agricultural news in marathi Manual machine for amla processing | Page 2 ||| Agrowon

आवळा प्रक्रियेसाठी हस्तचलीत यंत्र

डॉ. जयश्री रोडगे, सौ. मंजूषा रेवणवार
बुधवार, 14 जुलै 2021

हस्तचलीत यंत्राच्या साहाय्याने मध्यम आकाराच्या आवळ्यातील बिया सहज निघतात.यंत्र स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे स्वच्छ करण्यास सोपे, गंजत नाही.यंत्र हस्तचलीत असल्यामुळे विजेची आवश्यकता नाही.
 

हस्तचलीत यंत्राच्या साहाय्याने मध्यम आकाराच्या आवळ्यातील बिया सहज निघतात.यंत्र स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे स्वच्छ करण्यास सोपे, गंजत नाही.यंत्र हस्तचलीत असल्यामुळे विजेची आवश्यकता नाही.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पामध्ये(गृहविज्ञान) कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागात महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जातो. यामध्ये शेतीच्या बरोबरीने शेतीपूरक व्यवसाय ज्यामध्ये महिलांचा सहभाग अधिक प्रमाणात आहे, याचा अभ्यास केला गेला. यामध्ये पिठाची गिरणी, पापड व शेवया उद्योग, दुग्ध व्यवसाय तसेच आवळा प्रक्रिया उद्योग यांचा समावेश होतो.

आवळा प्रक्रिया उद्योग 
महिला घरगुती स्तरावर आवळा प्रक्रिया उद्योग करताना आवळा कँडी, सरबत, सुपारी, जाम, मुरांबा व लोणचे निर्मिती करतात. आवळा मुरांबा करतेवेळी बिया सकट आवळा वापरला जातो. आवळा कँडी, सरबत, सुपारी, जाम, लोणचे हे पदार्थ तयार करताना आवळ्यातील बिया काढून टाकाव्या लागतात. त्यावेळी आवळ्यातील बिया काढून गर वेगळा करताना महिलांचा बराच वेळ जातो. जेव्हा मोठ्या प्रमाणावर हे काम करायचे असते, त्यासाठी मोठ्या यंत्रणा बाजारात उपलब्ध आहेत. परंतु जेव्हा घरगुती स्तरावर हा व्यवसाय महिला करतात, तेव्हा या कामासाठी विळी किंवा चाकूचा वापर करतात. पारंपरिक पद्धतीने आवळ्यातील बिया वेगळ्या काढण्याच्या कामात महिलांचा बराच वेळ जातो. एक किलो आवळ्यातील बिया आणि गर वेगळा करण्यासाठी एका महिलेचे १८ ते २० मिनिटे खर्च होतात. हे काम जलद गतीने होण्यासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (गृहविज्ञान) आणि पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना यांनी आवळ्यातील बिया काढण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या अभ्यासादरम्यान असे लक्षात आले की, या यंत्राच्या वापरामुळे एक किलो आवळ्यातील बिया काढण्यासाठी फक्त ५ते ६ मिनिटे लागतात. त्यामुळे काम अतिशय जलद गतीने होते.

यंत्राच्या वापराचे फायदे 

 • कामाची गती वाढते
 • यंत्र स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे स्वच्छ करण्यास सोपे, गंजत नाही.
 •  यंत्राचा आकार लहान असल्यामुळे कुठेही ठेऊन काम करता येते.
 •  यंत्राच्या साहाय्याने मध्यम आकाराच्या आवळ्यातील बिया सहज निघतात.
 • पारंपरिक पद्धतीमध्ये आवळा कापल्यानंतर हात काळे पडतात, परंतु यंत्राच्या साहाय्याने
 • काम केले असता हाताला आवळ्याचा जास्त स्पर्श होत नाही, त्यामुळे हात सुरक्षीत राहतात.
 •  हाताला दुखापत होण्याची, हात कापण्याची भीती नाही. आवळे विळीने कापल्यामुळे बियांचा पूर्ण गर निघत नाही, गर वाया जातो.
 • यंत्र वापरल्यामुळे बियांना चिकटलेला जास्तीत जास्त गर निघतो, गर वाया जाण्याचे प्रमाण
 • अत्यल्प आहे.
 • यंत्र हस्तचलीत असल्यामुळे विजेची आवश्यकता नाही, विजेचा धोका नाही.
 • यंत्र वापरल्यामुळे काम जलद होते, कमीत कमी मजूर लागतात. उत्पादन वाढण्यासाठी मदत होते. घरगुती स्तरावर आवळा प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्र आहे.

- डॉ.जयश्री रोडगे, ९५९४००५८४०
(कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन, गृह विज्ञान महाविद्यालय,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी)


इतर टेक्नोवन
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...
अशोक कोळपे ठरतेय शेतकऱ्यांना उपयोगीशेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून...
सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेवर अधिक...
बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली...जेव्हा वनस्पतीच्या मुळाभोवती उपयुक्त बुरशींची...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सूक्ष्मजीवांच्या साह्याने बनवले...अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
नत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे...कोणत्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये वापरल्या...
कॉम्प्रेस्ड बायोगॅस ः सुवर्णसंधी की...पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे देशाचे...
वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!मातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील...