agricultural news in marathi Management of broiler hens in summer | Page 2 ||| Agrowon

उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन

डॉ. श्रद्धा राऊत, डॉ. शरद दुर्गे
गुरुवार, 18 मार्च 2021

वाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी प्रतिकारके शरीरात तयार होण्यासाठी जे जीवनसत्त्व आणि खनिजांची आवश्यकता असते ते उपलब्ध न झाल्यामुळे कोंबड्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारके निर्माण होण्यास अडथळा येतो. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यातील व्यवस्थापनात बदल करावेत.
 

वाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी प्रतिकारके शरीरात तयार होण्यासाठी जे जीवनसत्त्व आणि खनिजांची आवश्यकता असते ते उपलब्ध न झाल्यामुळे कोंबड्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारके निर्माण होण्यास अडथळा येतो. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यातील व्यवस्थापनात बदल करावेत.

सध्या तापमानाची पातळी वाढत चालली आहे. वाढलेल्या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. याचा परिणाम म्हणून शरीरातील ऊर्जा व पाण्याचा ऱ्हास होतो. त्यामुळे कोंबड्या उष्माघातास बळी पडतात. अशा परिस्थितीत ब्रॉयलर कोंबड्यांचे  योग्य नियोजन करणे आवश्यक असते. 

 ज्या वेळी कोंबड्यांच्या सभोवतालचे तापमान ३८ अंश सेल्सिअस ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, त्या वेळी त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू लागतो. ब्रॉयलर कोंबड्यांच्या वाढीसाठी १८.३३ अंश सेल्सिअस ते २३ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे. या तापमानामध्ये कोंबड्यांची वाढ योग्य प्रमाणात होते. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमानाचे कोंबड्यांच्या शरीरावर अपायकारक परिणाम होऊ शकतात.  

कोंबड्यांमध्ये घामग्रंथी नसतात, त्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कोंबड्या जास्तीत जास्त पाणी पितात. खूप जास्त प्रमाणात असलेल्या तापमानासोबत जुळवून घेण्यासाठी कोंबड्या शरीराची हालचाल कमी करतात. पंख पसरून बसतात. 

 अति तापमानामध्ये कोंबड्या चोच उघडी ठेवून जास्तीत जास्त उष्णता बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये शारीरिक ऊर्जेचा ऱ्हास होतो. जेव्हा जेव्हा वातावरणातील तापमान १ अंश सेल्सिअसने वाढते (२० ते ३० अंश सेल्सिअसच्या मध्ये) तेव्हा कोंबड्या १ ते १.५ टक्क्यापर्यंत कमी खाद्य खातात. तसेच जेव्हा तापमान ३२ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा त्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण ५ टक्के कमी होते. याचाच अर्थ असा, की कमी खाद्य ग्रहणातून कोंबड्यांना मिळणारी पोषणतत्त्वे जसे की प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांची पूर्तता होत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच प्रतिकारशक्ती निर्मितीवर होतो.

 वाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारे प्रतिकारके शरीरात तयार होण्यासाठी, जी जीवनसत्त्व आणि खनिजांची आवश्यकता असते ते उपलब्ध न झाल्यामुळे शरीरामध्ये प्रतिकारके निर्माण होण्यास अडथळा येतो. यामुळे उन्हाळात कोंबड्यांना जास्त प्रमाणात त्रास होतो. 

वाढलेल्या उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना 
पोल्ट्री फार्मचे नियोजन 

  • पोल्ट्री शेडच्या बांधकामाची दिशा पूर्व-पश्‍चिम असावी. जेणेकरून सूर्यकिरणे थेट शेडमध्ये पडणार नाहीत आणि तापमान नियंत्रित राहील. पोल्ट्री शेडला बाहेरून पांढरा रंग व आतील भागात चुना लावून घ्यावा. त्यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतील. 
  • सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर कोंबडीला ०.५ चौ.फूट जागा आवश्यक असते. नंतरच्या काळात प्रति कोंबडी १ चौ. फूट जागा मिळेल असे शेड असावे. 
  • पोल्ट्री शेडमध्ये हवा खेळती राहावी असे नियोजन असावे. यामुळे शेडमधील तापमान कमी राहण्यास मदत मिळते. पोल्ट्री शेडमध्ये थर्मामीटर ठेवावे. यामुळे शेडमधील तापमान कळण्यास मदत होते. 
  • पोल्ट्री शेडचे छत गहू, भात पिंजाराने झाकावे. खिडक्यांना पडदे बसवावेत. दुपारी त्यावर पाणी मारावे. शक्य असेल तर शेडमध्ये कूलरचा वापर करावा. तसेच वेळोवेळी रॅकिंग करावी.

पाण्याचे नियोजन 

  • एक कोंबडी साधारणत: एक किलो मागे दोन लिटर पाणी पिते. खाद्य व पाणी यांचे प्रमाण साधारणत: १:२ असे असते. हेच प्रमाण उन्हाळ्यामध्ये १:४ एवढे वाढते.
  • उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या भांड्याची संख्या २५ टक्यांनी  वाढवावी. तसेच दिवसातून ४ ते ५ वेळा पाण्याची भांडी थंड पाण्याने भरावीत. तसेच पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट्स द्यावीत.

खाद्याचे नियोजन 

  • कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळच्या वेळेत द्यावे. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांची जास्तीत जास्त शारीरिक ऊर्जा शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यात निघून जाते. 
  •  उन्हाळ्यामध्ये खाद्य बनवताना जास्तीत जास्त मेदयुक्त पदार्थांचा वापर करावा. मेदयुक्त खाद्याचे ग्रहण केल्यावर शरीरात निर्माण होणाऱ्या पाण्याचे प्रमाण हे कर्बोदके व प्रथिने यांच्यापेक्षा जास्त असल्याने पचनक्रियेत कमी उष्णता निर्माण होते. 
  • खाद्य आणि प्रथिने यांचे गुणोत्तर साधण्यासाठी मेदयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास फायदेशीर ठरतो. तसेच खाद्यामध्ये मॅंगेनीज, झिंक, लोह, सेलेनियम, कॉपर, आयोडीन, कॅल्शिअम इ. खनिजांचा समावेश करावा. या सोबतच जीवनसत्त्व अ, बी२, डी३, के आणि बी१२ देखील खाद्यातून किंवा पाण्यातून देणे आवश्यक आहे. 
  • खाद्यामध्ये जीवनसत्त्व सी आणि ईचा समावेश केल्यास प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच शरीरावरील तणाव कमी करण्यास मदत करतात. 

- डॉ. श्रद्धा राऊत,   ९२७०७०६००३
(पशुपोषण आहारशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...