मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्र

शेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. विद्युत ऊर्जेवरील यंत्राच्या वापरामध्ये भारनियमनामुळे अडचणी येतात. अशा दोन्ही स्थितीमध्ये मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्र फायद्याचे ठरते.
Manual improved fodder harvester
Manual improved fodder harvester

शेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. विद्युत ऊर्जेवरील यंत्राच्या वापरामध्ये भारनियमनामुळे अडचणी येतात. अशा दोन्ही स्थितीमध्ये मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्र फायद्याचे ठरते. पशुपालनामध्ये चाऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी चारा कापणीला विशेष महत्त्व आहे. जनावरांना चारा कापून लहान तुकड्यांमध्ये दिल्यास ते आरामात खाऊ शकतात. चारा कापणीसाठी अलीकडे यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राद्वारे आपण प्रामुख्याने मका, कडबा, सरमाड, इ. वाळलेला चारा कापू शकतो. व हिरव्या चाऱ्यांमध्ये मका, कडवळ, गिनी गवत, संकरित नेपियर, ऊस असा चारा कापू शकतो. मात्र शेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. विद्युत ऊर्जेवरील यंत्राच्या वापरामध्ये भारनियमनामुळे अडचणी येतात. अशा दोन्ही स्थितीमध्ये मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्र फायद्याचे ठरते. यंत्राची रचना  एका लाकडी जाड फळीवर हे यंत्र बसवले असून, त्यावर इंग्रजी ‘व्ही’ (V) अक्षराप्रमाणे धारदार पाते लावलेले असते. लाकडी फळीच्या मध्यभागी लावलेल्या या पात्याला आधार देण्यासाठी दोन उभ्या लोखंडी पट्ट्या दोन्ही बाजूंनी वेल्डिंगच्या साह्याने जोडल्या आहेत. या दोन्ही लोखंडी पट्ट्या लाकडी फळीवर नट बोल्टच्या साह्याने बसविल्या जातात. समोरच्या लोखंडी पट्टीवर एक छिद्र असलेल्या लहान लोखंडी पट्टीचा तुकडा वेल्डिंगने जोडलेला आहे. या छिद्रावर चारा दाबणाऱ्या लोखंडी पट्ट्या नट बोल्टच्या साह्याने जोडलेल्या आहेत. त्या लोखंडी पट्ट्याच्या शेवटी लोखंडी पाइपची मूठ वेल्डिंगने जोडलेली आहे. पात्याच्या आधाराच्या मागील लोखंडी पट्टीवर दोन इंची गजाचा तुकडा आडवा वेल्डिंगने जोडलेला आहे. यंत्राची वैशिष्ट्ये 

  • वापरण्यास सोपे.
  • एकाच वेळेस तीन ते चार वाळलेल्या कडब्याच्या पेंढ्या व एक हिरवी पेंडी कापता येते.
  • यात व्यक्तीच्या शक्तीनुसार काही फरक पडू शकतो.
  • कुठलीही देखभाल व खर्च लागत नाही.
  • कमी जनावरे असलेल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे.
  • शेतकरी हे यंत्र कुणाही फॅब्रिकेटरकडून स्वतः तयार करून घेऊ शकतात. साहित्यांच्या गुणवत्तेनुसार साधारण १५०० ते २००० रुपये इतका खर्च येतो.
  • पारंपरिक यंत्र आणि सुधारित चारा कापणी यंत्रामधील फरक  पारंपरिक यंत्र

  • या यंत्रामध्ये वापरले जाणारे पाते हे सामान्यपणे इंग्रजी आडव्या ‘जे’ या अक्षराप्रमाणे असते.
  • यात चारा पूर्णपणे कापला जात नसे.
  • चारा कापण्यासाठी अधिक ताकद लावावी लागते.
  • चारा कापतेवेळी अपघात, खाली आपटून बोटांना इजा होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त.
  • सुधारित यंत्र 

  • इंग्रजी ‘व्ही’ अक्षराप्रमाणे पाते असून, दोन्ही बाजूंच्या आधारामुळे एम अक्षराप्रमाणे दिसते.
  • यामध्ये जास्त पेंढ्या ठेवून कापता येतात.
  • चारा कापण्यासाठी कमी ताकद लागते. एकावेळी दोन किंवा जास्त पेंढ्या ठेवून कापणे शक्य होते. परिणामी, व्यक्तीच्या वेळेत बचत होते.
  • पात्याच्या आधाराच्या मागील बाजूच्या पट्टीवर मूठ ठेवण्यासाठी मांडणी केलेली आहे. चारा कापणाऱ्या व्यक्तीच्या हातांच्या
  • बोटांना कुठलीही इजा होणार नाही, याची काळजी घेतली आहे.
  • - मनोहर पाखरे, ८८८८५९३८८१ (सहायक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी महाविद्यालय, खंडाळा) डॉ. एस. एन. जाधव, ९२२६३७४०९९ (पशू संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, खंडाळा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com