उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत यशस्वी घौडदौड

वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व राणी या चांडे- पाटील या उच्चशिक्षित दांपत्याने शून्यातून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला.या दापंत्यानेबाराहजार पक्षांची बॅच, फीडमील व वार्षिक पावणेदोन कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे.
Poultry farm with a capacity of ten thousand birds
Poultry farm with a capacity of ten thousand birds

वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व राणी या चांडे- पाटील या उच्चशिक्षित दांपत्याने शून्यातून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. अभ्यास, व्यावसायिक दृष्टिकोन, बाजारपेठा मिळवण्याचे तंत्र, आर्थिक नियोजन व परिश्रमांची तयारी हे गुण बाळगले. त्या जोरावर बाराहजार पक्षांची बॅच, फीडमील व वार्षिक पावणेदोन कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे. वाशीम जिल्हयात मुठ्ठा (ता. मालेगाव) या छोट्या गावात नीलेश व राणी हे चांडे पाटील हे युवा दांपत्य शेती व पोल्ट्री अशी दुहेरी जबाबदारी यशस्वी सांभाळत आहे. नीलेश बीएस्सी बीएड तर राणी बीएडीएड पदवीप्राप्त आहेत. नीलेश यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. ‘पीएसआय’ होण्याचे स्वप्न होते. सलग तीन वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. त्यात यश आले नाही. पण हार न मानता शेतीतच काहीतरी करून दाखवावे असे त्यांनी ठरवले. आईने दोन म्हशींचे संगोपन व दुग्ध व्यवसायातून कुटुंब उभे केले. मुलांना शिक्षण दिले. वडील दामोदर यांचेही परिश्रम मोठे होते. त्यांचाच आदर्श घेत नीलेश यांनी पोल्ट्री व्यवसायात पाऊल टाकले. शून्यातून सुरवात सन २०१७ च्या डिसेंबरमध्ये पोल्ट्री शेड उभारण्यास सुरवात केली. पण पदरी एकही रुपया नव्हता. व्याजाने पैसे घेतले. ब्रॉयलर पक्षांची पहिली बॅच २०१८ मध्ये निघाली. यावेळी पाच हजार पक्षांची क्षमता होती. काही बॅच घेतल्यानंतर क्षमता वाढली. चिकाटी, जोखीम पत्करण्याची तयारी, आर्थिक नियोजन व जोडीने काम करण्यातील समन्वय या बळावर दांपत्याने व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू ठेवली. व्यवसायातील ठळक बाबी

  • आजच्या घडीला १२ हजार पक्षांची क्षमता. त्यासाठी दहाहजार चौरस फूट व दोनहजार चौरस फूट अशा आकाराची दोन शेडस.
  • व्यवसायाच्या सुरूवातीस महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास. यात जागेची निवड, रस्ता, चोवीस तास वीज, पाणी उपलब्ध राहील याची काळजी.
  • शेडची उभारणी पूर्व-पश्चिम. ही लांबी जास्त असल्याचे कारण म्हणजे पक्षांचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होणे. उत्तर- दक्षिण लांबी कमी ठेवल्याने शेडमध्ये हवा खेळती राहते.
  • पक्षांचे पहिले काही दिवस संगोपन उष्ण वातावरणात करावे लागते. यासाठी विशिष्ट प्रकारचे शेड, लाईटची व्यवस्था. गॅस हिटर. यामुळे सर्व ऋतूत योग्य संगोपन.
  • खाद्यात स्वयंपूर्णता पोल्ट्री उद्योगात अनेकजण खाद्य विकत घेतात. त्यावर खर्च खूप होतो. नीलेश यांनी त्यावर मात करताना आपल्या शेतात फिडमिल उभारली. अकोला, परतवाडा, मध्यप्रदेश येथून मका व अन्य घटक आणले जातात. नामांकित कंपन्यांच्या बरोबरीचा दर्जा राखल्याने खाद्याला पोल्ट्रीधारकांकडून मागणी राहते. महिन्याला घरच्या पोल्ट्रीसाठी १२०० बॅग्ज (प्रति ५० किलोची) उत्पादनासह महिन्याला १५०० ते २००० बॅग्जही विक्रीही होते. या माध्यमातून पाच जणांना वर्षभर रोजगार मिळाला. त्यातून अतिरिक्त उत्पन्नात काही लाखांची वाढ झाली आहे. एक किलो सोने मिळवा दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या लाटेत चिकन खाण्यावरून अफवांचे पेव फुटले. याचा अन्य पोल्ट्री उत्पादकांबरोबर नीलेश यांनाही फटका बसला. मात्र घाबरून न जाता त्यांनी खुबीने मार्ग काढला. एक संदेश लिहून तो सोशल मीडियात ‘व्हायरल’ केला. त्यात लिहिले की ‘कोरोना’ बाबतच्या अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. ग्राहकांतही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक चिकन खाणे आरोग्याला पूर्ण सुरक्षित आहे. चिकन खाल्यामुळेच कोरोना होतो हे सिद्ध करा व एक किलो सोने मिळवा..! या संदेशासोबत मोबाईल क्रमांकही दिला. ग्राहकांनी नीलेश यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. त्या काळात पक्षांचा दर अवघा २५ ते ३० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता. अशा काळात नीलेश यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडील पक्षी मिळेल त्या दरात खरेदी केले. पशुखाद्य पडून असल्याने ते पक्षांना खाऊ घातले. यातून काही दिवस निघाले. हळूहळू मार्केट सावरू लागले. पुढे किलोला १६० रुपये कमाल दर मिळून संकट काळात काही लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न नीलेश यांनी कमावले. पत्नीची समर्थ साथ पत्नी राणी या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पक्षांची देखरेख, लसीकरण, आहार, पाणी ही काळजी घेतात. यामुळे नीलेश यांना ‘मार्केटिंग’ व विक्रीसाठी पुरेसा वेळ मिळतो. कुटुंबाच्या शेतीतही दोघांनी लक्ष घातले. यंदा दोन एकरांत हळदीचे पीक उभे आहे. पुढील वर्षात दोन एकरांत संत्रा बाग उभारण्याचे उद्दिष्ट आहे. प्रगती

  • वर्षाला सुमारे दीड चे पावणेदोन कोटी रुपयांची उलाढाल. स्थानिक तसेच शेजारील जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना होते विक्री. किलोला ९० रुपयांपासून ते १०० रुपये व कमाल १३५ रुपयांपर्यंत मिळाला दर.
  • कुठलेही अनुदान, शासकीय योजना यांचा लाभ न घेता पोल्ट्रीतील उत्पन्न, कर्ज घेत भांडवल उभारले. सर्व कर्जही फेडले. सुमारे साडेचार एकर शेती, पक्षांचे एक शेड घेतले. दोन मध्यम क्षमतेची वाहने घेतली.
  • संपर्क- नीलेश चांडे पाटील- ९५४५४६०४४४, ८९९९६०३०६६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com