शेतकरी उत्पादक कंपन्यांना करारशेतीतील संधी

करार शेती ही आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये ‍निश्‍चितच फायदेशीर आहे. भारतीय शेतकऱ्यांचे जमीनधारणा क्षेत्र हे अतिशय कमी आहे. करारशेतीमुळे अशा प्रकारचे उच्च प्रतीचे तंत्रज्ञान प्रायोजक शेतकऱ्यांना पुरवू शकेल, त्यामुळे उत्पादकता व दर्जा सुधारण्यास मदत होते.
Through contract farming, there are good opportunities for farming companies to grow their businesses.
Through contract farming, there are good opportunities for farming companies to grow their businesses.

करार शेती ही आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये ‍निश्‍चितच फायदेशीर आहे. भारतीय शेतकऱ्यांचे जमीनधारणा क्षेत्र हे अतिशय कमी आहे. करारशेतीमुळे अशा प्रकारचे उच्च प्रतीचे तंत्रज्ञान प्रायोजक शेतकऱ्यांना पुरवू शकेल, त्यामुळे उत्पादकता व दर्जा सुधारण्यास मदत होते. विविध पिकांमध्ये खासगी किंवा शासकीय कंपन्यांमार्फत करारशेती केली जाते. बीजोत्पादनासाठी खासगी कंपन्यांच्यासोबत करार, विदेशी भाजीपाला खरेदी करणाऱ्या विविध कंपन्या, आयुर्वेदिक औषधे बनविणाऱ्या कंपन्या, रंगद्रव्ये बनविण्याऱ्या विविध कंपन्या, सुगंधी द्रव्ये यांसारखे पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या अशा विविध क्षेत्रातील विविध पिकांकरिता करारशेती करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आहेत. बटाट्यासारख्या पिकांमध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खासगी कंपन्या अस्तित्वात असून, करारशेतीद्वारे वेफर्सचा बटाटा, फ्रेंच फ्राईज, फिंगर चिप्सचा बटाटा यांसारख्या विविध प्रकारच्या बटाट्याची लागवड केली जाते.  करार शेती म्हणजे अशा पद्धतीची शेती ज्यामध्ये शेतकरी (उत्पादक) व विक्रेता कंपनी (फर्म/पणन कंपनी/प्रक्रिया उद्योग) या दोघांमध्ये एक विशिष्ट प्रकारे करार होऊन त्यामध्ये शेतीपूरक उत्पादन आणि पुरवठा जो भविष्य काळासाठी उपयोगात येणारा असून, याची किंमत कराराच्या वेळी ठरविली जाते. यामध्ये अनेक महत्त्वाच्या घटकांचा समावेश करार करतेवेळी असलेल्या व्यवस्था बघून केला जातो. कंत्राटी शेतीची गरज

  • भारतामध्ये शेतीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे उत्पादन व उत्पादकता तसेच पणन व्यवस्था यांचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांना होणारा नफ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच शेतकरी व खरेदीदार यांच्यामध्ये असणारी साखळी यामुळे मूळ खरेदीदार व उत्पादक या दोघांनाही जास्त फायदा होत नसल्यामुळे कंत्राटी शेतीची गरज भासू लागली आहे.
  • उत्पादकांना (शेतकरी) खरेदीदारांची गरज पूर्णपणे ज्ञात नसल्याकारणाने तसेच पणन व्यवस्थेचा पुरेपूर फायदा होत नसल्यामुळे कंत्राटी शेतीची गरज निर्माण झालेली आहे. 
  • जमिनीच्या तुकडीकरणामुळे जमिनीचे यांत्रिकीकरण करण्यात अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळणारे लाभ कमी होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना शेती करणे दुरापस्त झालेले आहे.
  • शेतकऱ्यांना पुरेसा शेतीतून नफा प्राप्त होत नसल्यामुळे त्यांच्याकडे पुरेसे भांडवल उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर योग्यवेळी शेतीमालाची विक्री होत नसल्यामुळे मालाला भाव चांगला मिळत नाही. अशा अनेक अडचणींमध्ये शेतकरी सापडला असल्याकारणाने कंत्राटी शेतीची निकड भासू लागली आहे.
  • कंत्राटी शेतीमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ आवश्यक असते. तसेच खासगी कंपन्यांच्या अधिकारी वर्गामार्फत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शेतीला व्यवसायिकतेचे स्वरूप येऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील खर्च कमी करून नफा वाढविण्यास सोपे जाते. तसेच शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही याचा लाभ मिळतो.
  • कंत्राटी शेतीची व्याख्या कंत्राटी शेती : कंत्राटी शेती उत्पादकाने कंत्राटी शेती पुरस्कर्त्यांबरोबर केलेल्या लेखी करारान्वये केलेली शेती असा आहे. अशा शेतीचे उत्पन्न कंत्राटी शेती पुरस्कर्त्यांकडून खरेदी केले जाईल, असा त्या कराराचा आशय असेल व तसे त्या करारात नमूद केलेले असेल.  कंत्राटी शेती करार : कंत्राटी शेती करार याचा अर्थ कंत्राटी शेतीसाठी केलेला लेखी करार असा आहे. कंत्राटी शेती उत्पादक : कंत्राटी शेती उत्पादक याचा अर्थ ज्याने कंत्राटी शेती करारान्वये कृषी उत्पन्न काढून त्याचा पुरवठा करावयाचे मान्य केले असेल, असा शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा संघ असा असेल. कंत्राटी शेती पुरस्कर्ता : कंत्राटी शेती पुरस्कर्ता याचा अर्थ ज्याने कंत्राटी शेती करार केला असेल, अशी व्यक्ती असा आहे. करार शेतीचे प्रकार  केंद्रीय मॉडेल  प्रायोजक मुख्यत्वे प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांकडून माल घेऊन प्रक्रियायुक्त मालाची विक्री करतो. यामध्ये प्रायोजकांकडून शेतीमालाच्या प्रतीवर नियंत्रण ठेवले जाते. तंबाखू, ऊस, केळी, कॉफी, रबर इत्यादी पिकांच्या बाबतीत हे मॉडेल वापरले जाते. न्युक्लियस इस्टेट मॉडेल यामध्ये प्रायोजकांकडे त्यांच्या प्रक्रिया उद्योगक्षेत्राजवळ मोठ्या प्रमाणावर फळबागांची मालकी असते. ते त्याचा प्रक्रिया उद्योगाच्या जवळच्या शेतकऱ्यांना उत्पादन तंत्रज्ञान पुरवितो. त्यांचा शेतीमाल खरेदी करतो. हे मॉडेल फळबागांच्या बाबतीत प्रामुख्याने वापरले जाते. मल्टीपार्टी मॉडेल याप्रकारच्या मॉडेलमध्ये शासकीय संस्था, खासगी संस्था, सहकारी संस्था व शेतकरी यांच्यात शेतीमाल खरेदी- विक्रीबाबत करार केले जातात. वैयक्तिक मॉडेल छोट्या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांबरोबर ताजा भाजीपाला व फळे यांच्या खरेदी विषयक हंगामी स्वरूपात करार केला जातो.

    इंटरमेडीटरी मॉडेल यामध्ये प्रायोजक कंपन्या शेतकऱ्यांचा गट / छोट्या कंत्राटदारांशी करार करतात. कंत्राटदार शेतकऱ्यांकडून माल गोळा करून त्याचा पुरवठा प्रायोजकास करतो. - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३०.  (राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com