शेतकरी कंपन्यांना केळी पिकात मूल्यवर्धनाची संधी

शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना एका विशिष्ट उद्देशाने झाली असेल तर तोच उद्देश घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण अपेक्षित असते. शेतकरी कंपन्यांनी केळी मुल्यसाखळीत लक्ष देणे आवश्यक आहे,
The farmer company has a good opportunity for exportable banana production.
The farmer company has a good opportunity for exportable banana production.

शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना एका विशिष्ट उद्देशाने झाली असेल तर तोच उद्देश घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण अपेक्षित असते. शेतकरी कंपन्यांनी केळी मुल्यसाखळीत लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून केळीचे एकरी उत्पादन वाढविणे, निर्यातक्षम केळीची लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या विविध पद्धती, निर्यातक्षम जातींची निर्मिती किंवा निवड, देशी केळी जातीची लागवड, ‍टिश्युकल्चर केळीचे उत्पादन,  विपणन व्यवस्था यासारख्या बाबींवर काम करता येऊ शकते. केळी मूल्यसाखळीतील नियोजन शेतकरी कंपन्यांनी खालील पैकी एक किंवा दोन घटकांपासून सुरुवात करून किमान ५० कोटींची उलाढाल झाल्यावर इतर घटकांवर कामकाज सुरू करावे. याकरिता उपक्रम सुरू केल्यापासून किमान १०००दिवस किंवा ३ वर्षे इतर कोणत्याही उपक्रम किंवा घटकांचा विचार करू नये. 

  •     रोपवाटिका (हार्डनिंग युनिट)
  •      उतिसंवर्धन प्रयोगशाळा
  •     रायपनिंग केंद्र व घाऊक पुरवठा
  •     रायपनिंग केंद्र व किरकोळ विक्री
  •     कापणी व पॅकिंग सेवा
  •     कापणी, साठवणूक व घाऊक विक्री
  •     घाऊक विक्री
  •     दुय्यम प्रक्रिया केंद्र व थेट विक्री
  •     दुय्यम प्रक्रिया केंद्र, कंपनीच्या ब्रॅण्डखाली उत्पादनाचा पुरवठा
  •     निर्यात
  •     टाकाऊ भागापासून खतनिर्मिती, धागा तयार करणे / कापड तयार करणे
  •     आवश्यक निविष्ठा पुरवठा व्यवसाय
  • वरील उपक्रमांपैकी शक्यतो बाजारपेठ तयार होण्याच्या अनुषंगाने दोन ते तीन उपक्रमांची निवड करावी. उपक्रमांची माहिती केळी रोपवाटिका (हार्डनिंग युनिट)

  • केळी लागवड प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रोप आणि जातीची निवड. उतिसंवर्धित रोपांना बाह्य वातावरणाची सवय व्हावी यासाठी प्रयोगशाळेतून बाहेर काढल्यानंतर ‍किमान ३ महिने रोपवाटिकेत शेडनेटमध्ये १ ते १.५ फुटाचे रोप होईपर्यंत त्यांची निगा राखली जाते. त्यानंतर ते विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. 
  • प्रयोगशाळेतून बाहेर पडलेल्या रोपाची किंमत ३ ते ५ रुपये प्रति रोप असते तर रोपवाटिकेतून (हार्डनिंग युनिट) बाहेर पडलेले केळीचे रोप साधारणपणे १२ ते १८ रुपयांपर्यंत वाहतूक खर्चासह अथवा वाहतूक खर्चाव्यतिरिक्त विकले जाते. 
  • या प्रक्रियेत शेतकरी उत्पादक कंपनी स्वत:ची रोपवाटिका (हार्डनिंग युनिट) सुरू करू शकते. शासनाच्या योजनांचे या करिता सहकार्य मिळू शकते. 
  •  नामांकित उतिसंवर्धन (टिश्युकल्चर लॅब) प्रयोगशाळेस संपर्क करून या प्रकारचा उपक्रम सुरू करता येऊ शकतो. शेतकरी उत्पादक कंपनीने याकरिता आपल्या परिसरातील पिकाचे सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे.     सर्व्हेक्षण म्हणजे क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध पिकाचे क्षेत्र आणि त्याचा लागवडीपासून ग्राहकांपर्यंतचा प्रवास या माहितीचे संकलन असते. या माहितीच्या आधारे कंपनीस उपक्रमाची निवड करणे सोपे होते.
  •  केळी हार्डनिंग युनिट / रोपवाटिका या उपक्रमात नामांकित खासगी कंपनीची एजन्सी अथवा वितरणकर्ता म्हणून नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर वाहतुकीस योग्य जागेची निवड करावी. पाण्याची उपलब्धता, शेटनेटची उभारणी, तुषार सिंचन संच, कामगारांची उपलब्धता केळी उत्पादित  क्षेत्र, खेळते भांडवलाची उपलब्धता इत्यादी निकष व बाबींच्या आधारे हा व्यवसाय शेतकरी कंपनीला फायदेशीर ठरू शकतो.
  • केळी उतिसंवर्धन प्रयोगशाळा 

  • वैयक्तिक स्तरावर व खासगी कंपन्यांच्या अशाप्रकारे उतिसंवर्धन प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत. वास्तविक शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यक्षेत्रात जर केळी लागवड असेल तर किंवा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली असेल तर उतिसंवर्धनापासून व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही. 
  • शेतकरी उत्पादक कंपनीस उतिसंवर्धन प्रयोगशाळा ही खर्चिक बाब वाटत असल्याने सुरुवातीस आत्मविश्‍वास येत नसेल तर जम बसेपर्यंत नामांकित कंपनीची विरतणकर्ता म्हणून नोंदणी करून घेऊन हार्डनिंग युनिट / केळी रोपवाटिका सुरू करण्यास हरकत नाही. कारण सर्वसाधारणपणे उतिसंवर्धन प्रयोगशाळा सुरू करण्यास अंदाजित ३० लाखांपासून सुमारे १ कोटीपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. यास शासनाचे अनुदान उपलब्ध होऊ शकते.
  • उतिसंवर्धन प्रयोगशाळेची निर्मिती केल्याने शेतकरी सभासदांना अल्पदरात रोपे पुरवठा शक्य होऊ शकेल. सभासदांची संख्या वाढेल. 
  • राज्यातील केळी उत्पादक क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबतच सहकारी संस्था, महिला गटांचे फेडरेशन, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यांनी व्यावसायिक पद्धतीने अशा प्रयोगशाळांची उभारणी करण्यास हरकत नाही. जेणेकरून सर्व स्तरांवर व्यावसायिकतेचा गुण व कौशल्य निर्माण होऊन शासनाच्या तिजोरीवरील अनुदानाचा भार कमी होऊ शकेल. 
  • - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (कृषी व्यवसाय व पणन व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com