agricultural news in marathi Mobile app for crop information | Agrowon

पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲप

डॉ. अरुण भगत, माधव घोळकर
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

कोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली माहिती, सामग्री आणि ॲप तयार करण्याचा उद्देश यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना पिकांचे नवीन वाण, हवामानातील छोट्या मोठ्या बदलाची स्थिती, पीक उत्पादनाचे तंत्र आणि त्यांच्या उत्पादनासाठी सुधारित कृषिविषयक पद्धतींची माहिती हवी असते. मोबाइल ॲप हे कोणत्याही हवामान क्षेत्रातील शेतकऱ्यांना अशी माहिती मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. 

कोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली माहिती, सामग्री आणि ॲप तयार करण्याचा उद्देश यावर अवलंबून असते. बरेच ॲप केवळ विशिष्ट माहितीसाठी उपयुक्त आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे नवीन वाण, हवामानातील छोट्या मोठ्या बदलाची स्थिती, पीक उत्पादनाचे तंत्र आणि त्यांच्या उत्पादनासाठी सुधारित कृषिविषयक पद्धतींची माहिती हवी असते. मोबाइल ॲप हे कोणत्याही हवामान क्षेत्रातील शेतकऱ्यांना अशी माहिती मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. 

कृषी तंत्रज्ञानाची माहिती ग्रामीण पातळीवर मुख्यतः कृषी सेवक, कृषी विस्तार अधिकारी, वैज्ञानिक, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठांमार्फत पुरविली जाते. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेतकरीदेखील मोबाईलचा वापर करून स्मार्ट होत चालले आहेत. मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन माहिती शेतकऱ्याला बांधावर बसून सहज उपलब्ध होत आहे. 

वादळी वारे, पाऊस, गारपीट यांसारख्या हवामानातील तीव्र घटनांमुळे शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी, अपेक्षित उत्पादन मिळत नाही. हवामानविषयीच्या धोक्यांबाबत शेतकऱ्यांना आधी माहिती असेल, तर त्यादृष्टीने तयारी करू शकतात आणि नुकसान टाळता येईल. यासाठी मोबाईल ॲप महत्त्वाची भूमिका बजावतात.  

कोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली माहिती, सामग्री आणि ॲप तयार करण्याचा उद्देश यावर अवलंबून असते. बरेच ॲप केवळ विशिष्ट माहितीसाठी उपयुक्त आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे नवीन वाण, हवामानातील छोट्या मोठ्या बदलाची स्थिती, पीक उत्पादनाचे तंत्र आणि त्यांच्या उत्पादनासाठी सुधारित कृषिविषयक पद्धतींची माहिती हवी असते. मोबाइल ॲप हे कोणत्याही हवामान क्षेत्रातील शेतकऱ्यांना अशी माहिती मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. 

वॉटरशेड ऑर्गनायझेशनचे ‘फार्मप्रीसाइज’  

 •   मोबाईलमधील प्ले-स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करावे लागते.
 •   हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू या भाषांत उपलब्ध आहे.
 •   हे ॲप पूर्णतः मोफत आहे. तसेच यातील सर्व सेवा या विनामूल्य आहेत. 
 •   या मोबाईल ॲपमध्ये सोपा इंटरफेस असून, तो शेतकऱ्यांना थेट तज्ज्ञांशी जोडतो आणि या तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. 

सुविधा 

 •   शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान.
 •   हवामानविषयक रिअल-टाइम डेटा.
 •   पुढील ५ दिवसांच्या हवामानाचा अंदाज.
 •   भविष्यातील वादळी वाऱ्यांविषयी चेतावणी.
 •   पिकांसाठी खत वापरासंबंधी माहिती आणि व्यवस्थापन.
 •   पिकाच्या वाढीनुसार पाण्याची गरज ओळखून सिंचन सल्ला पुरविते.
 •   एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन.
 •   जवळपासच्या बाजारपेठेतील बाजारभाव.

- डॉ. अरुण भगत,  ७३८७१२६८९१
(वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे)


इतर टेक्नोवन
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...
काढणीपश्‍चात कामासाठी सुधारित यंत्रेमानवचलित सुपारी सोलणी यंत्र पारंपरिक पद्धतीने...
सुधारित तंत्राद्वारे वाढवली उसाची...सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित...
कपाशी अवशेषातील बोंड अळीचा नाश करणारी...कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड...
सुगंधी तेलनिर्मितीतून शेतकऱ्यांना...जिरॅनॉलचे प्रमाण अधिक असल्यामुले पाल्मरोसा (शा....