अमेरिकेत राबविला जातोय महत्त्वाकांक्षी ‘अर्थ बायोजिनोम’ प्रकल्प

राबविला जातोय महत्त्वाकांक्षी ‘अर्थ बायोजिनोम’ प्रकल्प
राबविला जातोय महत्त्वाकांक्षी ‘अर्थ बायोजिनोम’ प्रकल्प

कृषी क्षेत्रातील मूलभूत बदलांसाठी आवश्यक ते बदल करण्यासाठी जनुकशास्त्र महत्त्वाचे आहे. त्यामध्ये संशोधन आणि विकासासाठी अमेरिकी कृषी विभाग अर्थ बायोजिनोम प्रोजेक्ट अंतर्गत भागीदारीमध्ये करत आहे. पुढील दहा वर्षांसाठी राबविल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सहकारी प्रकल्पामध्ये १.५ दशलक्ष प्रजातींच्या डीएनएचा अभ्यास करण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि जिवाणूपेक्षा अधिक गुंतागुंतीची रचना असणाऱ्या सजीवांचा त्यात समावेश असेल. या प्रकल्पाबाबत ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील कीटकशास्त्रज्ञ केविन हॅकेट यांनी सांगितले, की पृथ्वीवरील जैवविविधतेबाबत जाणून घेण्यासह अधिक माहिती मिळविण्याचा या प्रकल्पाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे. शेती क्षेत्रासाठी जैवविविधता अत्यंत महत्त्वाची असून, त्याचे अनेक फायदे आहे. केवळ शेती आणि एकल पिकांच्या वाढीतून जैवविविधतेचे स्मारकच राहण्याची शक्यता जागतिक पातळीवरील तज्ज्ञ व्यक्त करतात. अशा स्थितीमध्ये हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकेल. या प्रकल्पामध्ये कार्यरत २३ सदस्यांतील पहिल्या तीन सदस्यांमध्ये आणि कृषिक्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून हॅकेट कार्यरत आहेत. त्यांनी प्रकल्पाचे शेतीसाठीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, की पिकामध्ये किडीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे एक पंचमांश उत्पादन नष्ट होते. कीडनाशकांचा वापर आणि त्याविषयी कीटकांनी प्रतिकारकता विकसित करणे ही सातत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी सातत्याने नव्या मार्गांचा शोध घेत राहणे आवश्यक ठरते. अशा वेळी किडींचे डीएन आणि जीवशास्त्राची नेमकी माहिती असल्यास नियंत्रणाच्या चांगल्या पद्धतींचा वापर शक्य होईल. अन्य कीटकांना हानी न पोचवता, पर्यावरणाचा ऱ्हास न करता नियंत्रण पद्धतीचा शोध घेता येईल.

असा आहे प्रकल्प :

  • पहिल्या तीन वर्षांमध्ये वनस्पती, प्राणी आणि एकपेशीय सजीवांच्या कुळातील प्रत्येक एक प्रजातींचा अभ्यास करण्याचे नियोजन आहे. त्यात सुमारे ९३३० प्रजातींवर संशोधन करण्यासाठी जगभरातील संशोधकांची मदत घेतली जात आहे.
  • त्यानंतर त्या पुढील तीन वर्षांमध्ये प्रत्येक गणातील एक प्रजाती अभ्यासासाठी घेण्यात येईल. त्यात एकूण दीड लाख गणांचा समावेश आहे.
  • उर्वरित १.५ दशलक्ष प्रजातींच्या अभ्यासावर शेवटच्या चार वर्षांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
  • जनुकीय संशोधनाचे अनेक प्रयत्न सुरू : एआरएसचे कीटक शरीरशास्त्रज्ञ फेलिक्स ग्युर्रेरो आणि सहकाऱ्यांनी नुकतेच गाईमध्ये तापासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोचिडांच्या जनुकांचे विश्लेषण केले आहे. त्यातील नेमक्या जनुकांचा शोध घेऊन, गोचिडांच्या विरोधामध्ये लस  विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या लसीमुळे गोचिडापासून पसरणाऱ्या विविध रोगांपासून गाईंचा बचाव करणे शक्य होईल. तसेच माणसांमध्ये लाइम रोगांचा प्रसार करणाऱ्या अन्य गोचिडांशी लढणे शक्य होईल. अन्य एका एआरएस प्रकल्पामध्ये मक्यामध्ये येणाऱ्या १० किडींचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण करण्याचे नियोजन आहे. अपेक्षित खर्च : पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५०० दशलक्ष डॉलर इतका खर्च येणार आहे. एकूण १० वर्षांचा खर्च अंदाजे ४.५ अब्ज डॉलर अपेक्षित आहे. २००१ मध्ये प्रति जिनोम १० हजार डॉलर इतका खर्च होत असे, तर आता तो फक्त एक हजार डॉलरवर आला आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com