हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
यशोगाथा
वाघा घेवड्याच्या पट्ट्यात कांदा बीजोत्पादन
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग वाघा घेवड्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादनाचा हुकमी पर्याय मिळाला आहे. व्यावसायिक पद्धतीने कांदा बियाणे निर्मितीतून येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावू लागले आहे. बियाण्याला परराज्यांतून मागणी होऊ लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग वाघा घेवड्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादनाचा हुकमी पर्याय मिळाला आहे. व्यावसायिक पद्धतीने कांदा बियाणे निर्मितीतून येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावू लागले आहे. बियाण्याला परराज्यांतून मागणी होऊ लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळी भाग आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर असून, पर्जन्यमान कमी असते. यामुळे नगदी पिके कमी घेतली जातात. खरिपात जो पाऊस होईल त्यावर ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांबरोबर वाघ्या घेवडाही घेतला जातो. पोषक वातावरणामुळे घेवड्याचे दर्जेदार उत्पादन मिळते. त्याला भौगोलिक निर्देशांकही (जीआय) मिळाला आहे. दरम्यानच्या काळात परिसरात जलसंधारणाची कामे झाली. बागायत क्षेत्र वाढले. दरम्यानच्या काळात कांद्याच्या दरात तेजी आली. बियाण्याच्या मागणीतही वाढ झाली. परिणामी पूर्वी रब्बी हंगामात कमी क्षेत्रावर होणारे कांदा बीजोत्पादन आता मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. बहुतांशी उत्पादन वैयक्तिक स्तरावर आहे. मात्र शेतकऱ्यांना एकत्र करून मागणीच्या तुलनेत पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यास सुरवात केली आहे. बीजसंपदा ॲग्रो प्रोड्यूसर फार्मर्स कंपनीची स्थापना त्यातून झाली आहे.
असे आहे कांदा बीजोत्पादन
- गावे- पिपोंडे बुद्रुक, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर, आसनगाव, दहिगाव, वाघोली, सोनके, रणदुल्लाबाद
- क्षेत्र- सुमारे ४५० ते ५०० शेतकऱ्यांकडून सुमारे १५० हेक्टर क्षेत्रावर.
- सुमारे ७५० ते ८०० क्विंटलपर्यंत तयार होते बियाणे
- कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात डोंगर असल्याने मधमाश्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचा कांदा बीजोत्पादनासाठी फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी झेंडूची लागवड केली जाते.
- जुन्नर परिसरातून तसेच फुरसुंगी, नाशिक लाल हे वाण वापरले जातात.
- दोन कांद्यांत १० सेंमी अंतर ठेवले जाते. चार फुटी सरीवर किंवा बेडवर लागवड होते.
- नोव्हेंबरचा हंगाम निवडला जातो.
- यंत्राद्वारे मळणी केली जाते.
- एकरी सरासरी दोन, अडीच ते तीन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
अर्थकारण सुधारतेय
गेल्या वर्षी वर्षी दराच्या तेजीमुळे प्रति किलो बियाण्याला तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाले होते. हा अपवाद वगळता मागील चार ते पाच वर्षांत प्रति क्विंटल ६५ हजार, ७० हजार ते ८० हजार व कमाल एक लाख रुपयांपर्यंत दर मिळतात. एकरी खर्च वजा जाता ७५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. या भागातील बियाण्याचा दर्जा चांगला असल्याने बियाण्यास मागणी चांगली राहते. मागणीनुसार एक किलोपासून ५० किलोपर्यत पॅकिंग करून विक्री केली जाते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांत येथील बियाणे पाठवले जाते. बीजोत्पादनामुळे परिसरातील गावांच्या अर्थकारणात सुधारणा होत आहे. पाच ते सात कोटी रुपयांची उलाढाल होण्यापर्यंत प्रगती होत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होत आहे.
माझे वडील रामराव जाधव ३० वर्षांपासून बीजोत्पादन करीत आहे. मी देखील नोकरी सांभाळून बीजोत्पादनाची जबाबदारी सांभाळत होतो. व्यवसायात वाढ झाल्याने मागील वर्षी राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी सोडून पूर्णवेळ शेती पाहण्यास सुरुवात केली आहे.
- राहुल जाधव ८५११३८८३८८
१६ वर्षांपासून कांदा बीजोत्पादन घेत आहे. भागातील शेतकऱ्यांना एकत्र करीत कांदा बीजोत्पादन करण्यासाठी बीजसंपदा ॲग्रो प्रोड्यूसर फार्मर्स कंपनीची स्थापना केली. दहा एकरांतील बीजोत्पादनातून ४० लाख रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे. पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून ४०० ते ५०० शेतकरी जोडण्याचा प्रयत्न आहे.
- जितेंद्र माने, अध्यक्ष, ‘बीजसंपदा’, शहापूर
बीजोत्पादनाचा ब्रॅण्ड तयार करून विक्री करण्यासाठी शासनाच्या ‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, अजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे.
- संजय बेलदार, कृषी सहायक
९४२३०५३२४५
फोटो गॅलरी
- 1 of 98
- ››