सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली रावी

निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा म्हशी एवढी आहे. त्यामुळे आपल्याकडील प्रचलित म्हशींच्या जातींबरोबर निली रावी म्हशीचे संवर्धन, संगोपन केले तर निश्चितपणे दूध उत्पादन वाढीसाठी फायदा होईल.
Nili Ravi buffalo
Nili Ravi buffalo

निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा म्हशी एवढी आहे. त्यामुळे आपल्याकडील प्रचलित म्हशींच्या जातींबरोबर निली रावी म्हशीचे संवर्धन, संगोपन केले तर निश्चितपणे दूध उत्पादन वाढीसाठी फायदा होईल.  म्हैसपालन म्हटले, की आपल्या  डोळ्यासमोर मुऱ्हा, मेहसाणा, सुरती, पंढरपुरी,  नागपुरी, जाफराबादी या म्हशींच्या जाती येतात. याचबरोबरीने सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या मुऱ्हा म्हशी एवढीच क्षमता असलेली जात म्हणजे निली रावी म्हैस. ही जात देखील दूध उत्पादनाच्या दृष्टीने चांगली आहे.  इतिहास 

  •   निली आणि रावी अशा दोन वेगवेगळ्या म्हशींच्या जाती होत्या. निली या म्हशीच्या जातीचे नाव हे उत्तर भारतात असणाऱ्या सतलज नदीच्या निळ्या पाण्यावरून ठेवल्याचे इतिहासात पुरावे सापडतात. निली ही जात सतलज खोरे, पाकिस्तानातील मुलतान व मोन्टेगोमेरी जिल्हे आणि  भारतातील पंजाब प्रांतातील फिरोजपूर जिल्ह्यात आढळते.  
  •   रावी ही जात पाकिस्तानमधील ल्यालपूर, मोन्टेगोमेरी जिल्हे आणि भारतामधील पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यामध्ये आढळते. 
  •   निली व रावी या दोन्ही म्हशींच्या जाती दिसणे आणि उत्पादनामध्ये जवळपास समान आहेत. त्यामुळे त्यांच्यातील वेगळेपणा ठरवणे अवघड असल्यामुळे या म्हशींना निली रावी या नावाने एकच जात म्हणून मान्यता मिळाली. 
  •   निली रावी पंजाबमधील फिरोजपूर, अमृतसर, गुरुदासपूर जिल्ह्यांमध्ये आढळते. हरियाना आणि पंजाबमधील मुऱ्हा जातीच्या म्हशींना जास्त बाजार भाव आणि महत्त्व मिळाल्यामुळे निली रावी या जातीची संख्या कमी होत आहे. 
  •  गुणवैशिष्ट्ये 

  • ही म्हैस मुऱ्हा जातीप्रमाणे मोठ्या आकाराची आहे. लांब तोंड, फुगीर कपाळ, विस्तारलेल्या नाकपुड्या, मुऱ्हा म्हशीसारखी वळलेली शिंग, लांब मान, ही गुणवैशिष्ट्ये.
  • डोळे घारे असतात. शरीरावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी पांढरे ठिपके. उदा. कपाळ, तोंड, नाकपुड्या. चारी पायांना सॉक्स घातल्यासारखा पांढरा रंग आढळतो. शेपटीचा गोंडा पांढरा.शरीरावरील पाच ठिकाणच्या पांढऱ्या ठिपक्यामुळे या जातीला पंचकल्याणी असेही म्हणतात.  
  • नवजात रेडकाचे वजन ३५ ते ४० किलो प्रौढ म्हशीचे वजन ४५० ते ५५० किलो.
  • आयुष्यात पहिल्यांदा विण्याचे वय १२०० ते १५०० दिवस. 
  •   दूध उत्पादन १५०० ते २००० लिटर प्रति वेत. 
  •   दररोज मिळणारे दूध ६ ते ९ लिटर. 
  •   एका वेतात एका दिवसाचे सर्वोच्च दूध उत्पादन ११ लिटर ते १८ लिटर.
  •   एका वेतात दूध देण्याचा कालावधी २७७ ते ३५५ दिवस.
  •   दोन वेतंमधील अंतर ४४५ ते ५८० दिवस.  
  •   विण्या अगोदर दूध न देण्याचा कालावधी ९८ ते २०० दिवस. 
  •   विल्यानंतर परत गाभण राहण्यासाठी लागणारा कालावधी १५० दिवस.
  •   एकूण जीवन काळ १२ ते १५ वर्षे.
  •  संवर्धन करणाऱ्या संस्था 

  • म्हैस प्रजनन केंद्र, एनडीडीबी, नेकारीकाल्लू, आंध्र प्रदेश,  केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, नाभा कॅंपस, पंजाब 
  •   पशुसंवर्धन विभाग, मट्टेवारा, पंजाब
  •   लष्करी डेअरी फार्म, फिरोझपूर, पंजाब
  •   गुरू अंगद देव पशुवैद्यक आणि पशुविज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब 
  •   राज्य दूध उत्पादक संघटना, भाटियान, पंजाब
  • म्हशींचे संवर्धन व संशोधन 

  • केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हिसार, हरियाना येथे निली रावी म्हशींचे संवर्धन आणि संशोधन होते. पंजाबमध्ये नाभा या ठिकाणी संस्थेची उपशाखा आहे. 
  • फिलिपिन्स, इटली, हंगेरी, रोमानिया, ग्रीस, ब्राझील, बल्गेरिया देशांमध्ये त्यांच्या स्थानिक म्हशींच्या जाती सुधारणा कार्यक्रमामध्ये निली रावी जातीचा उपयोग केला जातो.
  • - डॉ. तेजस शेंडे,  ९९७०८३२१०५ (पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, गुरू अंगद देव पशुवैद्यक आणि पशुविज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com