agricultural news in marathi Methods of goat management | Agrowon

शेळी व्यवस्थापनाच्या पद्धती

डॉ. शैलेंद्र कुरळकर,  डॉ. प्राजक्ता कुरळकर
शनिवार, 26 जून 2021

शेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त व्यवस्थापन आणि  मिश्र व्यवस्थापन हे मुख्य तीन प्रकार आहेत. शेळ्यांच्या गोठ्याची लांबी पूर्व- पश्‍चिम ठेवावी. मध्यभागी गोठा उंच ठेवावा. दोन्ही बाजूंस छप्पर उतरते असावे.  जमिनीपासून १ ते १.५ फूट उंचीवर गव्हाण असावी. 
 

शेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त व्यवस्थापन आणि  मिश्र व्यवस्थापन हे मुख्य तीन प्रकार आहेत. शेळ्यांच्या गोठ्याची लांबी पूर्व- पश्‍चिम ठेवावी. मध्यभागी गोठा उंच ठेवावा. दोन्ही बाजूंस छप्पर उतरते असावे. चारा टाकण्यासाठी जमिनीपासून १ ते १.५ फूट उंचीवर गव्हाण असावी. 

महाराष्ट्रातील स्थानिक शेळ्यांच्या जातींची रोगप्रतिकारक शक्ती तसेच उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे. शेळीपालनामध्ये व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. व्यवस्थापनाची पद्धत एकूण शेळ्यांची संख्या व उत्पादनाचा प्रकार यावर अवलंबून आहे. शेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त व्यवस्थापन आणि मिश्र व्यवस्थापन हे मुख्य तीन प्रकार आहेत.

मुक्त व्यवस्थापन 

 • या पद्धतीत चाऱ्यावरील खर्च शून्य असतो. या पद्धतीमध्ये शेळ्या नैसर्गिक पद्धतीच्या चाऱ्यावर किंवा झाडपाल्यावर जोपासल्या जातात. गोठा, चारा, औषधोपचार आणि मजुरांवर सर्वात कमी खर्च होतो. 
 • मुक्त व्यवस्थापन पद्धत मांस उत्पादनासाठी बरी आहे, परंतु शेळीपासून व्यापारी तत्त्वावर उत्पादन मिळू शकत नाही. या व्यवस्थापनात शेळ्यांना संतुलित आहार मिळेलच असे नाही.
 •  शेळ्यांचा कळप सारख्या वयाचा नसतो, त्यामुळे शेळ्यांना चरावयास सोडले असता चारा खाण्यामध्ये स्पर्धा असते. करडे लहान असल्यामुळे त्यांना चारा मुबलक प्रमाणात मिळत नाही. लहान करडे झाडपाला खाऊ शकत नाहीत. त्यामुळे मुक्त व्यवस्थापनात करडांची वाढ चांगली होईलच याची खात्री नसते.
 •  चांगल्या शेळ्या या रोगी शेळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे रोगाचा प्रादुर्भावमुक्त व्यवस्थापनात जास्त पाहायला मिळतो. 
 •  नैसर्गिक आपत्तीपासून जसे ऊन,वारा, पाऊस तसेच हिंस्र श्‍वापदे यापासून संरक्षण मिळत नाही. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवता येत नाही. मुक्त व्यवस्थापनात शेळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी माळरानावर चरावयास घेऊन गेल्यामुळे एका ठिकाणी चारा उपलब्ध होऊ शकत नाही. 

बंदिस्त व्यवस्थापन 

 •  चराऊ व पडीत क्षेत्र कमी झाल्यामुळे शेळ्या मोकळ्या चरावयास सोडणे कठीण आहे. 
 •  बंदिस्त पद्धतीने शेळीपालन जास्त फायद्याचे असते कारण या पद्धतीने शेळ्यांचे वजन लवकर वाढते. शेळ्यांची काळजी घेणे जास्त सोईस्कर होते. रोगनियंत्रण करणे सोपे जाते. 
 • या पद्धतीत शेळ्यांना गोठ्यात बांधून ठेवले जाते. त्या ठिकाणी चारा, पाणी व खुराकाची व्यवस्था केली जाते. 
 • गोठ्याचा आकार शेळ्यांच्या संख्येनुसार असतो. गोठ्याच्या आतील जागा प्रत्येक शेळीस १५ चौ. फूट किंवा १.५ चौ. मीटर लागते. तर गोठ्याच्या बाहेरील भागात २० चौ. फूट किंवा २ चौ. मीटर जागा लागते, बाहेरील जागेभोवती तारेचे कुंपण लावावे. 
 •  गोठ्याची लांबी पूर्व- पश्चिम ठेवावी. मध्यभागी गोठा उंच ठेवावा. दोन्ही बाजूंस छप्पर उतरते असावे. गोठ्याच्या आत चारा टाकण्यासाठी जमिनीपासून १ ते १.५ फूट उंचीवर गव्हाण असावी. पाण्याची व्यवस्था गोठ्याच्या बाहेर हौद किंवा सिमेंटचे अर्धे पाइप ठेवून करावी. बोकडांचा गोठा वेगळा करावा. 
 • आहार हा शरीराच्या गरजेनुसार दिला जातो. ऊन, वारा, पाऊस, थंडी, हिंस्र श्‍वापदे यापासून संरक्षण दिले जाते. त्यामुळे शेळ्यांना आराम मिळतो. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयी वर नियंत्रण ठेवता येते. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून उत्पादनाची कार्यक्षमता वाढविता येते. व्यक्तिगत शेळी, बोकाडावर लक्ष देता येते.
 • मुक्त व्यवस्थापनापेक्षा कितीतरी अधिक पटीने दूध, मांस आणि लेंडीखत उपलब्ध होते.
 • बंदिस्त शेळीपालनासाठी गोठा  बांधण्यासाठी तसेच खाद्यावर जास्तीत जास्त खर्च होतो. त्यामुळे व्यवसायाच्या सुरुवातीला खर्च येतो पण व्यवस्थापन चांगले केल्यास आर्थिक फायदा चांगला होऊ शकतो. 
 •  बंदिस्त शेळीपालनात शेळ्यांच्या लेंड्या एकाच ठिकाणी गोळा होतात. त्यामुळे लेंडीखत भरपूर प्रमाणात मिळू शकते. 

मिश्र व्यवस्थापन 

 •  मिश्र व्यवस्थापनामध्ये शेळ्यांना अर्धा वेळ गोठ्यामध्ये आणि अर्धवेळ शेती, माळरानावर चरावयास नेले जाते. 
 •  जेव्हा शेतकऱ्याला पूर्ण वेळ गोठ्यामध्ये खाद्य देणे परवडत नसेल किंवा मुबलक चारा किंवा खाद्य उपलब्ध नसेल अशा वेळेस शेळ्यांना दिवसातील एक वेळ ४ ते ६ तासांपर्यंत चरायला सोडून बाकीच्या वेळेत गोठ्यामध्ये पूरक चारा व खाद्याची सोय करतात.
 • ज्या ठिकाणी चारा भरपूर उपलब्ध नाही, चरण्यास जंगल कुरण नाही, झाडेझुडपे कमी प्रमाणात आहे. अशा ठिकाणी ही पद्धत उपयोगी ठरते.
 •  शेळ्यांना गोठ्यामध्ये अर्धा वेळ तसेच माळरानावर अर्धवेळ घेऊन गेल्यामुळे बंदिस्त आणि मुक्त अशा दोन्ही व्यवस्थापनाचा फायदा होतो. शेळ्यांना गोठ्यात तसेच माळरानावर चारावयास नेल्यामुळे चाऱ्याची कमतरता भासत नाही.
 • शेळ्यांना संतुलित आहार मिळतो, त्यामुळे वाढ चांगली होते. 

- डॉ. शैलेंद्र कुरळकर,  ९८२२९२३९९७
(पशू आनुवांशिक व प्रजनन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...
खुडूक कोंबडी कशी ओळखावी?अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः...
शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची...वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी...
स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर म्हणजे काय? कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा...
सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल? दुग्धव्यवसायातील सर्वात खर्चिक आजार म्हणजे कासदाह...
जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा करा योग्य...योग्य प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीत...
जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध...