agricultural news in marathi Orchards, intercropping commercial farming | Agrowon

फळबागा, आंतरपिकांतून व्यावसायिक शेती

गणेश कोरे 
मंगळवार, 30 मार्च 2021

बीड जिल्ह्यातून पुणे येथे शिक्षणासाठी येऊन कर सल्लागाराचा व्यवसाय उभारत सज्जन पंडितराव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील खडकी (ता..दौंड) येथे १२० एकरांत फळबाग केंद्रित शेतीचा विस्तार केला आहे. त्यात आंतरपीक पध्दतीचा खुबीने वापर करीत उत्पन्नवाढीचे गणित जमवले आहे.
 

बीड जिल्ह्यातून पुणे येथे शिक्षणासाठी येऊन कर सल्लागाराचा व्यवसाय उभारत सज्जन पंडितराव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील खडकी (ता..दौंड) येथे १२० एकरांत फळबाग केंद्रित शेतीचा विस्तार केला आहे. त्यात आंतरपीक पध्दतीचा खुबीने वापर करीत उत्पन्नवाढीचे गणित जमवले आहे.

बीड जिल्ह्यातील वरपगांव (ता.केज) येथील सज्जन देशमुख यांची १० एकर शेती दुष्काळी होती. पुण्यात त्यांनी शिक्षणासाठी येण्याचा निर्णय घेतला. साधारण ३५ वर्षांपूर्वीचा हा काळ. शिक्षणानंतर कर सल्लागार म्हणून कामास सुरवात केली. व्यवसायात चढ उतार पाहिल्यानंतर काही वर्षांनी व्यवसायात जम बसला. पुण्यात ते स्थायिक झाले. शेतकरी असलेल्या आई वडिलांनी देखील आपल्याकडे राहावे अशी सज्जन यांची इच्छा होती. त्यादृष्टीने पुणे परिसरातच शेती घ्यावी असा विचार त्यांनी केला.

पुणे परिसरात शेती 
व्यवसायाच्या निमित्ताने विविध व्यक्तींशी संपर्क यायचा. त्यातूनच दौंड येथील खडकी गावात ३० एकर माळरान खरेदी केले. या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती. सर्व शेती खडकाळ होती. मात्र या ठिकाणाजवळून कालवा जात असल्याने भविष्यात पाण्याची सोय होऊ शकते या उद्देशाने शेती खरेदी केली. ती विकसित करण्यास सुरवात केली. एक पांरपारिक वापरात नसलेली विहीर होती. ती देखील कार्यक्षम केली. केलेल्या गुंतवणुकीतून पहिल्या दोन वर्षांत चार एकर ऊस घेतला. त्या आत्मविश्‍वासावर तसेच स्थानिक शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांसोबत केलेल्या चर्चेतून व्यावसायिक पिकांच्या शेतीस सुरवात केली. टप्पाटप्पाने केळी, डाळिंब ही पिके घेतली. सुमारे आठ वर्षांनी सध्याच्या शेतीला लागून असणारी ४०  एकर शेती खरेदी केली. नव्याने खरेदी केलेली जमीन  विकसित केल्यानंतर २०१५ मध्ये फळबागांवर लक्ष केंद्रित केले. 

सध्याची फळबाग दृष्टीक्षेपात 

  • केशर आंबा- २० एकर  
  • आंब्याच्या दोन झाडांतील १६ फुटांमध्ये सीताफळ, आठ फुटांवर टोमॅटो
  • चिकू-  ४ एकर 
  • आंब्यात शेवगा, सीताफळात शेवगा   
  •  लिंबू- २२ एकर  
  • पेरू- ५ एकर, त्यात टोमॅटो    
  • आंब्यात सीताफळ, कलिंगड  

विविध प्रयत्न 
 केवळ मुख्य पिकांवर अवलंबून न राहता मधल्या जागांमध्ये विविध आंतरपिकांचे प्रयोग सुरु केले. यामध्ये १० एकरांत केळीत कलिंगड घेण्याचा प्रयोग २०१७ मध्ये केला. यातून कलिंगड व केळीतून काही लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. या यशानंतर मग विविध आंतरपिके पध्दतीचा वापर सुरू केला. आता दोन वर्षांपासून बाराही महिने टोमॅटो घेतला जात आहे. सहा एकर कांदा देखील असतो. काही मुख्य पिकांचे उत्पादन अलीकडेच सुरू झाले आहे. आंब्याचे पाच एकरांत मागील हंगामात २० टन उत्पादन घेतले. शेवग्याचे एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन मिळत आहे. बांधावर सुमारे तीन हजारांपर्यंत नारळाची झाडे लावली आहेत. यामधील सुमारे ५०० झाडांचे उत्पादन सुरु झाले आहे. प्रति नारळाची १५ रुपयांप्रमाणे विक्री होते.   

दहा कुटुंबांना रोजगार 
देशमुख यांनी गावाकडील काहीजणांना टप्पाटप्याने आपल्या दौंड येथील शेतीत आणले. त्यातून १० कुटुंबातील सुमारे ५० जणांना रोजगार मिळाला आहे. अनेक वर्षांपासून ते येथे कार्यरत असल्याने मालक व कर्मचारी यांच्यात वेगळा स्नेह तयार झाला आहे. आपल्या शेतीच्या विस्तारात या कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे देशमुख सांगतात.  

पाणी व्यवस्थापन 
पाच विहीरी आणि तीन बोअरवेल्स आहेत. शेतातून खडकवासला धरणाचा कालवा गेला असल्याने त्याची दोन आवर्तने मिळतात. संपूर्ण १२० एकरांत ठिबक सिंचन आहे. पाण्याचा शाश्‍वत साठा म्हणून पाच एकरांवर शेततळे खोदण्याचे काम सुरु आहे. यासाठी एक किलोमीटर लांबीची पाइपलाइन खोदण्यात आली आहे.  विविध क्षेत्रांतील विहिरींमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. पुढील पावसाळ्यात तळे पूर्ण क्षमतेने  भरण्याचे नियोजन आहे. त्यात मत्स्यपालनाचेही नियोजन आहे. 

पपईत झेंडूचे आंतरपीक 
सुरवातीला शेती घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात १० एकरांवर पपईची  लागवड केली होती. मात्र हा पहिलाच अनुभव असल्याने विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. तो नियंत्रणात आणणे कठीण झाल्याने पपईचे मोठे नुकसान झाले. आता एकूणच कीड नियंत्रणाच्या दृष्टीने पपईच्या दोन्ही बाजूंनी झेंडू या सापळा पिकाची लागवड केली आहे. फुलांचे अतिरिक्त आर्थिक उत्पन्नही मिळाले. 

६५ गीर गायींचा मुक्त संचार गोठा 
 माती सुपीक करण्यासाठी देशी शेण आणि गोमूत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी ६५ गायींचे संगोपन करण्यात येत आहे. त्यासाठी मुक्तसंचार गोठा उभारण्यात आला आहे. रासायनिक खतांचा कमीतकमी वापर करून शेणखत, जीवामृत, स्लरी यांचा वापर करण्यावर अधिक भर आहे. दररोज दीड ट्रॉलीपर्यंत शेणखत उपलब्ध होते. भविष्यात संपूर्ण शेती रसायनमुक्त करण्याचे प्रयत्न असल्याचे देशमुख सांगतात. सध्या उपलब्ध दुधापासून तूपनिर्मिती करून किलोला २५०० रुपये दराने विक्री होते. 

लहरी हवामानामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. अशा परिस्थितीत एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून एकात्मिक सेंद्रिय शेती माहिती केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. 
-  सज्जन देशमुख, ९८२२०९३५५५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...