agricultural news in marathi management of Mustard sawfly | Page 2 ||| Agrowon

मोहरीवरील काळी माशी नियंत्रण 

डॉ. संजोग बोकन, डॉ. बसवराज भेदे
मंगळवार, 26 जानेवारी 2021

सध्याचे थंड व मध्येच ढगाळ वातावरण राहत असून, ते विविध किडींच्या वाढीसाठी पोषक आहे. मोहरी पिकामध्ये काळी माशीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. 
 

सध्याचे थंड व मध्येच ढगाळ वातावरण राहत असून, ते विविध किडींच्या वाढीसाठी पोषक आहे. मोहरी पिकामध्ये काळी माशीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. 

काळी माशी (Mustard sawfly) 
ओळख 

 प्रौढ माशीचे डोके गडद काळे, पोटाचा भाग केशरी रंगाचा, पंख काळसर. अळी मृदू काळसर रंगाची असून ८ पायांची जोडी असते. अळीला थोडा त्रास झाल्यास खाली जमिनीवर पडून शरीर गोल आकारात करून मेल्याचे ढोंग करते. त्यालाच ‘फेगनिंग डेथ’ असे म्हणतात. 

जीनवक्रम 
एक मादी जवळपास एक-एक अशी ६० अंडी पानाच्या शिरांमध्ये देते. अंड्यांची उबवण ६ ते ८ दिवसांत होऊन अळी बाहेर येते. अळी अवस्था १४ ते १८ दिवसांची असते. अळी मातीमध्ये १० ते १५ दिवसांसाठी कोष अवस्थेत जाते. या किडीचा जिवनक्रम ३० ते ३५ दिवसांत पूर्ण होतो. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये २-३ पिढ्या पूर्ण होतात. 

नुकसानीचा प्रकार 
अळ्या कोवळ्या पानाच्या कडेने खातात. नंतर पानांना छिद्र पाडून त्यातील हरितद्रव्य खातात. 

एकात्मिक व्यवस्थापन 

  • प्रादुर्भावग्रस्त पाने दिसल्यास तोडून टाकावीत. 
  • सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) 

  • डायामिथोएट (३० ईसी) १.३ मि.लि. किंवा 
  • क्विनॉलफॉस (२५ ईसी) २.४ मि.लि. 

संपर्क- डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२००० 
डॉ. बसवराज भेदे,  ७५८८०८२०२८ 
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) 


इतर ताज्या घडामोडी
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...
रब्बीसाठी आवर्तन सुटले, गिरणाचे पाणी...जळगाव : खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व...
किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा...नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक...
तूरडाळ आयातीचे धोरण बदलावे ः खासदार...बुलडाणा : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना...
बाजरीचे पीक जोमात, आंतरमशागतीसह खते...जळगाव : खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला...
सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि...
सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन परभणी : महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक...
उन्हाळी नाचणी अकाली पक्वतेची कारणे सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य...
...आणि आम्ही वाममार्गावरून ढळलोभारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या  गुलामीतून एकाच...