agricultural news in marathi New introduction from the flour making industry | Agrowon

पीठनिर्मिती उद्योगातून नवी ओळख

राजकुमार चौगुले
रविवार, 28 मार्च 2021

बाजारपेठेची मागणी आणि ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात आला, की व्यवसायाला गती मिळते. हे लक्षात घेत कोल्हापूर शहरातील संगीता नितीन सावर्डेकर यांनी गेल्या आठ वर्षांपासून पीठनिर्मिती व्यवसायात वेगळी ओळख तयार केली. याचबरोबरीने सणसमारंभामध्ये फुलांचे डेकोरेशन या छंदालाही त्यांनी व्यावसायिक रूप दिले आहे.
 

बाजारपेठेची मागणी आणि ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात आला, की व्यवसायाला गती मिळते. हे लक्षात घेत कोल्हापूर शहरातील संगीता नितीन सावर्डेकर यांनी गेल्या आठ वर्षांपासून पीठनिर्मिती व्यवसायात वेगळी ओळख तयार केली. याचबरोबरीने सणसमारंभामध्ये फुलांचे डेकोरेशन या छंदालाही त्यांनी व्यावसायिक रूप दिले आहे.

कोल्हापूर शहरातील सम्राटनगर परिसरातील संगीता नितीन सावर्डेकर यांनी नोकरीच्या मागे न लागता बाजारपेठेची मागणी लक्षात घेत तयार पिठाची निर्मिती आणि विक्री करून उत्पन्नाचा नवा आर्थिक स्रोत तयार केला. गेल्या आठ वर्षांपासून त्या भजी, भाजणी, चकली पीठनिर्मिती आणि विक्री व्यवसायात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो ग्राहक त्यांनी जोडले आहेत. 

पिठाची रुजविली चव 
भजीचे पीठ म्हटले, की साधारणपणे हरभरा डाळीचे पीठ समोर येते. पण भज्यांची चव आणि दर्जा सुधारण्यासाठी डाळीचे दळण, त्यातील घटकांचे योग्य प्रमाण अतिशय महत्त्वाचे आहे. हेच कसब संगीताताईंनी साधले. पिठाचा दर्जा चांगला राहण्यासाठी त्यांचा काटेकोर प्रयत्न असतो. आठवड्यातून तीस किलो हरभऱ्याचे पीठ तयार केले जाते. दर्जेदार डाळ खरेदीकरून एक दिवस उन्हात वाळवण केली जाते. पिठात दुसरे कुठल्याही धान्याचे मिश्रण केले जात नाही. डाळ वाळविल्यानंतर घरी असलेल्या पीठ चक्कीवर डाळ दळली जाते. पीठ दळत असताना ते भजी करण्यासाठी योग्य राहील याची दक्षता घेतली जाते. पिठामध्ये धने पूड, ओवा, सोडा, तिखट, मीठ आदी पूरक घटक योग्य प्रमाणात मिसळले जातात. या घटकांचे प्रति किलोचे प्रमाण ठरलेले आहे. त्यानंतर पिठाचे पॅकिंग केले जाते. ऑर्डर असेल तर तातडीने पीठ दिले जाते. किरकोळ विक्रीसाठी पीठ पॅकिंग करून ते सुरक्षित ठेवले जाते. पॅकिंगमध्ये सुमारे सहा महिने पीठ टिकू शकते.

सण, समारंभासाठी पीठ मागणीत वाढ 
भजी पिठाची मागणी वर्षभर असली तरी श्रावण व सणासुदीच्या काळात मागणीत दुपटीने वाढ होते. नवरात्र, दसरा दिवाळीच्या काळात महिन्याला ऐंशी किलो पिठाची विक्री होते. इतर महिन्यांमध्ये ४० किलो पीठ विकले जाते. पावसाळ्यातील दोन महिन्यांमध्ये पिठाची चांगली विक्री होते. कोल्हापूर शहरातील बझार, संस्था या शिवाय केटरिंग व्यावसायिक देखील भजी, भाजणी पिठाला प्राधान्य देतात. तयार पीठ मिळत असल्याने केटरिंग व्यावसायिकांकडून आगाऊ मागणी असते. त्यांना पॅकिंग पीठ न देता पाच, दहा किलो प्रमाणात दिले जाते. लग्नसराईच्या काळात या व्यावसायिकांकडून पिठाला मागणी वाढते. अनेक ग्राहक घरी येऊन पीठ घेऊन जातात. जादा प्रमाणात मागणी असेल त्या स्वत: संबंधितांना घरपोच पीठ देतात.

सोशल मीडियातून ग्राहकांशी संपर्क 
संगीताताईंचे शिक्षण एम.कॉम. जी.डी.सी.ए. झाले आहे. उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरी न करता पीठनिर्मिती व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी नोकरी केली. पण यामध्ये जाणारा वेळ, घराकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे त्यांनी नोकरी सोडून पीठनिर्मिती व्यवसायाला सुरुवात केली. घरचे किराणा दुकान असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना व्यावसायिक अनुभव होता. यातूनच त्यांना पीठ विक्रीचा व्यवसाय सुचला. सुरुवातीला त्यांनी पाहुण्यांना पीठ देऊन चवीबाबत खात्री करून घेतली. पाहुण्यांकडून समाधानाची पावती मिळाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक तत्त्वावर याचे उत्पादन सुरू केले. 

सुरुवातीला भजी पिठात नावीन्य काय? याला कोठे मार्केट? असे म्हणून अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. पण जशी मागणी वाढू लागली, तसा लोकांचा विरोध कमी झाला. त्याची जागा कौतुकाने घेतली. शक्‍यतो तयार भजीचे पीठ ही कल्पना अद्याप कुठे फारशी रुजलेली नाही. पण संगीताताईंनी त्याच्या चवीत नावीन्य आणत पिठाची विक्री सुरू केली. आता वर्षभरात ग्राहकांच्या मागणीचा अंदाज आल्याने कितीही प्रमाणात पीठ हवे असले तरी एक- दोन दिवसांत त्या तयार करून देतात, इतकी सहजता या व्यवसायात आली आहे. दिवाळीच्या कालावधीत चकली भाजणीलाही मोठी मागणी असते. येत्या काळात इनस्टंट ढोकळा, डोसा पिठाच्या विक्रीचेही त्यांनी नियोजन केले आहे.  

ग्रामीण भागातूनही चांगला प्रतिसाद 
धान्याचे तयार पीठ तसेच ‘रेडी टू इट’ पदार्थांना विशेष करून मागणी असते. वेळ वाचत असल्याने शहरी ग्राहक अशा पदार्थांची मागणी नोंदवत असतो. पण अलीकडच्या काळात शहराप्रमाणेच ग्रामीण भागातून जास्त मागणाी येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

परदेशातही पिठाला मागणी  
संगीताताईंच्या तयार भजी, भाजणी पिठाची ख्याती परदेशातही पोहोचली आहे. कोल्हापुरातील अनेक कुटुंबाचे नातेवाईक परदेशात जातात. त्या वेळी ते आवर्जून तयार पीठ मोठ्या प्रमाणात घेऊन जातात. परदेशात राहूनही खुसखुशीत व चवदार भज्यांचा आस्वाद त्यांचे ग्राहक घेत असतात. ही मोठी समाधानाची बाब असल्याचे त्या सांगतात.

पीठ विक्रीसाठी ब्रॅण्ड 
पीठनिर्मिती आणि विक्रीमध्ये वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांनी उत्पादनाचा ‘शाकंभरी‘ ब्रॅण्ड तयार केला. त्याची शासनाकडे नोंदणीदेखील केली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन भजी पिठाचे पाव किलो पॅकिंग केले जाते. घाऊक विक्री १६० ते १७० रुपये किलो आणि किरकोळ विक्री २०० रुपये किलो या दराने केली जाते. संगीताताई या गार्डन क्‍लबच्या सदस्य आहेत. या संस्थेचे सुमारे तीन हजार सभासद आहेत. पिठाच्या विक्रीसाठी या क्‍लबचा चांगला उपयोग त्यांना होतो. गार्डन क्‍लबचे वर्षभर कार्यक्रम सुरू असतात. या माध्यमातून भजी, चकली, भाजणी पिठाचे ब्रॅडिंग केले जाते. गेल्या आठ वर्षांपासून या क्षेत्रात असल्याने आता ग्राहकांकडूनच उत्पादनांची जाहिरात होते. याशिवाय सोशल मीडिया, त्यावरील विविध ग्रुपमधून संवाद साधला जातो. यातून परगावातील ग्राहक मिळविण्यास मदत झाली. या सर्व माध्यमांतून वर्षभर पिठाची विक्री सुरू असते. या पीठ विक्रीतून खर्च वजा जाता तीस टक्के नफा मिळतो.

फ्लोरल डेकोरेशनचा व्यवसाय 
पीठनिर्मिती आणि विक्रीच्या बरोबरीने संगीताताई गेल्या सात वर्षांपासून फ्लोरल ज्वेलरीदेखील तयार करतात. यामध्ये गुलाब, शेवंती, जरबेरा, ऑर्किड, तगरीची ताजी फुले तसेच कृत्रिम फुलांचाही वापर केला जातो. कृत्रिम फुलांच्या गजऱ्याची ४०० डिझाइन्स त्यांच्याकडे आहेत. याचबरोबरीने दिवाळी, गणपती सणासाठी तोरणनिर्मिती करतात. या तोरणांना परदेशी भारतीय नागरिकांकडून चांगली मागणी आहे.

- संगीता सावर्डेकर  ९४२०३६९१९६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...