जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत संधी

भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी समृद्ध जैवविविधता आणि अनुकूल हवामान असल्यामुळे शोभिवंत माशांच्या संगोपनात चांगली संधी आहे.
The business of producing and selling ornamental fish can be done with less capital.
The business of producing and selling ornamental fish can be done with less capital.

भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी समृद्ध जैवविविधता आणि अनुकूल हवामान असल्यामुळे शोभिवंत माशांच्या संगोपनात चांगली संधी आहे. शोभिवंत मासे संगोपन हा सर्वांत लोकप्रिय छंदापैकी आहे. जागतिक स्तरावर शोभिवंत माशांचा व्यापार अंदाजे ६ अब्ज डॉलर इतका आहे. शोभिवंत माशांच्या निर्यातीमध्ये आशियायी देशांचा ६० टक्के वाटा आहे. विकसनशील देशात शोभिवंत माशांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात करतात. शोभिवंत मासे संवर्धन आणि व्यापारामध्ये भारताचा एक टक्का वाटा आहे. भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी समृद्ध जैवविविधता आणि अनुकूल हवामान असल्यामुळे शोभिवंत माशांच्या संगोपनात चांगली संधी आहे. केरळ, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल ही राज्ये शोभिवंत माशांच्या संवर्धनामध्ये आघाडीवर आहेत. शोभिवंत माशांचे वर्गीकरण स्वदेशी आणि विदेशी अशा दोन प्रकारे होते. भारतामध्ये शोभिवंत माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांच्या जगभरात अंदाजे ४०० प्रजाती आहेत. गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांमध्ये टेट्रा, गप्पी, गोल्ड फिश, कॅटफिश, मौली, गौरामी, प्लेटी, लोच, सिक्लिड आणि बार्ब यांना चांगली मागणी आहे. शोभिवंत माशांचे संवर्धन आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भविष्यातील संधी  भारतामध्ये घरगुती मत्स्यालय वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शोभिवंत माशांचा व्यापाराची बाजारपेठ सुमारे ३३० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढील १० वर्षांमध्ये शोभिवंत माशांचा व्यापार हा १२०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारतातील शोभिवंत माशांच्या आकारानुसार किमतीचे वर्गीकरण 

वर्गीकरण प्रजाती
कमी किंमत (३०-६० रुपये प्रति नग) ६० टक्के प्राधान्य गोल्ड फिश, कोई, शार्क, गुरामी, अँजेल, बार्ब, टेट्रा, गप्पी, फायटर फिश, आणि प्लॅटी इत्यादी.
मध्यम किंमत (५०-२०० रुपये प्रति नग) ३१ टक्के प्राधान्य  गोल्ड फिश, कोई, शार्क, गुरामी, अँजेल, बार्ब, टेट्रा, सिल्वर डॉलर औकर आणि प्लॅटी इत्यादी.
 जास्त किंमत (२००-२००० रुपये प्रति नग) २ टक्के प्राधान्य कोई, एरोवना, डिस्कस, फ्लॉ हॉर्न आणि खाऱ्या शोभिवंत मासे.

शोभिवंत माशांचा व्यापार 

  • गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांना जगभरातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
  • गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांच्या व्यापारामध्ये ९० टक्के वाटा हा मत्स्य संवर्धनाचा आणि १० टक्के वाटा हा नैसर्गिक जलाशयातून येतो.
  • अमेरिका, जपान, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स आणि इटली इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात शोभिवंत माशांचे संवर्धन होते. या उद्योगात मोठी गुंतवणूक केली जाते.
  • जगामध्ये शोभिवंत माशांच्या संवर्धनामध्ये सिंगापूर हा आघाडीचा देश आहे. त्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांचा क्रमांक लागतो.
  • अमेरिका, सिंगापूर, जपान, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका आणि चीन या देशांतून शोभिवंत माशांची निर्यात होते.
  • भारतामधील संधी  भारतामध्ये शोभिवंत माशांचे उत्पादन आणि व्यापाराला संधी आहे. केरळ, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल या राज्यात शोभिवंत माशांचा चांगला व्यापार होतो. भारतामध्ये शोभिवंत मासे हे तळे, नद्या आणि कालव्यामध्ये आढळून येतात. भारतामध्ये शोभिवंत माशांचा व्यापाराचे दोन विभाग आहेत. घरगुती मत्स्यालय व्यापार  भारतामध्ये बरेच जण घरगुती मत्स्यालय टाकी ठेवतात. त्यामध्ये गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे म्हणजेच गप्पी, मोली, अँजेल फिश, गोल्ड फिश, आणि प्लॅटी इत्यादी माशांचे संगोपन केले जाते. शोभिवंत माशांची निर्यात  केरळ आणि तमिळनाडू राज्यातून मोठ्या प्रमाणात शोभिवंत माशांची निर्यात होते. भारतामध्ये ९८ टक्के शोभिवंत माशांचे संवर्धन केले जाते आणि २ टक्के हे नैसर्गिक जलाशयातून पकडले जातात. भारतामध्ये गोल्ड फिश माशाला प्रचंड मागणी आहे, त्यानंतर ऑस्कर फिश, डिस्कस, टेट्रा आणि फ्लॉ हॉर्न या शोभिवंत माशांना मागणी आहे. कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथून माशांची निर्यात होते. संपर्क : रामेश्‍वर भोसले, ९८३४७११९२० (रामेश्‍वर भोसले हे मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी, तमिळनाडू येथे संशोधक विद्यार्थी आहेत. अभिनव वैचाळकर हे अमरावती येथे सहायक मत्स्य विकास अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com