agricultural news in marathi Orange growers need new technology | Page 2 ||| Agrowon

संत्रा उत्पादकांना नव तंत्रज्ञानाची जोड गरजेची...

विजयकुमार चोले
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह संत्रा उत्पादक देशांमधील तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. संत्रा फळांचा तजेलदारपणा आणि साठवणूक कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने आपल्याला लक्ष द्यावे लागेल.
 

आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह संत्रा उत्पादक देशांमधील तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. संत्रा फळांचा तजेलदारपणा आणि साठवणूक कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने आपल्याला लक्ष द्यावे लागेल.

विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण हवामानामुळे संत्र्याची चव आणि स्वाद जगभर प्रसिद्ध आहे. परंतु पारंपरिक संत्रा लागवडीच्या पलीकडे जाऊन व्यापारी तत्त्वावर नवीन तंत्रज्ञानाने संत्रा लागवड ,विपणन आणि मूल्यवर्धनाचे प्रयोग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत नाही. संत्रा लागवड मुख्यतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू,आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान, नागालँड, मिझोराम,अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये  आहे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नागपूर,परभणी, वाशिम, यवतमाळ हे प्रमुख संत्रा उत्पादक जिल्हे आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण चव आणि स्वादामुळे नागपूर संत्रा जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. जगातील इतर संत्रा फळांच्यामध्ये विशिष्टपुर्ण चवीमुळे नागपूर संत्र्याचे  स्थान टिकून आहे. चव आणि स्वादामुळे नागपूर संत्रा फळाला जी.आय.मानांकन मिळाले आहे. गुणवत्तेमुळे जागतिक बाजारपेठेत नागपूर संत्र्याला मागणी वाढू शकते. प्रतवारी केल्यानंतर ३ व ४  ग्रेडची फळे  प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी वापरली जातात,  परंतु हे प्रमाण अतिशय अल्प आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी औषध,अन्न प्रक्रिया कंपन्यांशी व्यक्तिगत संपर्क करून मूल्यवर्धन साखळीत रस दाखविला आहे.

विक्री व्यवस्था सुधारण्याची गरज 

  • संत्रा पिकाच्या बाजार दराबाबत सांखिकी विश्लेषणात्मक माहिती अद्ययावत नाही. पारंपरिक पद्धतीने उत्पादक शेतकरी, मध्यस्थ दलाल आणि व्यापारी  यांच्यावरच बाजार माहितीसाठी अवलंबून असतात. 
  • सुरुवातीच्या काळात कारंजा याठिकाणी 'महाऑरेंज' संचालित प्रतवारी व वॅक्स कोटिंग युनिट कार्यरत होते. आता हीच सुविधा दहा ते बारा ठिकाणी खासगी व्यावसायिकांनी उभारली आहे. तर सिट्रस इंडिया मार्फत संत्रा रसापासून कॉन्सन्ट्रेट निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. 
  • बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन संत्रा रसातील कडवटपणा कमी करण्यावर संशोधन चालू आहे. संत्रा फळ काढणी तंत्र  काढणीनंतर घ्यावयाची  काळजी  याबाबत प्रशिक्षणाची गरज आहे.  काढणीपश्‍चात फळांचा ताजेपणा टिकविण्यासाठी शीत कक्ष, रेफ्रिजरेटर व्हॅन, वाहतूक सुविधा आणि अद्ययावत साठवणूक सुविधेची गरज आहे. 

शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका 
साठवणूक क्षमता आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 'महाऑरेंज' ला अधिक वित्तीय साहाय्याची गरज आहे. सुमारे ३००० शेतकरी 'महाऑरेंज'चे सभासद आहेत. उत्पादकांना जास्तीत जास्त बाजारभाव  मिळवून देण्यात महा ऑरेंज ची भूमिका मोलाची आहे. सिट्रस इस्टेट ही संस्था संत्र्याचे एकत्रीकरण व  विपणन साखळीमध्ये  मोलाची भूमिका  बजावत आहे.

संशोधन आणि विकास क्षेत्र 
संत्रा पिकाच्या अधिक रसदार जातींवर संशोधन करून रसाचे प्रमाण वाढविल्यास फायदा होणार आहे. या जाती रस प्रक्रियेसाठी अधिक उपयुक्त ठरतील. रसासाठी वापरात येणाऱ्या किनो, व्हॅलेन्सिया या जातींची लागवड आणि उत्पादन वाढीसाठी संशोधन महत्त्वाचे ठरेल. संत्रा उत्पादक देशांमधील तंत्र आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह आत्मसात करण्याची गरज आहे. संत्रा फळांचा तजेलदारपणा आणि साठवणूक कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने अधिक संशोधन आपल्याला करावे लागले.  साठवणूक व मूल्यवर्धन सुविधा उपलब्ध झाल्यास अधिकाधिक शेतकरी संत्रा लागवडीकडे वळून आर्थिक समृद्धीचा मार्ग सुकर होईल.

संत्रा उत्पादकांसमोरील आव्हाने 

  • संत्रा मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्य  मिळविण्याचे आव्हान शेतकऱ्यांच्या समोर आहे. संत्रा शेतीतून कायमस्वरूपी  स्थिर उत्पादनाची अपेक्षा आहे. एकूण उत्पादनापैकी ६० ते ७० टक्के  फळे कोरूगेटेड बॉक्स  पॅकिंग मधून बाजारपेठेत पाठविली जातात. या फळांना आकर्षक बाजारभाव मिळतो. उर्वरित ३० ते ४० टक्के फळे प्रक्रियेसाठी वापरल्यास उत्पादकांना चांगले  आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
  • भारतातील एकूण संत्रा उत्पादन सुमारे  ७ लाख टन एवढे आहे. संत्रा पिकाची सरासरी उत्पादकता ८ ते १०  टन प्रति हेक्टरी आहे. स्पेनमध्ये संत्रा उत्पादकता सुमारे ८० टन प्रति हेक्टरी आहे.
  • आपल्यालाही सुधारित लागवड तंत्राने उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव आहे. संत्रा लागवडीचे सुधारित तंत्र अवलंबण्यात उत्पादकांची मानसिकता घडविण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धती ऐवजी सुधारित छाटणी तंत्र, सिंचन तंत्राचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. 

संपर्क- विजयकुमार चोले, ९४२०४९६२६०
(उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क)


इतर ताज्या घडामोडी
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...