agricultural news in marathi padsali village from solapur district becomes hub of Bell Pepper | Page 2 ||| Agrowon

पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’

सुदर्शन सुतार
शुक्रवार, 16 जुलै 2021

बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर) गावाने ढोबळी मिरची पिकातही लौकिक तयार आहे. सुमारे ४०० एकरांहून अधिक क्षेत्रावर या पिकाची लागवड पाहण्यास मिळते.

बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर) गावाने ढोबळी मिरची पिकातही लौकिक तयार आहे. सुमारे ४०० एकरांहून अधिक क्षेत्रावर या पिकाची लागवड पाहण्यास मिळते. व्यवस्थापनासह गावातच विक्रीव्यवस्था. रोपवाटिका व्यवसाय अशी मूल्यसाखळी उभारत काही कोट्यवधींची उलाढाल वर्षाला होत आहे. त्यातून गावचे अर्थकारण उंचावले आहे. 

सोलापूर- बार्शी महामार्गावर वडाळ्यापासून आत आठ किलोमीटरवर पडसाळी गाव (ता. उत्तर सोलापूर) आहे. येथील धडपडी, जिद्दी आणि मेहनती शेतकऱ्यांनी कांदा आणि भाजीपाला पिकांत ओळख तयार केली आहे. हीच एकी गावच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. गावचे सुपुत्र कृषिभूषण कै. ज्येातीराम गायकवाड त्यासाठी आयुष्यभर झटले. त्यांनी बांधावरच्या ‘बोराला’ 
महत्त्वाच्या फळपिकाचा दर्जा मिळवून दिला. स्वतःबरोबर माझ्या शेतकरी बांधवानाही चार पैसे कसे मिळतील यासाठी सतत ते मार्गदर्शन करत राहिले. त्यांचे चिरंजीव आणि शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनीही वडिलांचा वारसा जपला. ढोबळी मिरचीच्या उत्पादनासाठी गावाचा लौकिक वाढवला आहे. त्यासाठी पुढाकार घेतला आहे. डाळिंब, टोमॅटो, काकडी, वांगी आदी पिकांत विक्रमी उत्पादन घेत त्यांनी स्वतःची प्रयोगशीलता सिद्ध केली आहे. आता पडसाळीची ओळख ढोबळी मिरचीत होण्यासाठीही त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे.

ढोबळी मिरचीची सुरुवात
जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये मंगळवेढा तालुक्यात पहिल्यांदा ढोबळी मिरचीची शेती सुरू झाली. ते प्लॉट अभ्यासून पडसाळीमध्येही काहींनी शेडनेट हाउसमध्ये लागवड केली. व्यवस्थापनाच्या बळावर चांगले उत्पादन व त्यातून अर्थकारणही समाधानकारक दिसू लागल्यानंतर अन्य शेतकरीही सरसावले. शेडनेटमध्ये जवळपास ४० हेक्टरवर लागवड झाली. शासकीय योजनेतून १३ शेडनेट्‍स उभे राहिले. पांढरी माशी व अन्य रोगांमुळे नुकसानही झाले. पण खुल्या पद्धतीनेही उत्पादन चांगलं घेता येते हे गायकवाड यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या शेतात प्रयोग केला आणि गावातील शेतकऱ्यांपुढे उदाहरण तयार झालं. मग उत्पादनाबरोबर नफा आणि तसं क्षेत्र वाढत गेलं.  

क्षेत्र विस्तारले 
अडचणी आणि अनुभवातूनच ढोबळी मिरची उत्पादकांचा गट निर्माण झाला. लागवडीच्या पुढील वर्षी (२०१६-१७) गावात या पिकाखालील क्षेत्र २५० एकरांपर्यंत तयार झाले. तरुण शेतकऱ्यांची संख्या यात महत्त्वाची होती. आजमितीला सुमारे ४०० एकरांच्या आसपास क्षेत्र निव्वळ ढोबळी मिरचीच्या लागवडीखाली आले आहे. जमिनीची निवड, मृदा निर्जंतुकीकरण, वाफे तयार करणे, रासायनिक- सेंद्रिय खतांचे वेळापत्रक, मल्चिंग पेपर अंथरणे, योग्य जातीची निवड करणे, रोपवाटिका, पीकसंरक्षण, काढणी, पॅकिंग, बाजारपेठ आदी विविध बाबींमध्ये शेतकऱ्यांचे ज्ञान व कौशल्य व आत्मविश्‍वास वाढीस लागला. 

व्यापारी बांधावर
 स्थानिक सोलापूरसह पुणे, मुंबई, सुरत, जमशेदपूर, कानपूर, दिल्ली, पटणा, कोलकता, जयपूर आदी देशभरातील मार्केटला येथील शेतकरी मिरची पाठवू लागले. त्यातून चांगला दर मिळू लागला. पुढे स्थानिक व्यापारी गावात येऊन खरेदी करू लागले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मिरची मिळू लागली. अन्य मार्केटच्या तुलनेत जास्त दर देऊ लागले. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या मालाचे दर आपण ठरवणे शक्य झाले. त्यामुळेच ३० रुपये प्रति किलो दर ३४ रुपयांपर्यंत वाढवून मिळाला. गेल्या नोव्हेंबरमध्ये हाच दर ६० रुपयांपर्यंत मिळाला. अशा प्रकारे मार्केट गावातच तयार झाले. 

मिरची शेतीचे अर्थकारण  
मेअखेरीस आणि जून पहिल्या पंधवड्यात मल्चिंग पेपर आणि ठिबकवरच बहुतांश लागवड होते. पाण्याचा निचरा होणाऱ्या, हलक्या ते मध्यम जमिनीची निवड होते. एकरी सुमारे ३० टनांपर्यंत उत्पादन व गावातील क्षेत्र ४०० एकरांच्या दरम्यान पकडल्यास एकूण १२ हजार टन उत्पादन उपलब्ध होते. किलोला १५ ते २० रुपये दर पकडल्यास उलाढाल एका पिकात एका वर्षात कोट्यवधींच्या घरात जाते. काही जण जानेवारीत दुसऱ्यांदाही लागवड करतात. त्यातून उलाढाल अधिक वाढते.  

व्यवसाय, रोजगार वाढला
गावाला ढोबळीच्या ४० ते ५० लाख रोपांची गरज भासते. त्यासाठी गावातीलच दोन-तीन तरुणांना रोपवाटिकेसाठी प्रोत्साहन मिळाले. त्यातून सुमारे ४० ते ५० लाख रोपे व ४५ ते ५५ लाख रुपयांचा संलग्न व्यवसाय निर्माण झाला. गावातील पैसा गावातच फिरू लागला. अन्य गावांनाही दर्जेदार रोपे पुरवणे शक्य झाले. काही तरुणांनी पिकअप, छोटे टेम्पो यांसारखी वाहने खरेदी केली. आणखी संलग्न व्यवसाय म्हणजे तीन-चार तरुणांनी कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनही लाख रुपयांचा व्यवसाय होऊ लागला. ४०० ते ५०० मजुरांना गावात काम मिळाले.

प्रतिक्रिया
सामूहिक व्‍यवस्थापन व विपणनातून एखादे पीक गावस्तरावर कसे यशस्वी होऊ शकते याचे उदाहरण आमच्या गावाने उभे केले आहे. 
-प्रदीप गायकवाड,  ९८५००१५५००
अध्यक्ष, शबरी कृषी प्रतिष्ठान

पाच वर्षांपासून ढोबळी मिरची करतो आहे. यंदाही अडीच एकर क्षेत्र आहे. दोन वर्षांपासून रोपवाटिकाही सुरू केली आहे. यंदा जवळपास दहा लाख रोपे विक्री होतील असे नियोजन आहे.
प्रशांत भोसले, ९५८८४१२०३७, पडसाळी 

पाच- सहा वर्षांपासून ढोबळी करतो. या पिकाने गावच्या अर्थकारणात मोठे बदल केले. सामूहिक लागवड आणि मार्केटिंगच मोठा फायदा होत आहे.  
-लंकेश पाटील, पडसाळी


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...