agricultural news in marathi Measures to reduce the effects of cold on crops | Agrowon

थंडीचा पिकावरील परिणाम कमी करणारे उपाय

बी. जी. म्हस्के, हरिष फरकाडे
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021

सध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली नाही. या आठवड्यात शेवटीपर्यंत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये १० अंश सेल्सिअसने घट झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

सध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली नाही. या आठवड्यात शेवटीपर्यंत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये १० अंश सेल्सिअसने घट झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

प्रत्येक वातावरणाचा कमी अधिक परिणाम फळ पिकांवर पडत असतो. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणामही होतो. मात्र शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात ठेऊन तीव्र परिणाम कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असते. वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे उत्पादनातील घट रोखता येते. सध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली नाही. या आठवड्यात शेवटीपर्यंत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये १० अंश सेल्सिअसने घट झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

 • कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते.
 • जमिनीचे तापमान कमी होते.
 • वनस्पतीच्या पेशी मरतात.
 • फळ पिकांमध्ये फळे तडकतात. उदा. प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इ. फळांमध्ये तडकण्याचे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही.
 • रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. उदा. पांढरी माशी, मावा, फुलकिडे, लीफ मायनर इ.
 • थंड हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळे यावर प्रतिकूल परिणाम होतो.
 • अतिथंड हवामानात पेशींमधील पाणी गोठते. पेशी कणातील पाणी नष्ट झाल्याने पेशी शक्तिहीन होतात व मरतात.
 • अतिशीत तापमानामुळे खोड आणि फांद्या याच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो.
 • रोपवाटिकेतील कोवळी फळझाडे यास बळी पडतात.
 •  कोवळी पाने, फुट आणि फांद्या सुकतात. झाडांना इजा पोहोचते.
 •  तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळांपर्यंत पोहोचते. इजा झालेल्या भागातून बुरशींचा शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो. सालीचा इजा झालेला भाग खरवडून बोर्डो पेस्ट लावल्यास फायदा होतो.

फळ पिकानुसार होणारे थेट परिणाम 

 •  आंब्याचा मोहोर जळतो.
 •  सदाहरित झाडे (आंबा, लिंबूवर्गीय फळ पिके, केळी, किवी इ.) ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात.
 •  तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. अति थंडीमध्ये झाडे मरतात.
 •  तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी झाल्यास केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात.
 • द्राक्ष वेलीच्या वाढ आणि फुलोरा अवस्थेत कडक थंडीचा विपरीत परिणाम होतो. फळगळ होते, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांची नासाडी होते. तसेच वेली मरतात.
 • तापमान १० अंश सेल्सिअसने कमी झाल्यास संत्रा, मोसंबीची वाढ थांबते. फलधारणा होत नाही. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.

नियंत्रणाचे उपाय :
• थंडी आणि वाऱ्यापासून फळबागेच्या संरक्षणासाठी बागेच्या पश्‍चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, सुरू, बोगनवेल, घायपात, शेवगा, ग्लिरिसिडीया, पांगरा, मलबेरी, किंवा बांबू यांसारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.
• रब्बी हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटाणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मूग, मटकी इ.
• फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पाला पाचोळा, लाकडे पेटवून उष्णता व धूर रात्रभर मिळेल, याची काळजी घ्यावी.
• थंडीमध्ये विहिरीच्या पाण्याचे तापमान थोडे अधिक असते. थंडीची पूर्वसूचना मिळताच फळ बागेमध्ये रात्री अथवा पहाटे
ठिबकद्वारे पाणीपुरवठा करावा. यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.
• झाडाच्या खोडापाशी तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा अशा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. मुळांच्या परिसरामध्ये उष्णता टिकून राहील. कमी तापमानाचा झाडांच्या मुळांवर व वाढीवर परिणाम होणार नाही.
• केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये मिळण्यासोबत पेंड कुजण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारी उष्णता तापमान कमी करण्यास मदत करते. याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो. केळीच्या बागेस रात्री पाणी द्यावे. १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडाची पाने गुंडाळावी.
• द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
• डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे. तसेच बोरॅक्सची (०.२ टक्का) फवारणी करावी.
• पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून द्यावी. झाडांची जल व अन्नद्रव्य शोषण वहनाची क्षमता वाढते. पेशींचा काटकपणा वाढतो.
• थंडीचे प्रमाण कमी होईतोवर फळबागांतील फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. अतिरिक्त छाटणी करू नये.
• रोपवाटिकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट, तट्टे किंवा काळे पॉलिथिन याचे छप्पर उभारावे. असे छप्पर साधारण सूर्यास्तापूर्वीपासून दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश पडेतोवर ठेवावे.
• नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. पालाशयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा.

- बी. जी. म्हस्के, ९०९६९६१८०१
(सहायक प्राध्यापक, एम. जी. एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद)
हरिष अ. फरकाडे, ८९२८३६३६३८
(सहायक प्राध्यापक - वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.)


इतर कृषी सल्ला
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...
केवायसी : ओळख खातेदाराची...बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’...
घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील...अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला...
कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगाशेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बजमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे....
बटाटा पिकातील मूल्यवर्धन...शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते...
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...