agricultural news in marathi Opportunity in the market for ornamental fish | Page 2 ||| Agrowon

जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत संधी

रामेश्‍वर भोसले, अभिनव वैचाळकर
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी समृद्ध जैवविविधता आणि अनुकूल हवामान असल्यामुळे शोभिवंत माशांच्या संगोपनात चांगली संधी आहे.
 

भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी समृद्ध जैवविविधता आणि अनुकूल हवामान असल्यामुळे शोभिवंत माशांच्या संगोपनात चांगली संधी आहे.

शोभिवंत मासे संगोपन हा सर्वांत लोकप्रिय छंदापैकी आहे. जागतिक स्तरावर शोभिवंत माशांचा व्यापार अंदाजे ६ अब्ज डॉलर इतका आहे. शोभिवंत माशांच्या निर्यातीमध्ये आशियायी देशांचा ६० टक्के वाटा आहे. विकसनशील देशात शोभिवंत माशांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात करतात. शोभिवंत मासे संवर्धन आणि व्यापारामध्ये भारताचा एक टक्का वाटा आहे. भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी समृद्ध जैवविविधता आणि अनुकूल हवामान असल्यामुळे शोभिवंत माशांच्या संगोपनात चांगली संधी आहे. केरळ, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल ही राज्ये शोभिवंत माशांच्या संवर्धनामध्ये आघाडीवर आहेत.

शोभिवंत माशांचे वर्गीकरण स्वदेशी आणि विदेशी अशा दोन प्रकारे होते. भारतामध्ये शोभिवंत माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांच्या जगभरात अंदाजे ४०० प्रजाती आहेत. गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांमध्ये टेट्रा, गप्पी, गोल्ड फिश, कॅटफिश, मौली, गौरामी, प्लेटी, लोच, सिक्लिड आणि बार्ब यांना चांगली मागणी आहे. शोभिवंत माशांचे संवर्धन आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

भविष्यातील संधी 
भारतामध्ये घरगुती मत्स्यालय वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शोभिवंत माशांचा व्यापाराची बाजारपेठ सुमारे ३३० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढील १० वर्षांमध्ये शोभिवंत माशांचा व्यापार हा १२०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

भारतातील शोभिवंत माशांच्या आकारानुसार किमतीचे वर्गीकरण 

वर्गीकरण प्रजाती
कमी किंमत (३०-६० रुपये प्रति नग) ६० टक्के प्राधान्य गोल्ड फिश, कोई, शार्क, गुरामी, अँजेल, बार्ब, टेट्रा, गप्पी, फायटर फिश, आणि प्लॅटी इत्यादी.
मध्यम किंमत (५०-२०० रुपये प्रति नग) ३१ टक्के प्राधान्य  गोल्ड फिश, कोई, शार्क, गुरामी, अँजेल, बार्ब, टेट्रा, सिल्वर डॉलर औकर आणि प्लॅटी इत्यादी.
 जास्त किंमत (२००-२००० रुपये प्रति नग) २ टक्के प्राधान्य कोई, एरोवना, डिस्कस, फ्लॉ हॉर्न आणि खाऱ्या शोभिवंत मासे.

शोभिवंत माशांचा व्यापार 

  • गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांना जगभरातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
  • गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांच्या व्यापारामध्ये ९० टक्के वाटा हा मत्स्य संवर्धनाचा आणि १० टक्के वाटा हा नैसर्गिक जलाशयातून येतो.
  • अमेरिका, जपान, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स आणि इटली इत्यादी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात शोभिवंत माशांचे संवर्धन होते. या उद्योगात मोठी गुंतवणूक केली जाते.
  • जगामध्ये शोभिवंत माशांच्या संवर्धनामध्ये सिंगापूर हा आघाडीचा देश आहे. त्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांचा क्रमांक लागतो.
  • अमेरिका, सिंगापूर, जपान, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका आणि चीन या देशांतून शोभिवंत माशांची निर्यात होते.

भारतामधील संधी 
भारतामध्ये शोभिवंत माशांचे उत्पादन आणि व्यापाराला संधी आहे. केरळ, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल या राज्यात शोभिवंत माशांचा चांगला व्यापार होतो. भारतामध्ये शोभिवंत मासे हे तळे, नद्या आणि कालव्यामध्ये आढळून येतात.
भारतामध्ये शोभिवंत माशांचा व्यापाराचे दोन विभाग आहेत.

घरगुती मत्स्यालय व्यापार 
भारतामध्ये बरेच जण घरगुती मत्स्यालय टाकी ठेवतात. त्यामध्ये गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे म्हणजेच गप्पी, मोली, अँजेल फिश, गोल्ड फिश, आणि प्लॅटी इत्यादी माशांचे संगोपन केले जाते.

शोभिवंत माशांची निर्यात 
केरळ आणि तमिळनाडू राज्यातून मोठ्या प्रमाणात शोभिवंत माशांची निर्यात होते. भारतामध्ये ९८ टक्के शोभिवंत माशांचे संवर्धन केले जाते आणि २ टक्के हे नैसर्गिक जलाशयातून पकडले जातात. भारतामध्ये गोल्ड फिश माशाला प्रचंड मागणी आहे, त्यानंतर ऑस्कर फिश, डिस्कस, टेट्रा आणि फ्लॉ हॉर्न या शोभिवंत माशांना मागणी आहे. कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथून माशांची निर्यात होते.

संपर्क : रामेश्‍वर भोसले, ९८३४७११९२०
(रामेश्‍वर भोसले हे मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी, तमिळनाडू येथे संशोधक विद्यार्थी आहेत. अभिनव वैचाळकर हे अमरावती येथे सहायक मत्स्य विकास अधिकारी आहेत.)


इतर कृषिपूरक
खुडूक कोंबडी कशी ओळखावी?अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः...
शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची...वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी...
स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर म्हणजे काय? कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा...
सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल? दुग्धव्यवसायातील सर्वात खर्चिक आजार म्हणजे कासदाह...
जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा करा योग्य...योग्य प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीत...
जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध...
आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?शेळी पालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला...
पशुपालकांना मिळणार KCC अंतर्गत पैसे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना...
पशुपालन क्षेत्रात गुंतवणुकीची गरज भारतीय कृषी-अन्न व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच...
दुधाळ जनावरांसाठी कॅल्शियमचे महत्त्व गाय म्हैस विल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅल्शियमची...
भारताच्या डेअरी निर्यातीत पुढील दशकात...भारतातील दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत पुढील...
गोपैदाशीचे धोरण अन् उद्दिष्टे...उच्च आनुवंशिकता आणि दुग्धोत्पादन क्षमता असलेली...
कोंबड्यांना द्या योग्य गुणवत्तेचे पाणीकोंबड्यांना पाणी देण्यापूर्वी शुद्धीकरण करावे....
जनावरांमधील आंत्रविषार आजारजनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना पावसाळ्यात...
जनावरे वारंवार उलटण्याची समस्यापशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांची माजाची...
कृत्रिम रेतनाची योग्य वेळ महत्त्वाची जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करताना गर्भधारणा यशस्वी...
मध निर्यातीला चालना देण्यावर अपेडाचा भर पुणे - युरोप आणि इतर देशांमध्ये मधाच्या...
अंडी शाकाहरी कि मांसाहारी?मुळातचं अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया...
जनावरांमधील थायलेरीया आजारथायलेरीया हा परोपजीवीमुळे होणारा आजार असून याची...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...