agricultural news in marathi Opportunities in ornamental fishery business ... | Agrowon

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...

डॉ. नितीन सावंत, विनय सहस्रबुद्धे, डॉ. मनोज घुगूसकर
बुधवार, 17 नोव्हेंबर 2021

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने वृद्धिंगत होत आहे. यामध्ये विविध संवर्धन पद्धती आणि व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना उपलब्ध जागेचा वापर चांगल्याप्रकारे करून स्वयंरोजगाराचे एक कायमस्वरूपी साधन या माध्यमातून उभे करणे शक्य आहे.
 

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने वृद्धिंगत होत आहे. यामध्ये विविध संवर्धन पद्धती आणि व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना उपलब्ध जागेचा वापर चांगल्याप्रकारे करून स्वयंरोजगाराचे एक कायमस्वरूपी साधन या माध्यमातून उभे करणे शक्य आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या तणावाला कमी करण्याचा पर्याय म्हणून लोकांच्यामध्ये शोभिवंत मत्स्यपालनाचे आकर्षण वाढत आहे. विकसनशील देशांमधील ग्रामीण भागातील लोकांकरिता स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये उपलब्ध असून परकीय चलन निर्मितीचा एक प्रमुख स्रोत आहे.

शोभिवंत मत्स्यपालनाच्या पद्धती 
इनडोअर युनिट 

 • कमी आकाराच्या जागेमध्ये शक्य. घरातील एखादी खोली किंवा पडवीमध्ये मत्स्यसंवर्धन करता येते.
 • मत्स्यबीज उत्पादन व संवर्धनाकरिता विविध आकारांच्या काचेच्या टाक्या ठेवून मत्स्यसंवर्धन केले जाते.
 • जास्त किंमत मिळवून देणाऱ्या मत्स्य प्रजातीचे बीजोत्पादन आणि संवर्धनाकरिता या प्रकारचे युनिट योग्य आहे. उदा. निऑनटेटा, डिस्क्स, फ्लॉवरहॉर्न, ब्लॅक घोस्ट इ.

यार्ड स्केल युनिट 

 • या प्रकारचे युनिट घरामागील पडवी किंवा समोरील अंगण या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असल्यास करता येणे शक्य आहे. याकरिता १००० ते २००० चौरस फूट जागा योग्य असून, यामध्ये प्लॅस्टिक पूल आणि एफआरपी टॅंक ठेवून मत्स्य संवर्धन करता येते.
 • मत्स्यबीजाचे विक्रीयोग्य आकारापर्यंत संवर्धन करण्याकरिता या प्रकारचे युनिट योग्य असून जास्त संख्येमध्ये पिले देणाऱ्या माशांच्या संगोपनाकरिता योग्य आहे.
 • बाजारपेठेमध्ये मध्यम किंमत मिळणारे शोभिवंत मासे जसे की, एंजल, गोल्डफिश, बार्ब, गुरामी, टेळा इत्यादींच्या संवर्धनाकरिता हे युनिट उपयोगी आहे.

सिमेंट पॉन्ड युनिट 

 • सिमेंटचे विविध आकाराचे पॉन्ड बांधून मत्स्यबीज संगोपन करण्यात येते.
 • यार्ड स्केल युनिटपेक्षा थोडी मोठी जागा उपलब्ध असल्यास अशा प्रकारचे युनिट बांधून मत्स्यसंवर्धन करणे योग्य ठरते.
 • सुमारे ५००० चौरस फुटापर्यंत जागेमध्ये याप्रकारे एक चांगले युनिट बांधता येऊ शकते.
 • सिमेंट पॉन्ड युनिट बांधण्याकरिता सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असतो. परंतु याद्वारे सर्वप्रकारच्या माशांचे संवर्धन विक्री योग्य आकारापर्यंत करता येऊ शकते व त्यामुळे मिळणारे उत्पन्न देखील जास्त आहे.

प्लॅस्टिक अस्तरीकरण तलाव युनिट 

 • बारमाही पाण्याचा स्रोत आणि ५ ते १० गुंठे आकाराची मोकळी पडीक जमीन उपलब्ध असल्यास कमी गुंतवणूक करून मत्स्यसंवर्धन करण्याकरिता याप्रकारचे युनिट आदर्शवत आहे.
 • हे युनिट करण्याकरिता जागेचा आकार आणि क्षेत्रफळाप्रमाणे ५ ते १० मीटर लांब, १.५ ते २ मीटर रुंद आणि १.२ मीटर खोल असे तलाव तयार करून त्यामध्ये २५० ते ३५० मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात येते.
 •  तलावांच्या एकाबाजूने पाइपलाइनद्वारे पाणी घेण्यासाठी व्यवस्था करावी. विरुद्ध बाजूने अतिरिक्त पाणी वाहून जाण्याकरिता पाइप बसवावा. यामुळे तलावांमध्ये १०० ते १२० सेंमी एवढी पाणी पातळी राखता येते. पाणी बदलणे देखील सहज शक्य होते.
 • माशांना नैसर्गिक शत्रूपासून संरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण युनिटला शेडनेट वापरून आच्छादित करावे.
 • पिले देणारे मासे (गप्पी, स्वोर्डटेल, मोली, प्लॅटी) तसेच कोईकार्प, गोल्डफिश, गुरामी, बार्ब अशा प्रकारच्या माशांच्या संवर्धनाकरिता हे युनिट जास्त योग्य ठरते.
 • अत्यंत माफक खर्चात, कमी जागेत, कमीत कमी साधनसामग्री वापरून व अत्यंत सोपे तंत्रज्ञान वापरून माशांचे संवर्धन करणे शक्य आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्यविद्याशाखेचा मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी शोभिवंत माशांच्या संवर्धनाकडे वळले आहेत.

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामधील पर्याय 

 • शोभिवंत माशांची पिले योग्य आकारापर्यंत वाढवून विक्री करणे.
 • विविध शोभिवंत माशांचे नियंत्रित वातावरणामध्ये प्रजननाद्वारे बीजनिर्मिती करून मत्स्यसंवर्धकांना पुरविणे.
 • प्रजननक्षम नर व मादी मासे तयार करून विक्री करणे.
 • शोभिवंत मासे व इतर आवश्यक साहित्य विकी (किरकोळ/ घाऊक) करणे.
 • शोभिवंत मत्स्यपालन व प्रजननाकरिता लागणारे जिवंत खाद्य निर्मिती करून विक्री करणे.
 • शोभिवंत पाणवनस्पती संवर्धन व विक्री.
 • कार्यालय, हॉटेल तसेच छंदप्रिय ग्राहकांना ‘मत्स्यालय व्यवस्थापन सेवा’ पुरविणे.

संपर्क : डॉ.नितीन सावंत, ९४२२९६३५३३
विनय सहस्रबुद्धे, ९४२२४५३१८१
डॉ. मनोज घुगूसकर, ९४०४९९२४५५

(गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)


इतर कृषिपूरक
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...
कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः...
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...