सात ते आठ पाणी पुरेसे ठरते. पाटपाण्याचा वापर केल्याने वाफसा पद्धतीने पाणी देणे सोपे होते. सुमारे पाच महिन्यांचा पीक कालावधी आहे. उत्पादन व विक्री एकरी सरासरी १२ क्विंटल (सोलपटासह) उत्पादन आणि दरही त्याच्यासहितलाच मिळतो. त्यासाठी उत्पादन खर्च सुमारे २० हजार रुपये किमान येतो. बाजारात देशी खपली गव्हाला मागणी जास्त आहे. अनेक वर्षांपासून उत्पादन घेत असल्याने परिसरात ग्राहक तयार झाले आहेत. ते जागेवर येऊन खरेदी करतात. काही विक्री व्यापाऱ्यांना तसेच जत आणि सांगली बाजारातही होते. जत शहरातही मागणीनुसार पुरवठा केला जातो. कोळी सांगतात, की काढणीनंतर त्वरित विक्री करीत नाही. दीड ते दोन महिने घरात गहू ठेवतो. बाजारातील मागणी आणि दर यांचा अंदाज घेतो. आवक कमी असेल त्या वेळी गरजेनुसार विक्री होते. त्यातून अपेक्षित दर मिळण्यास मदत होते. महेश यांच्याकडील गहू क्षेत्र, त्यातील उत्पादन व दर सन.... क्षेत्र.... उत्पादन... .दर रु. किलो २०१८-१९.. .दोन एकर....२० क्विंटल.. .५५ २०१९-२०...३५ गुंठे...८...क्विंटल... .४८ २०२०-२१....अडीच एकर...३२ क्विंटल...६० गाव जपतेय खपली गव्हाची शेती पाण्याच्या उपलब्धतेवर गावातही सुमारे ४० एकर वा त्यापुढे खपली गव्हाची शेती होत असावी असा महेश यांचा कयास आहे. परतीचा पाऊस सातत्याने चांगला होत असल्याने गावातील शेतकऱ्यांत लागवडीबाबत उत्साह आहे. ‘आत्मा’ विभागाच्या अंतर्गत गावात शेतीशाळेच्या माध्यमातून खपली गव्हाचे उत्पादन वाढीसाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. त्यासाठी २५ एकरांतील शेतकऱ्यांना एकत्र करण्यात आले आहे. त्यांचा गट स्थापन करून गव्हाचा ब्रॅण्ड तयार करण्याचे नियोजन आहे. सांगली शहरासह अन्य मोठ्या शहरांत विक्रीसाखळी उभी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून त्यासाठी व्यवस्था उभी केली जाणार आहे. संपर्क : महेश कोळी, ९४२१४०४०३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com