agricultural news in marathi Management of hens in winter | Page 2 ||| Agrowon

हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन

डॉ. गणेश काळुसे,  डॉ.व्ही. एन. सिडाम
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

कोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य, पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच आफ्लाटॉक्सीकोसिस व इतर विषबाधा आढळतात.
 

कोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य, पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच आफ्लाटॉक्सीकोसिस व इतर विषबाधा आढळतात.

कोंबड्या आजारांना लवकर आणि मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतूमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य बदल करावा लागतो. आजार प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटते, मृत्यू होतो. हे लक्षात घेऊन कोंबड्यांचे विविध आजारांपासून संरक्षण आवश्यक आहे. 

 •  हिवाळ्यामध्ये अतिथंडीमध्ये कोंबड्यांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अंडी उत्पादनात घट येते. ऋतुमानानुसार हवामानात होणाऱ्या अचानक बदलामुळे कोंबड्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होतो.
 •  थंडीपासून बचावासाठी शरीरात ऊर्जा (ऊब) तयार करण्यासाठी कोंबड्या पंखाखाली पाय घेऊन मान पंखामध्ये घेऊन बसतात, खाद्य जास्त प्रमाणात खातात. पाणी कमी प्रमाणात पितात. 
 •  अतिथंडी व शेडमधील ओलसरपणामुळे शेडमध्ये रोगकारक जिवाणू परजीवींची संख्या वाढते. या जिवाणू आणि परजीवींशी संपर्क येऊन कोंबड्यामध्ये आजार उद्‌भवतात. मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 
 •  हिवाळ्यामध्ये आजाराचे प्रमाण, आजारी कोंबड्यांचे प्रमाण व मृत्युदर हा मुख्यतः व्यवस्थापनाच्या प्रकार आणि लसीकरणावर अवलंबून असते.
 •  विविध हवामानातील बदलांशी समरस होण्यासाठी कोंबड्यांचे वय महत्त्वाचे असते. दोन महिन्यांच्या आतील (हा मुख्य वाढीचा काळ आहे) आणि सहा महिन्यांच्या वरील वयाच्या कोंबड्या (वयात येणाऱ्या) हे संसर्गजन्य आजारांना जास्त प्रमाणात बळी पडतात. 

लक्षणे 

 •  कोंबड्यामध्ये हिवाळ्यातील आजारांमध्ये मुख्यतः श्‍वसनास त्रास होणे, तणावाखाली असणे, नैराश्य असणे, हगवण, खाद्य न खाणे, विखुरलेले पंख, सुजलेला चेहरा व पाय पुढे घेऊन पडून राहणे यासारखी लक्षणे आढळतात. त्यामुळे निदान करणे अवघड होते. 
 •  हिवाळ्यामध्ये मुख्यत: आय.बी.डी. (गंबोरो), फाऊल पॉक्स, फाऊल कॉलरा, ई-कोलाय, सॅलमोनेला हे आजार दिसतात.
 •  अति थंडीमध्ये हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे गादी साहित्य तसेच खाद्यामध्ये कवकांची/बुरशीची वाढ होते. यामुळे अस्परजिलेसिस आजाराचा प्रादुर्भाव होऊन हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या गाठी फुफ्फुसात निर्माण होऊन श्‍वसनामध्ये अडथळा येतो.
 •  हिवाळ्यामध्ये कोंबड्या जास्त प्रमाणात आजारी पडण्याच्या प्रमाणाला  शेडमधील अनियंत्रित हवामान कारणीभूत ठरते. यामध्ये शेड व्यवस्थापन नीट नसणे, शेडमध्ये पुरेशी हवा खेळती न राहणे, एका ठिकाणी जास्त कोंबड्या ठेवणे, खाद्य कमी पुरवठा करणे हे घटक आजारी पडण्यास कारणीभूत ठरतात.
 •  कोंबड्यापासून चांगल्याप्रकारे उत्पादन मिळविण्यासाठी शेडमधील तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहणे आवश्यक आहे. परंतु थंडीमध्ये काही भागातील तापमान २१ अंश सेल्सिअसपेक्षा खूप कमी होते, अशावेळी कोंबड्यांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जादा ऊर्जेची गरज असते. हिवाळ्यामध्ये जर तापमान खूपच कमी झाले तर कोंबड्या थंडीच्या कडाक्याने मृत्युमुखी पडतात. 

हिवाळ्यातील आजाराचे नियंत्रण 

 •  हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविणे आणि उबदारपणासाठी कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो. ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्त्वे वाया जातात. खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे. इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे.
 •  शेडमध्ये दोन्ही बाजूंच्या जाळ्यांना पडदे लावावेत. हे पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्या वेळी पडदे उघडावेत.
 •  शेडमधील तापमान विजेचे बल्ब, शेगडी किंवा बुडरच्या साह्याने वाढवावे. लोडशेंडिंगच्या काळात शेडमधील तापमान वाढविण्याकरिता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर, बॅटरीची सोय करावी.
 •  मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे. जेणेकरून पोषणतत्त्वांची कमतरता होणार नाही.
 •  कोंबड्यांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकण्यास मदत होते.
 •  बऱ्याचवेळा शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंताची अंडी तयार होतात. त्यामुळे प्रत्येक तीन महिन्याला जंतनिर्मूलन करणे फायदेशीर ठरते. गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
 •  कोंबड्यासाठी शेड तयार करताना प्रत्येक ऋतूमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल, असे नियोजनपूर्वक शेड तयार करावे. तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी.
 • कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा.
 • ज्या वेळी हवामानात अचानक बदल होऊन कोंबड्यांवर ताण येतो, त्या वेळी आहारात इलेक्ट्रोलाइट्‌स व ‘ब’ जीवनसत्त्वाचा वापर करावा, जेणेकरून कोंबड्यांवरील ताण कमी होईल.

- डॉ. गणेश काळुसे  ८८३०६४८७३७, (कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर)


इतर कृषिपूरक
स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर म्हणजे काय? कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा...
सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल? दुग्धव्यवसायातील सर्वात खर्चिक आजार म्हणजे कासदाह...
जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा करा योग्य...योग्य प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीत...
जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध...
आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?शेळी पालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला...
पशुपालकांना मिळणार KCC अंतर्गत पैसे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना...
पशुपालन क्षेत्रात गुंतवणुकीची गरज भारतीय कृषी-अन्न व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच...
दुधाळ जनावरांसाठी कॅल्शियमचे महत्त्व गाय म्हैस विल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅल्शियमची...
भारताच्या डेअरी निर्यातीत पुढील दशकात...भारतातील दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत पुढील...
गोपैदाशीचे धोरण अन् उद्दिष्टे...उच्च आनुवंशिकता आणि दुग्धोत्पादन क्षमता असलेली...
कोंबड्यांना द्या योग्य गुणवत्तेचे पाणीकोंबड्यांना पाणी देण्यापूर्वी शुद्धीकरण करावे....
जनावरांमधील आंत्रविषार आजारजनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना पावसाळ्यात...
जनावरे वारंवार उलटण्याची समस्यापशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांची माजाची...
कृत्रिम रेतनाची योग्य वेळ महत्त्वाची जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करताना गर्भधारणा यशस्वी...
मध निर्यातीला चालना देण्यावर अपेडाचा भर पुणे - युरोप आणि इतर देशांमध्ये मधाच्या...
अंडी शाकाहरी कि मांसाहारी?मुळातचं अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया...
जनावरांमधील थायलेरीया आजारथायलेरीया हा परोपजीवीमुळे होणारा आजार असून याची...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
शाश्‍वत मत्स्यसंवर्धनात नवीन संधीशाश्‍वत मत्स्यसंवर्धन हे अनेक प्रकारे शेतीशी...
शेतकरी नियोजन रेशीम शेतीमागील काही वर्षांत परभणी तसेच हिंगोली, नांदेड या...