agricultural news in marathi, nessesity of seed treatment, Agrowon, Maharashtra | Agrowon

बीज प्रक्रियेद्वारे कीड, रोगांचे नियंत्रण
डॉ. अनिल ठाकरे, धीरज वसुले, मंगेश दांडगे, डॉ. प्रवीण पाटील
शुक्रवार, 1 जून 2018

पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोग, रसशोषक किडी, खोडमाशी यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते.

पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या रोग, किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीज प्रक्रिया उपयुक्त ठरते. त्यासाठी पेरणीपूर्व बीज प्रक्रियेसाठी वापरावयाची रासायनिक, जैविक बुरशीनाशके आणि कीटकनाशके यांची माहिती घेऊ.

पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोग, रसशोषक किडी, खोडमाशी यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते.

पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या रोग, किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीज प्रक्रिया उपयुक्त ठरते. त्यासाठी पेरणीपूर्व बीज प्रक्रियेसाठी वापरावयाची रासायनिक, जैविक बुरशीनाशके आणि कीटकनाशके यांची माहिती घेऊ.

 • पिकावरील मर, मूळकूज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उद्भवणाऱ्या रोगांचे (उदा. फ्युजारीयम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशीयम, पिथीयम) नियंत्रण रासायनिक बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेमुळे होते.
 • रसशोषक किडी, खोडमाशी व अन्य किडींपासून आपले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी रासायनिक किंवा जैविक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया उपयुक्त ठरते. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून नंतर ताबडतोब पेरणी करावी. सर्व बियाण्यांवर रसायनाचा सारखा थर होईल, हे पाहावे.
रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया व बुरशीनाशकाचे प्रमाण - - -
पिके      रोग   रासायनिक बुरशीनाशक   मात्रा प्रतिकिलो बियाणे
कपाशी
         
   
अणुजीवी करपा व मूळकूज  कार्बोक्सिन (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के डीएस) (मिश्र घटक)  ३.५ ग्रॅम
कपाशी  अणुजीवी करपा   कार्बोक्सिन (७५टक्के डब्लू पी)     २-२.५ ग्रॅम
तूर    मर, मूळकूज व खोडकूज   कार्बोक्सिन (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के डीएस)       ४ ग्रॅम
सोयाबीन         कॉलर रॉट, मूळ आणि खोडसड, मर कार्बोक्सिन (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के डीएस)    ३ ग्रॅम
मका          रोपावरील करपा  थायरम (७५ डब्ल्यु. एस.)  ३ ग्रॅम
भुईमूग
 
   
      
     
   
 
कॉलर रॉट, मूळ आणि खोडकूज  कार्बोक्सिन (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के डीएस)        ३ ग्रॅम
भुईमूग कॉलर रॉट व पानावरील ठिपके   मॅंकोझेब (७५ टक्के डब्ल्यु पी)   २.५ - ३ ग्रॅम
भुईमूग कॉलर रॉट, मूळ आणि खोडकूज  टेब्युकोनॅझोल (२ टक्के डी एस)     १.२५ ग्रॅम
भुईमूग  कॉलर रॉट, कोरडी मूळकूज आणि पानावरील टिक्का रोग   कार्बेन्डाझिम (२५ टक्के) + मँकोझेब (५०टक्के डब्ल्यु एस)     ३.५ ग्रॅम
तीळ   मूळ, खोड सड व मर   कार्बोक्सिन (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के डीएस)        ३ ग्रॅम
ज्वारी
 
       
   
    
       
दाण्यावरील बुरशी व करपा  थायरम (७५ डब्ल्यु एस)    ३ ग्रॅम
ज्वारी केवडा

मेटालॅक्झिल एम (३१.८ टक्के ईएस)  

मेटालॅक्झिल एम (३५ टक्के डब्ल्यु एस)   

२ मिलि

 

 

६ ग्रॅम

भात
       
     
बियाण्यामधून
होणारे रोग 
थायरम (७५ डब्ल्यु एस)   ३ ग्रॅम
भात  करपा   कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्लू पी)   २ ग्रॅम
सूर्यफूल        केवडा  मेटालॅक्सिल एम (३१.८% ईएस)   २ मिली
बाजरी          केवडा/गोसावी मेटालॅक्सिल एम (३१.८% ईएस)   २ मिलि

 

कीड नियंत्रणासाठी कीटकनाशके व त्यांचे प्रमाण - - -
पिके     कीड   कीटकनाशकाची रासायनिक बीज प्रक्रिया     मात्रा प्रतिकिलो बियाणे
कपाशी
    
     
       
रसशोषक किडी

इमिडाक्लोप्रिड (४८ एफ एस) 

 

थायामिथोक्झाम (३० एफ एस)   

९ मि.लि.

 

१० मि.लि. 

सोयाबीन      खोडमाशी व रस शोषक किडी   थायामिथोक्झाम (३० एफ एस)   १० मि.लि.
मका   खोडमाशी   थायामिथोक्झाम (३० एफ एस)       ८ मि.लि.
ज्वारी
 
 
 
    
      
       
    खोडमाशी

थायामिथोक्झाम (७० डब्ल्यु एस)   

 इमिडाक्लोप्रिड (४८ एफ एस)  

 

थायामिथोक्झाम (३० एफ एस)   

१० ग्रॅम

 

 १२ मि.लि.

 

   १० मि.लि.

बाजरी
   
    
       
 वाळवी व खोडमाशी

इमिडाक्लोप्रिड (७० डब्लू एस)  

 

 

इमिडाक्लोप्रिड (४८ एफ एस)    

१० ग्रॅम

 

 

१२ मि.लि.

ऊस    वाळवी   इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यु एस)     १०-१५ ग्रॅम

जैविक बीजप्रक्रिया
रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाचा वापर पिकावरील रोग नियंत्रणासाठी होत आहे. पिकावरील मर, मूळकूज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उद्भवणाऱ्या रोगाचे (उदा. फ्युजॅरीयम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशीयम, पिथीयम) नियंत्रण ट्रायकोडर्मा बीज प्रक्रियेमुळे होऊ शकते.

बीज प्रक्रियेकरिता ट्रायकोडर्माची लागणारी मात्रा - - -
पिके     रोग   जैविक बीज प्रक्रिया     मात्रा प्रतिकिलो बियाणे
तूर     मर, मूळकूज व खोडकूज  ट्रायकोडर्मा व्हिरीडी (१ टक्के डब्ल्यु पी)     ८ ग्रॅम
मूग        मूळकूज   ट्रायकोडर्मा व्हिरीडी  १टक्के  (डब्ल्यु पी) ४ ग्रॅम
उडीद मूळकूज   उडीद     ट्रायकोडर्मा व्हिरीडी  (१टक्के  डब्ल्यु पी)     ४ ग्रॅम
चवळी      मूळकूज   ट्रायकोडर्मा व्हिरीडी  (१टक्के  डब्ल्यु पी)   ४ ग्रॅम
मका      मर व मूळकूज   ट्रायकोडर्मा हरजानियम(२टक्के डब्ल्यु पी)     २० ग्रॅम
भुईमूग            खोडकूज ट्रायकोडर्मा व्हिरीडी  (१टक्के  डब्ल्यु पी) ४ ग्रॅम
सूर्यफूल       बियाण्याची कूज व मूळकूज   ट्रायकोडर्मा व्हिरीडी  (१टक्के  डब्ल्यु पी)   ६ ग्रॅम
टोमॅटो   रोपट्याची मर   ट्रायकोडर्मा व्हिरीडी  (१टक्के डब्ल्यु पी)       ९ ग्रॅम
मिरची          रोपट्याची मर  ट्रायकोडर्मा व्हिरीडी  (१टक्के  डब्ल्यु पी)  ४ ग्रॅम
फुलकोबी       देठाची कूज   ट्रायकोडर्मा व्हिरीडी (१टक्के  डब्ल्यु पी)   ४ ग्रॅम
वांगे       मर, मूळकूज व रोपट्याची मर   ट्रायकोडर्मा व्हिरीडी (१टक्के  डब्ल्यु पी)   ५ ग्रॅम

ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे

 • नैसर्गिक घटक असून, या बुरशीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम नाही.
 • बीजप्रक्रियेने उगवणशक्ती वाढून अंकुरण चांगले होते.
 • रोगकारक बुरशीचा संहार करते.
 • पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
 • प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी.

ट्रायकोडर्मा बुरशीचा प्रभावी वापरासाठी आवश्यक बाबी  

 • जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असावेत.
 • ट्रायकोडर्मा चे पाकीट/द्रावण थंड जागेत सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
 • रासायनिक बुरशीनाशक लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्माची मात्रा दुप्पट करावी.
 • ट्रायकोडर्मा सोबत रायझोबीअम/अॅझोटोबॅक्टर/अॅझोस्पिरीलम तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणू या जैविक खतांची बीज प्रक्रिया करता येते.

संपर्क : डॉ. अनिल ठाकरे,९४२०४०९९६०
(प्रमुख, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, अमरावती.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...