agricultural news in marathi Milk replacer for calf growth | Agrowon

वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसर

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
मंगळवार, 1 जून 2021

मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश असल्यामुळे वासराच्या आतड्याची शोषणक्षमता वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.वासरांना गाई, म्हशींपासून लवकर वेगळे करता येते.
 

मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश असल्यामुळे वासराच्या आतड्याची शोषणक्षमता वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.वासरांना गाई, म्हशींपासून लवकर वेगळे करता येते.

वासरांची वाढ उत्तमप्रकारे व कमी खर्चात होण्यासाठी मिल्क रिप्लेसर एक चांगला पर्याय आहे. जो दुधापेक्षा जास्त पोषक पर्याय होऊ शकतो. वासरांना ३ ते ५ महिन्यांपर्यंत दूध पाजून संगोपन करण्यामुळे पशुपालकास आर्थिक बोजा सहन करावा लागतो. वासरांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष करून आणि प्रत्येक वेळी बाजारातून गाई, म्हशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय किफायतशीर होणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

वासरू जन्मल्यानंतर १५ दिवस ते एक महिनाभरात गवत, शेवरी, कडबा, सोयाबीन भुसकट, धान्ये चघळू लागतात. हळूहळू असा चारा खाण्याचे प्रमाण वाढत जाते. त्या वेळी पशुपालक वासरांचे पोट भरण्यासाठी चारा खाऊ घालतात. दूध गरजेपेक्षा कमी प्रमाणात पाजतात. अशा आहारातून वासरांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषणमूल्याची गरज पूर्ण होत नाही, अशी वासरे अशक्त राहतात, लवकर माजावर येत नाहीत. मोठी झाल्यानंतर कमी उत्पादनक्षम बनतात. म्हणून वासरांचे कमी खर्चात कमी दूध पाजून चांगल्याप्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांच्या आहारात मिल्क ‍रिप्लेसरचा वापर करावा.

मिल्क रिप्लेसरचा वापर 
मिल्क रिप्लेसर म्हणजे अन्नघटकांचे कोरड्या व पावडर स्वरूपातील मिश्रण असते. वासराला देण्याआधी ते पाण्याबरोबर मिसळले जाते. नंतरच वासरांना खाण्यासाठी दिले जाते. हे मिल्क रिप्लेसर पौष्टिक असते. वासरांच्या पचनसंस्थेची भौतिक, शारीरिक वाढ उत्तमरीत्या होईल अशा पद्धतीने व पोषणतत्त्वयुक्त घटकापासून बनवलेले असते.मिल्क रिप्लेसर हे स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर, जीवनसत्त्व, क्षारतत्त्व, ॲन्टिऑक्सिडंट्‌स, उच्च प्रतीची प्रथिने यापासून बनवलेले असते. यामध्ये चव वाढवणाऱ्या घटकांचा समावेश असतो.

फायदे 

 • मरतुकीचे प्रमाण कमी होते. झपाट्याने वाढ होते.
 • रोगप्रतिकारकशक्ती वाढून आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
 • कमी खर्चात जातिवंत वासरांपासून पुढील काळात जास्त उत्पादन देणारी गाय / म्हैस आपण खात्रीने तयार करू शकतो.
 • मिल्क रिप्लेसरचा वासरांच्या आहारात उपयोग केल्यामुळे वासरांसाठी जाणाऱ्या दुधामध्ये बचत होऊन सदर दूध विक्रीसाठी उपलब्ध होते.
 • मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश असल्यामुळे वासरांच्या आतड्याची शोषणक्षमता वाढते, त्यामुळे आहारातील जास्तीत जास्त पोषणतत्त्वे शरीरात शोषून त्यांचा वासरांच्या वाढीसाठी उपयोग होतो. त्याचबरोबर पचनसंस्थेतील आजार निर्माण करणाऱ्या जिवाणूंची संख्या कमी होण्यास होते.
 • गाई, म्हशींच्या दुधातील घटकांचे प्रमाण हे दूध देणाच्या काळानुसार बदलत असते. परंतु मिल्क रिप्लेसरमधील पोषणतत्त्वाचे प्रमाण हे एकसारखे असते. त्यामुळे उत्तमवाढीसाठी मिल्क रिप्लेसर पोषक ठरते.
 • मिल्क रिप्लेसरचा वासरांच्या आहारात वापर केल्यामुळे इन्फेक्शियस हिनोट्राकायटिस, टीबी व इतर काही आजाराचा प्रसार टाळला जातो.
 • गाईच्या दुधातील प्रथिने ही ७०-७५ टक्के केसीन आणि २५ -३० टक्के अल्बूमीनयुक्त असतात. केसीन ज्या वेळी ॲबोमॅझममध्ये जाते. त्या वेळी तेथील विकरांमुळे ॲबोमॅझममध्ये चीजसारखा घट्ट थर जमा होतो. त्याचे पचन होण्यास ६ तासांपर्यंत कालावधी लागतो. त्यामुळे वासरांना लवकर भूक लागत नाही. याउलट मिल्क रिप्लेसरमधील प्रथिने ही ७०-७५ टक्के अल्बुमिन व २५-३० टक्के केसीनयुक्त असतात. त्याचे ॲबोमॅझमध्ये पचन एक ते दीड तासांमध्ये होऊन वासरांना लवकर भूक लागते. या काळात वासरे गवत, खुराक खाऊ शकतात. यामुळे कोठीपोटाची तसेच वासरांची जलद वजन वाढ होण्यास मदत होते.
 • वासरे लवकर खुराक खाऊ व पचवू शकतात.
 • वासरांना गाई, म्हशींपासून लवकर वेगळे करता येते.

मिल्क रिप्लेसरचा वासरांच्या आहारात वापर करताना 

 • एक लिटर तयार केलेल्या मिल्क रिप्लेसरच्या पेस्टमधील शुष्क पदार्थाचे प्रमाण १२५ ग्रॅम इतके राहील याची काळजी घ्यावी. याकरिता मिल्क रिप्लेसर पावडर व पाणी हे १:८ या प्रमाणात मिसळून घ्यावे. हे प्रमाण वासरांचे वय ७ ते ८ दिवस ते वयाच्या २० ते २१ व्या दिवसापर्यंत ठेवावे. त्यानंतर मिल्क रिप्लेसर पावडर व पाणी यांचे प्रमाण १ : ९ असे ठेवावे. यामुळे द्रवाचा चिकटपणा टिकून राहतो. असा आहार अन्ननलिकेतून प्रत्यक्ष अबोमॅझममध्ये जाण्यास मदत होते.
 • तयार केलेल्या द्रवाचे / पेस्टचे तापमान वासरांच्या शरीर तापमानाबरोबर (३८- ३९ अंश से.) राहील याची काळजी घ्यावी. जर या द्रवाचे तापमान शरीर तापमानापेक्षा कमी असेल तर वासरांच्या पोटात गेल्यानंतर या द्रवाचे/पेस्टचे तापमान शरीर तापमानाबरोबर आणण्यासाठी शरीरातील ऊर्जा काही अंशी खर्च केली जाते. त्यानंतर त्याचे पचन होण्यास सुरुवात होते.
 • वासराचे वय दोन ते तीन आठवडे होईपर्यंत वासराचे वजन लक्षात घेणे गरजेचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराचे वजन हे वेगवेगळे असू शकते. त्याचबरोबर या वासरातील ॲबोमॅझमची क्षमता ही वेगवेगळी असते. म्हणून सर्वसाधारणपणे एकावेळी वासरांच्या वजनाच्या ४.५ ते ५ टक्के तयार केलेले द्रव/ पेस्ट वासरास खाण्यास द्यावे.
 • मिल्क रिप्लेसरमध्ये सर्वसाधारपणे २० ते २८ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. मिल्क रिप्लेसरमध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे १८ ते २२ टक्के इतके असते.
 • मिल्क रिप्लेसर हे वासराला दूध पाजवण्याच्या संख्येपेक्षा कमी वेळा खाण्यास द्यावे. वासरांच्या आहारात दिवसभरात जास्त वेळा मिल्क रिप्लेसरचा वापर केल्यास ॲबोमॅझम निर्मित पोटफुगी आणि हगवण दिसून येते.
 • मिल्क रिप्लेसर सर्वसाधारणपणे दिवसातून दोन वेळा वासरांना द्यावे.

संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)


इतर कृषिपूरक
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...